Zomato : झोमॅटोवर ऑर्डर करणे महागणार! आता द्यावे लागेल इतके शुल्क

Zomato : झोमॅटोवर ऑर्डर करणे आता महागले आहे. ऑर्डर महागली नाही. पण त्यावर शुल्क द्यावे लागते. या शुल्कामुळे झोमॅटोला नफा कमाविता येईल. तर ग्राहकांच्या खिशाला थोडी झळ बसेल.

Zomato : झोमॅटोवर ऑर्डर करणे महागणार! आता द्यावे लागेल इतके शुल्क
Follow us
| Updated on: Aug 06, 2023 | 6:03 PM

नवी दिल्ली | 06 ऑगस्ट 2023 : Zomato एक फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म (Food Delivery Platform) आहे. आता यावर खाद्यपदार्थाची ऑर्डर करणे महागले आहे. झोमॅटोने पण शुल्क वसूली सुरु केली आहे. सध्या प्रायोगित तत्वावर हे काम सुरु आहे. काही ठिकाणीची हा प्रयोग करण्यात येत आहे. यापूर्वी झोमॅटोची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी कंपनी Swiggy ने एप्रिल महिन्यापासून शुल्क घेण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने जून तिमाहीत 2 कोटी रुपयांचा शुद्ध नफा कमावला. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. कंपनीचा महसूल जून महिन्यात वार्षिक आधारावर 70.9 टक्क्यांनी वाढला. हा नफा 2,416 कोटी रुपयांवर पोहचला.

इतके शुल्क होणार वसूल

झोमॅटोवर प्रत्येक ऑर्डरवर ग्राहकांना आता 2 रुपये शुल्क द्यावे लागेल. ऑर्डरच्या किंमतीवर याचा काहीच परिणाम होणार नाही. पण सेवावर शुल्क द्यावे लागेल. Zomato Gold वर पण गुंतवणूकदारांना शुल्क द्यावे लागेल.

हे सुद्धा वाचा

सध्या चाचपणी

झोमॅटो प्रत्येक ऑर्डरवर 2 रुपये शुल्क आकारणार आहे. सध्या चाचपणी सुरु आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर कंपनीला मोठा नफा होईल. तर ग्राहकांच्या खिशाला किंचित झळ बसेल. झोमॅटोने पण हा एक प्रयोग असल्याचे सांगितले. हा प्रयोग संपूर्ण देशात लागू करण्यात येणार आहे की नाही, याची कंपनीने माहिती दिली नाही.

कंपनीने कमावला नफा

झोमॅटो कंपनीचा तिमाही निकाल (Zomato Q1 Result) समोर आला आहे. त्यात कंपनीने मोठी घौडदोड केली आहे. जून 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने 2 कोटी रुपयांचा शुद्ध नफा कमावला. एक वर्षापूर्वी या कंपनीला 186 कोटींचा तोटा झाला होता. मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीला 189 कोटींचे नुकसान सहन करावे लागले होते. कंपनीकडे उलाढालीसाठी 2416 कोटी रुपयांचे भांडवल उरले होते. एका वर्षांपूर्वी याच तिमाहीत 1414 कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षा यंदा हे प्रमाण 71 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

शेअरमध्ये उसळी

झोमॅटोचा निकाल शेअर बाजार बंद होण्यापूर्वी समोर आला. कंपनीचा शेअर (Zomato Share Price) गुरुवारी बीएसईवर 1.55 टक्के वा 1.32 रुपयांनी वधारला. शेअर 86.22 रुपयांवर बंद झाला होता. कंपनीने एक्सचेंज फाईलिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे जून 2023 मध्ये क्विक कॉमर्समध्ये कंपनीने सकारात्मक योगदान दिले.

2021 मध्ये आला होता आयपीओ

झोमॅटो कंपनीचा आयपीओ 2021 मध्ये बाजारात आला होता. या आयपीओची इश्यू प्राईस 76 रुपये होती. कंपनीच्या शेअरची सर्वकालीन उच्चांक 163 रुपये आहे. सध्या या शेअरमध्ये तेजी दिसत असली तरी हा शेअर त्याच्या उच्चांकी कामगिरीपेक्षा 47 टक्के घसरणीवर आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.