ना बँकेत फेऱ्या, ना ऑनलाईन अर्ज, केवळ मिस कॉल द्या आणि मिळवा एसबीआयचे कर्ज
एसबीआयचे ग्राहक केवळ मिस कॉलद्वारे आपली कर्जाची प्रक्रिया सुरू करू शकतात. जाणून घेऊया आपण मिस कॉल किंवा मेसेजद्वारे कर्जासाठी कसे अर्ज करू शकता. (Now Just give miss call and get SBI loan, The process of getting a loan has become easier)
नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँक बऱ्याच काळापासून कोट्यावधी ग्राहकांना सेवा देत आहे. एसबीआय ग्राहकांना मदत करण्याबरोबरच पैशांच्या गुंतवणूकीस मदत करीत असते. तसेच एसबीआयने कर्जाची प्रक्रिया हळूहळू सुलभ केली आहे. याआधी आपल्याला बँकेत जाऊन कर्ज घेण्यासाठी अर्ज करावा लागत असे, नंतर ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज केला जात असे. परंतु, एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी मिस्ड कॉलची सुविधा देखील सुरू केली आहे, ज्या माध्यमातून ते कर्ज घेऊ शकतात. एसबीआयचे ग्राहक केवळ मिस कॉलद्वारे आपली कर्जाची प्रक्रिया सुरू करू शकतात. जाणून घेऊया आपण मिस कॉल किंवा मेसेजद्वारे कर्जासाठी कसे अर्ज करू शकता. तसेच अशा प्रकारे कर्जासाठी अर्ज करून आपल्याला पैसे कसे मिळतील. (Now Just give miss call and get SBI loan, The process of getting a loan has become easier)
कोणत्या क्रमांकावर द्यायचा मिस कॉल?
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ट्विटनुसार, ग्राहक आता 7208933142 या क्रमांकावर मिस कॉल देऊन कर्ज मिळवू शकतात. या प्रक्रियेमध्ये आपल्याला प्रथम आपल्या रजिस्टर क्रमांकावरून मिस कॉल द्यावा लागेल आणि त्यानंतर आपला तपशील बँकेत पोहोचेल. त्याच वेळी, जर आपल्याला एसएमएसद्वारे कर्ज हवे असेल तर आपण एसएमएसमध्ये PERSONAL लिहून 72089331145 वर एसएमएस पाठवू शकता. एसएमएस डिलिव्हर होताच तुम्हाला बँकेचा कॉल येईल आणि तुमच्या कर्जाची पुढील प्रक्रिया सुरू होईल.
कर्ज कसे मिळेल?
एकदा तुम्ही मिस्ड कॉल दिल्यावर बँकेला तुमची माहिती मिळेल आणि बँकेच्या वतीने तुमच्याशी संपर्क साधला जाईल. यामध्ये, बँकेचा प्रतिनिधी आपल्या उत्पन्नाविषयी आणि आपली मागणी इत्यादीविषयी माहिती विचारेल, त्यानंतर आपल्या कर्जाची प्रक्रिया सुरू होईल. यानंतर तुम्हाला बँकेच्या निश्चित प्रक्रियेनुसार कर्ज दिले जाईल. आपल्याला या प्रक्रियेमुळे कोठेही जाण्याची आवश्यकता नाही आणि मिस कॉल दिल्यानंतर बँक आपोआप आपल्याशी संपर्क साधेल.
बँकेत मिस कॉल सर्व्हिस केवळ वैयक्तिक कर्जसाठीच नाही तर बॅलन्स चेक करण्यासाठी, मिनी स्टेटमेंट काढण्यासाठी आणि इतर महत्वाच्या कामांसाठीही वापरु शकता. वास्तविक, कर्ज बाजारात वाढती स्पर्धा पाहता ही सुविधा देशातील बऱ्याच मोठ्या बँकांमध्ये उपलब्ध आहे. आता अनेक बँकांकडून मिस कॉलद्वारे बॅलेंस जाणून घेण्याची सुविधा देण्यात येत आहे. (Now Just give miss call and get SBI loan, The process of getting a loan has become easier)
सौम्या संतोष पतीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होती, हमासनं डागलेलं क्षेपणास्त्र घरावर पडताच सगळं संपलंhttps://t.co/RRjX0pAByk#SoumyaSantosh | #Kerala | #Israel | #Palestine
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 12, 2021
इतर बातम्या
कोरोना प्रतिबंधक लसीचे ‘राष्ट्रीय धोरण’ जाहीर करा; नाना पटोलेंचा मोदी सरकारला सल्ला
सायलीला ‘परफेक्ट पती’ सापडल्याच्या चर्चा, ऋतुराज म्हणतो “क्लीन बोल्ड होईन तर…”