आता पॅकेटवर दोन प्रकारचे दर, MRP सह युनिटची किंमत लिहावी लागणार, 1 एप्रिल 2022 नवा नियम
नवीन नियमानुसार, 1 किलोपेक्षा जास्त पॅकेट तयार करणाऱ्या कंपन्यांना प्रतिकिलो युनिट विक्री किंमत देखील लिहावी लागेल. याशिवाय एमआरपी लिहिणेही बंधनकारक आहे. उदाहरणार्थ, 5 किलो पिठाच्या पॅकेटवर 1 किलो पिठाची किंमत देखील लिहावी लागेल. ही युनिट विक्री किंमत असेल.
नवी दिल्लीः आता प्रत्येक पॅक केलेल्या मालाचा दर दोन प्रकारे लिहिला जाणार आहे. एक दर कमाल किरकोळ किमतीचा असेल आणि दुसरा दर युनिट किमतीचा असेल. म्हणजेच 5 किलो पिठाचे पाकीट असेल तर त्यावर 1 किलो पिठाचा दरही लिहिला जाणार आहे. यामुळे ग्राहकांना इतर कंपन्यांच्या तुलनेत ते किती महाग किंवा स्वस्त घेत आहेत, याची कल्पना येणार आहे. हा नवा नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होणार आहे. यामुळे ग्राहकांना प्रति युनिट किंमत सहज कळू शकेल.
वस्तूवर युनिट विक्रीची किंमत देखील लिहावी लागणार
अन्न ग्राहक मंत्रालयाने यासाठी कायदेशीर मेट्रोलॉजी नियम 2011 मध्ये सुधारणा केलीय. या नवीन नियमानुसार, कंपन्यांना पॅकेज केलेल्या वस्तूवर युनिट विक्रीची किंमत देखील लिहावी लागेल. याद्वारे ग्राहकांना खरेदीवर होणारा नफा-तोटा याची माहिती सहज मिळू शकणार आहे. उदाहरणार्थ, समजा तुम्ही दोन कंपन्यांकडून 5 किलो पिठाची पिशवी घेतली. नवीन नियमानुसार, दोन्ही पॅकेट्सवर लिहिलेल्या युनिट विक्रीच्या किमतीवरून हे कळू शकेल की, कोणत्या कंपनीचा माल स्वस्त आहे आणि कोणाच्या मालाची किंमत तुमच्यासाठी आहे. याशिवाय पॅकेटवर एमआरपीही लिहावी लागेल. वेगवेगळ्या कंपन्यांची MRP समान असू शकते, परंतु युनिट विक्री किमतीत फरक असू शकतो.
नवीन नियम काय?
नवीन नियमानुसार, 1 किलोपेक्षा जास्त पॅकेट तयार करणाऱ्या कंपन्यांना प्रतिकिलो युनिट विक्री किंमत देखील लिहावी लागेल. याशिवाय एमआरपी लिहिणेही बंधनकारक आहे. उदाहरणार्थ, 5 किलो पिठाच्या पॅकेटवर 1 किलो पिठाची किंमत देखील लिहावी लागेल. ही युनिट विक्री किंमत असेल. एकत्रितपणे त्या संपूर्ण पॅकेटची एमआरपी लिहिली जाईल. जर पॅकेट 1 किलोपेक्षा कमी असेल तर त्यावर प्रति ग्रॅम युनिट विक्री किंमत लिहिली जाईल. याद्वारे ग्राहकांना ते प्रत्येक ग्रॅमसाठी किती पैसे देत आहेत हे समजू शकणार आहे.
दर कसा लिहिला जातो?
कायदेशीर मेट्रोलॉजी नियम 2011 मध्ये सुधारणा करण्यासाठी अन्न ग्राहक मंत्रालयाने शेड्यूल 2 कायदा काढला. जुन्या नियमानुसार, तांदूळ किंवा गव्हाचे पीठ 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 500 ग्रॅम आणि 1 किलो, 1.25 किलो, 1.5 किलोमध्ये पॅक करणे आवश्यक होते. आता हा नियम बदलण्यात आला असून त्यात अनेक वेगवेगळ्या वजनाच्या पॅकेटचा समावेश करण्यात आलाय. कंपन्या पॅकेज केलेल्या वस्तू वेगवेगळ्या प्रमाणात विकण्याचा विचार करत असून, त्यासाठी मंत्रालयाकडून परवानगी मागितली होती. कंपन्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या आहेत तर काही केल्या नाहीत. मेट्रोलॉजी कायद्यातील कलम 2 रद्द करून युनिट विक्री किमतीला परवानगी देण्यात आलीय.
काय सुधारणा होत्या?
अन्न मंत्रालयाने असेही सांगितले आहे की, एमआरपी लिहिण्याची एक योग्य पद्धत असावा आणि त्यात कोणतीही चूक झाल्यास नोटीस मागवता येईल. सध्याचा MRP लिहिण्याची पद्धत आहे – रु.3.80 (उदाहरणार्थ). एखाद्या कंपनीने फक्त 3 लिहिल्यास त्यावर कारवाई केली जाते. आता कंपन्यांना सांगण्यात आले आहे की, ते भारतीय रुपयांमध्ये एमआरपी लिहू शकतात, म्हणजेच पैशाचा उल्लेख वगळण्यात आलाय. पॅकेज केलेल्या वस्तूंचे प्रमाण संख्या किंवा एककांमध्ये लिहिलेले असते, जसे की 3N किंवा 3U. येथे N म्हणजे संख्या आणि U म्हणजे युनिट असेल.
कंपनीने 3NO किंवा 3UO लिहिल्यास ते नियमाचे उल्लंघन
‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, एखाद्या कंपनीने 3NO किंवा 3UO लिहिल्यास ते नियमाचे उल्लंघन आहे, त्यावर नोटीस पाठवली जाते. डब्यावर खरडवून लिहिणे हे देखील नियमाचे उल्लंघन आहे. हा नियम बदलण्यात आलाय. कंपन्या आता संख्या किंवा युनिटमध्ये संख्या लिहू शकतात. कंपन्यांना बॉक्स किंवा पॅकेटवर उत्पादनाची तारीख देखील लिहावी लागेल.
संबंधित बातम्या
Gold Silver Price Today : सोन्याच्या भावात घसरण, चांदी महागली, पटापट तपासा नवे दर
Paytm IPO: Paytm च्या IPO मध्ये पैसे कोण आणि कसे गुंतवू शकतो? जाणून घ्या