शेअर्सप्रमाणे सोन्याचं ट्रेडिंग : EGR ‘सिक्युरिटीज’च्या कक्षेत, अर्थ मंत्रालयाचा निर्णय

EGR गुंतवणुकीचे साधन आहे. शेअर्सप्रमाणे ईजीआर डी-मॅट स्वरुपात उपलब्ध असतील. आवश्यकतेनुसार तुम्ही प्रत्यक्ष सोन्यामध्ये त्यास रुपांतरित करू शकता. अर्थ मंत्रालयाच्या या निर्णयामुळे सोने गुंतवणुकदारांच्या आशा पल्लवित झाल्यात. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीटवर ट्रेडिंग केली जाईल.

शेअर्सप्रमाणे सोन्याचं ट्रेडिंग : EGR ‘सिक्युरिटीज’च्या कक्षेत, अर्थ मंत्रालयाचा निर्णय
सोने ट्रेडिंग प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 9:46 PM

मुंबई : तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करू इच्छित असल्यास तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. शेअर्सप्रमाणेच सोन्यामध्ये गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थ मंत्रालयाने सिक्युरिटीज काँट्रॅक्ट्स अ‍ॅक्ट 1956अंतर्गत इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीटला (EGR) सिक्युरिटीजचा दर्जा बहाल केला आहे. गुंतवणुकदारांना शेअर्सप्रमाणेच सोन्यामध्ये ट्रेडिंग करणे शक्य ठरणार आहे. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीटला (EGR) कागदी सोनेदेखील म्हटले जाते.

स्वतंत्र गोल्ड एक्स्चेंजची निर्मिती EGR गुंतवणुकीचे साधन आहे. शेअर्सप्रमाणे ईजीआर डी-मॅट स्वरुपात उपलब्ध असतील. विशेष बाब म्हणजे तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही प्रत्यक्ष सोन्यामध्ये त्यास रुपांतरित करू शकतात. अर्थ मंत्रालयाच्या नव्या निर्णयामुळे सोने गुंतवणुकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. वर्तमान एक्स्चेंजवर स्वतंत्र श्रेणीत इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीटवर ट्रेडिंग केली जाईल. अर्थ मंत्रालयाच्या नव्या धोरणामुळे नवीन गोल्ड एक्स्चेंज निर्मितीला वेग मिळण्याची शक्यता आहे. सध्या एमसीएक्स आणि एनएसईसारख्या कंपन्या गोल्ड एक्स्चेंज उघडण्याच्या दिशेने काम करत आहेत.

गोल्ड इन्व्हेस्टमेंट-गुंतवणुकीचा पर्याय केंद्र सरकार सोन्याला मजबूत गुंतवणूक पर्याय बनविण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. वर्ष 2013पासून सरकारने सोने गुंतवणुकीच्या धोरण निर्मितीला सुरुवात केली आहे. गोल्ड बाँड स्कीम, गोल्ड एक्स्चेंज या स्वरुपात प्रत्यक्ष पावलेही उचलली.

नवा पर्याय भिन्न सोन्यात पूर्वापार गुंतवणुकीपेक्षा नवा पर्याय भिन्न कसा ठरेल यावरून सोने गुंतवणुकरांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सोन्याची कमोडिटीच्या स्वरुपात ट्रेडिंग केली जात होती. म्युच्युअल फंडात ईटीएफद्वारे किंवा गोल्ड बाँडच्या स्वरुपात गुंतवणूक केली जात होती. नव्या निर्णयानुसार सोन्याला शेअर्सप्रमाणे इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीप्ट्स स्वरुपात स्पॉट मार्केटमध्ये ट्रेड केले जाऊ शकते.

सर्वसामान्यांना थेट लाभ इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीटद्वारे (EGR) सोन्याची नियमित खरेदी-विक्री केली जाईल. त्यामुळे सोन्याच्या योग्य दराची माहिती सर्वसामान्यांना होईल. सध्या भारतातील प्रत्येक शहरात सोन्याचे दर भिन्न आहेत. सोन्याची किंमत ज्वेलर्सद्वारे निश्चिच केली जाते. मात्र, एक्स्चेंजला सुरुवात झाल्यानंतर मागणीच्या आधारावर सोन्याची किंमत निश्चित केली जाईल. गोल्डच्या एक्स्चेंज ट्रेडवरील सोन्याची किंमत भारताची सोन्याची किंमत म्हणून गणली जाईल.

रिलायन्समध्ये होणार नेतृत्वबदल; मुकेश अंबानींनी दिले निवृत्तीचे संकेत, कोण होणार उत्तराधिकारी?

कॅशलेस नाही तर कॅश कॅश चा नारा, नव्या नियमांचा डिजिटल व्यवहारांना फटका

TRAIN FARE: एक रुट, दोन भाडे; रेल्वेचं तिकीट नेमकं ठरतं कसं?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.