Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share Market : ही कंपनी Nifty-50 मधून बाहेर, हे दावेदार मैदानात, गुंतवणूकदार होणार मालामाल

Share Market : Nifty-50 मधून ही कंपनी बाहेर पडणार आहे तर या कंपन्यांपैकी एक निफ्टीचा भाग असतील..

Share Market : ही कंपनी Nifty-50 मधून बाहेर, हे दावेदार मैदानात, गुंतवणूकदार होणार मालामाल
NSE यादीत होणार बदलImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 3:47 PM

नवी दिल्ली : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मध्ये दिवाळीनंतर उलटफेर होणार आहे. निफ्टी-50 मधील कंपन्यांमध्ये गुंतवणूकदार (Investor) मोठ्या आशेने गुंतवणूक करतात आणि मालामाल होतात. परंतू बाजाराच्या नियमानुसार, आता एक कंपनी या यादीतून (List) बाहेर पडणार आहे. तर इतर तीन कंपन्या या 50 कंपन्यांच्या यादीत येण्यासाठी दावेदारी ठोकणार आहेत..

येत्या काही आठवड्यात भारतातील प्रमुख निर्देशांक निफ्टी-50 मधून हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (HDFC Ltd)बाहेर पडणार आहे. HDFC आणि HDFC Bank यांच्यामध्ये विलिनीकरणाचा प्रस्ताव वेळेपूर्वीच पूर्ण होण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे निफ्टी-50 निर्देशांकात उलटफेर होण्याची शक्यता आहे.

विविध अहवालांचा आधार घेतला असता एचडीएफसीच्या जागी लोकप्रिय ब्रँड पिडिलाईट इंडस्ट्रीजचा (Pidilite Industries) समावेश होऊ शकतो. फेव्हिकॉल सारखी उत्पादने या कंपनीची आहेत. तर अडानी ग्रुप आणि अंबुजा सिमेंट्स (Ambuja Cements) यांचा निर्देशांकात समावेश होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

निफ्टी-50 इंडेक्समध्ये HDFC चा भार 5.5 टक्के इतका होता. त्यामुळे या शेअरची 1.3 ते 1.5 अरब डॉलर एवढी रक्कम निर्देशांकातून बाहेर जाईल. एचडीएफसीचा हा स्टॉक, शेअर बाजारातून या डिसेंबर अथवा जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत बाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

HDFC आणि HDFC Bank यांच्यामध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहचली आहे. या विलिनीकरणाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि इतर सर्व प्रमुख संस्थांनी मान्यता दिली आहे. तर शेअरहोल्डर्सची परवानगी मिळवण्यासाठी येत्या 25 नोव्हेंबर रोजी बैठक आयोजीत करण्यात आली आहे.

या घडामोडी घडत असताना एचडीएफसीचा शेअर आज गुरुवारी, दुपारी 1.40 टक्क्यांनी घसरुन 2,353.50 रुपयांवर व्यापार करत होता. गेल्या एका महिन्यात हा शेअर जवळपास 4.52 टक्के घसरला आहे. तर या वर्षाच्या सुरुवातीपासून यामध्ये 11 टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली आहे.

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.