नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर संकलनाच्या बाबतीत केंद्र सरकारने दुसऱ्यांदा मोठी कामगिरी केलीय. ऑक्टोबर 2021 मध्ये एकूण GST संकलन 1,30,127 कोटी रुपये होते. यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये जीएसटी संकलन 1.3 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले होते. ऑक्टोबरच्या ग्रॉस जीएसटी कलेक्शनमध्ये सीजीएसटी 23,861 कोटी रुपये, एसजीएसटी 30,421 कोटी रुपये, IGST रुपये 67,361 कोटी आणि सेस 8,484 कोटी रुपये आहे. उपकरामध्ये 699 कोटी रुपयांचे योगदान आयात केलेल्या वस्तूंवर लागू होणाऱ्या अधिभाराने केलेय.
केंद्राने म्हटले आहे की, ऑक्टोबरमधील जीएसटी संकलन आर्थिक पुनर्प्राप्तीशी सुसंगत आहे. दर महिन्याला तयार होणाऱ्या ई-वे बिलांद्वारेही देशाच्या अर्थव्यवस्थेतील पुनर्प्राप्तीची खातरजमा होते. सेमी कंडक्टर्सच्या पुरवठ्यातील अडचणींमुळे कार आणि इतर उत्पादनांच्या विक्रीत घट झाली नसती, तर जीएसटी संकलनाचा आकडा अधिक वाढला असता, असेही ते म्हणाले.
सरकारने IGST मध्ये नियमित सेटलमेंट म्हणून CGST चे 27,310 कोटी रुपये आणि SGST चे 22,394 कोटी रुपये सेटल केलेत. ऑक्टोबरमध्ये वस्तूंच्या आयातीतून मिळणारे उत्पन्न वार्षिक आधारावर 39 टक्क्यांनी जास्त होते. त्याचप्रमाणे देशांतर्गत व्यवहारातून मिळणाऱ्या उत्पन्नात वर्ष-दर-वर्ष आधारावर 19 टक्क्यांनी वाढ झाली.
आकडेवारीनुसार, भारतातील उत्पादन हालचालींमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे, जी पुनर्प्राप्तीच्या मार्गावर आहे. मागणीत झालेली वाढ आणि कोविड महामारीच्या परिस्थितीत सुधारणा झाल्यामुळे अर्थव्यवस्था सुधारत आहे. ऑक्टोबरमध्ये देशातील उत्पादन पीएमआय 55.9 होता. त्याच वेळी, सप्टेंबरमध्ये ते 53.7 आणि ऑगस्टमध्ये 52.3 होते. 50 पेक्षा जास्त पीएमआय म्हणजे अर्थव्यवस्था विस्तारत आहे. फेब्रुवारीनंतरचा हा सलग चौथा महिना असून या आकडेवारीत वाढ होताना दिसत आहे.
संबंधित बातम्या
Gold Rate Today: धनत्रयोदशीपूर्वीच मोठी बातमी! सोने स्वस्त; तोळ्याचा भाव काय?
मोठी बातमी ! देशात उघडली आणखी एक नवी बँक, अधिक व्याजासह ‘या’ सुविधा घरबसल्या मिळणार
October 2021 GST collection again crossed 1.3 lakh crore an increase of 24 percent