Deloitte Centre : माहिती तंत्रज्ञानात प्रगतीची वाट, भुवनेश्वरमध्ये डेलॉईट कॅपॅसिटी एन्हान्समेंट सेंटर, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते उद्धघाटन
Deloitte Centre : ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथील ICOMC टॉवर येथे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी डेलॉईट सेंटरचे उद्धघाटन केले.
भुवनेश्वर, ओडिशा : ओडिशा (Odisha) राज्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या विकासात आणखी भर पडणार आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शुक्रवारी भुवनेश्वरमध्ये डेलॉइटच्या (Deloitte) आधुनिक सुविधेचे उद्घाटन केले. हे अतिभव्य सेंटर 55,000 चौरस फुटांच्या परिसरात फुलले आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भुवनेश्वर येथील ICOMC टॉवर येथे क्षमता वृद्धिंगत केंद्राचे उद्घाटन केले.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या उद्धघाटन कार्यक्रमाची माहिती ट्विटरवर शेअर केली. अशा प्रकारची कंपनी सरकारच्या विशेष पुढाकाराने पूर्व भारतात प्रथमच सुरू करण्यात आली आहे. यामुळे ओडिशातील कलागुणांना मोठ्या संधी उपलब्ध होतील, अशी आशा केंद्रीय मंत्री प्रधान यांनी व्यक्त केली.
या डेलॉइट केंद्राबाबत राज्य सरकारने मोठी अपेक्षा व्यक्त केली. या केंद्रामुळे ओडिशाच्या माहिती तंत्रज्ञानाच्या विकासात आणखी वाढ होईल,असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. देशभरात विस्तार करण्याच्या डेलॉइटच्या उद्दिष्टाचा हा एक भाग आहे. या केंद्रामुळे राज्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
A momentous day for Odisha.
Sharing some glimpses of the inauguration of @Deloitte’s Capability Enhancement Centre in Bhubaneswar. A first-of-its-kind initiative in eastern India, this will open up new possibilities for the talented human capital of Odisha. @PIB_India pic.twitter.com/c8cINWSv6A
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) January 6, 2023
याद्वारे कंपनीला माहिती तंत्रज्ञान, ऑडिटिंग, कन्सल्टन्सी, नॉलेज सर्व्हिसेस इत्यादी विविध पदांवर हजाराहून अधिक लोकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. भुवनेश्वरमध्ये डेलॉइट सेंटर सुरू केल्याने ओडिशा हे जागतिक दर्जाच्या कंपन्यांसाठी प्रमुख ठिकाण बनणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले.
डेलॉईटसाठी ठाणे-मुंबई, गुरुग्राम आणि कोईम्बतूर नंतर भुवनेश्वर हे चौथे महत्वपूर्ण भारतीय शहर बनले आहे. या ठिकाणी कंपनीचे प्रमुख कार्यालय आहे. याठिकाणी नवीनतम तंत्रज्ञान, विविध प्रकारच्या उपाय योजना, कुशल कामगार या सर्व सर्वोत्तम बाबी असतील.
भारतातील 50 दशलक्ष व्यक्तींच्या जीवनावर, विशेषत: महिला आणि मुलींच्या जीवनामध्ये शिक्षण आणि कौशल्य-निर्मिती यासाठी Deloitte प्रयत्न करणार आहे.