Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेलचे भाव अपडेट, जाणून घ्या किती बसणार झळ

Petrol Diesel Rate Today : तेल कंपन्यांनी सकाळीच पेट्रोल-डिझेलचा दर जाहीर केला. राज्यातील काही शहरात इंधनाची किंमत वाढली तर काही या ठिकाणी झाले स्वस्त. जाणून घ्या काय आहे भाव

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल-डिझेलचे भाव अपडेट, जाणून घ्या किती बसणार झळ
पेट्रोल-डिझेलचा भाव काय
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 8:33 AM

नवी दिल्ली : देशात कंपन्या फायद्यात आहेत. पण नागरिकांना जादा दराने पेट्रोल-डिझेल खरेदी करावे लागत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे इथेनॉलचा प्रयोग करण्याचा मनसुबा मांडत आहे. तर देशभरात पुन्हा हजारो पेट्रोल पंप उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी दोन दिवसांपूर्वी देशातील कानाकोपऱ्यात याविषयीची जाहिरात दिली आहे. केंद्रीय पातळीवर किती गोंधळाची स्थिती आहे, हे यातून स्पष्ट होते. विरोधी पक्ष मोट बांधण्यात व्यस्त आहेत. नागरी समस्या आणि लोकांच्या अडचणींवर त्यांची धार बोथट झाली आहे. नागरिकांच्या रोष आणि नाराजीनंतर केंद्र सरकार आता पेट्रोल-डिझेल कधी स्वस्त करणार याकडे सर्वसामान्यांचे डोळे लागले आहे. तेल कंपन्यांनी सकाळीच पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol Diesel Price) जाहीर केला. राज्यातील काही शहरात इंधनाची किंमत वाढली तर काही या ठिकाणी झाले स्वस्त. जाणून घ्या काय आहे भाव

क्रूड ऑईलची झेप आज 2 जुलै रोजी सकाळी 6 वाजता पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे भाव जाहीर केले. जागतिक बाजारात कच्चा तेलात चढउतार आहे. आज कच्चा तेलाने झेप घेतली. ब्रेंट क्रूड ऑईल 75.41 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलचा भाव 70.64 डॉलर प्रति बॅरल झाला.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

हे सुद्धा वाचा
  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 93.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.36 तर डिझेल 92.88 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.45 रुपये आणि डिझेल 92.99 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.44 तर डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 106.52 पेट्रोल आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.33 आणि डिझेल 93.83 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 107.40 आणि डिझेल 93.90 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.83 तर डिझेल 94.30 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.34 तर डिझेल 92.88 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.03 तर डिझेल 94.52 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 109.33 तर डिझेल 95.73 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.21 आणि डिझेल 92.72 रुपये प्रति लिटर
  14. रायगड पेट्रोलचा भाव 106.81 आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
  15. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.77 रुपये तर डिझेल 93.29 रुपये प्रति लिटर
  16. ठाणे पेट्रोलचा दर 106.45 रुपये तर डिझेल 94.41 रुपये प्रति लिटर

केंद्र आणि राज्य सरकार कमाईतून गब्बर

  • केंद्र सरकार गेल्या पाच वर्षांतील कमाईचे आकडे सादर केले
  • केंद्र आणि राज्य सरकार दोघांना इंधनाच्या करातून जोरदार फायदा झाला
  • 2022-23 च्या 9 महिन्यांत 5,45,002 कोटी रुपयांची कमाई पेट्रोलियम उत्पादनातून झाली
  • आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 7,74,425 कोटी, 2019-20 मध्ये 5,55,370 कोटी रुपये
  • आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 5,75,632 कोटी, 2017-18 मध्ये 5,43,026 कोटी रुपये फायदा झाला

एक लिटरवर इतका नफा गेल्या वर्षभरापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा फरक दिसलेला नाही. बाजारात तेलाच्या किंमतीत मामूली बदल दिसतो. जवळपास 345 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी तफावत दिसलेली नाही. एका अहवालानुसार, तेल कंपन्यांना प्रति लिटर 10 रुपयांपेक्षा जास्त नफा झाला आहे.

“महादेव मुंडेचे खुनी 15 दिवसात जेलमध्ये...”, धस यांचा पुन्हा हल्लाबोल
“महादेव मुंडेचे खुनी 15 दिवसात जेलमध्ये...”, धस यांचा पुन्हा हल्लाबोल.
पालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का, महिला नेत्या धनुष्यबाण हाती घेणार
पालिका निवडणुकीच्या तोंडावर धक्का, महिला नेत्या धनुष्यबाण हाती घेणार.
'वाल्मिक खडा तो वो सरकार से बडा...'; आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल
'वाल्मिक खडा तो वो सरकार से बडा...'; आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवणार, उद्धव ठाकरेंची रणनिती ठरली
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात निवडणूक लढवणार, उद्धव ठाकरेंची रणनिती ठरली.
कराडला ICU मध्ये ठेवणारा डॉक्टर वादाच्या भोवऱ्यात; दमानियांकडून आरोप
कराडला ICU मध्ये ठेवणारा डॉक्टर वादाच्या भोवऱ्यात; दमानियांकडून आरोप.
VIDEO : मराठी समालोचनावरुन हॉटस्टारच्या कार्यालयात धडकले मनसेचे नेते
VIDEO : मराठी समालोचनावरुन हॉटस्टारच्या कार्यालयात धडकले मनसेचे नेते.
परंड्यात एसटी बसचा अपघात, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर बस आदळली
परंड्यात एसटी बसचा अपघात, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर बस आदळली.
त्या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करा, तृप्ती देसाईंची फडणवीसांकडे मागणी
त्या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करा, तृप्ती देसाईंची फडणवीसांकडे मागणी.
‘छावा’ सिनेमातील ‘तो’ सीन काढला; मंत्री उदय सामंत यांची माहिती
‘छावा’ सिनेमातील ‘तो’ सीन काढला; मंत्री उदय सामंत यांची माहिती.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; अपात्र तरी भरला अर्ज,पैसे घेणार रिटर्न?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी; अपात्र तरी भरला अर्ज,पैसे घेणार रिटर्न?.