OLA Share : शेअर बाजारात OLA ची धमाकेदार एन्ट्री, 3 दिवसात गुंतवणूकदारांचे सुरु झाले ‘अच्छे दिन’

OLA Share : ओला इलेक्ट्रिककडे भविष्यातील कंपनी म्हणून पाहिल जातं. शेअर बाजारात या कंपनीने दमदार एन्ट्री केली आहे. अवघ्या 3 दिवसात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. या कंपनीच मार्केट कॅपिटलायजेशन 51,000 कोटी रुपयापेक्षा जास्त झालय.

OLA Share : शेअर बाजारात OLA ची धमाकेदार एन्ट्री, 3 दिवसात गुंतवणूकदारांचे सुरु झाले 'अच्छे दिन'
ola electric share
Follow us
| Updated on: Aug 13, 2024 | 2:30 PM

ओला इलेक्ट्रिक देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक 2-व्हीलर कंपनीपैकी एक आहे. नुकतीच या कंपनीने शेयर बाजरात एंट्री केली आहे. ओला इलेक्ट्रिक कंपनीने शेयर बाजरात लिस्ट होताच गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. कपंनीच्या शेयरने 3 दिवसात गुंतवणूदारांना 71 टक्के रिर्टन दिलं आहे. ओला इलेक्ट्रिकच्या शेयरची IPO प्राइस 76 रुपये होती. कंपनीच्या शेयर लिस्टिंगची प्राइस सुद्धा याच्याच आसपास होती. तीन दिवसात या शेयरच्या प्राइसमध्ये 71 टक्के उसळी दिसून आलीय. मंगळवारी दुपारी ओला इलेक्ट्रिकचा शेयर 12 च्या सुमारास 114 रुपयाच्या आसपास ट्रेड करत होता. पण दिवसाच्या व्यवहारात हा शेयर 131 रुपयापर्यंत पोहोचला. या कंपनीच मार्केट कॅपिटलायजेशन 51,000 कोटी रुपयापेक्षा जास्त झालय.

लिस्टिंगनंतर कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची पहिली बैठक 14 ऑगस्टला होईल, अशी कंपनीने घोषणा केली आहे. त्याचदिवशी कंपनी एप्रिल-जून क्वार्टरचे रिजल्ट जाहीर करेल. त्याशिवाय कंपनी 15 ऑगस्टला आपल्या इलेक्ट्रिक बाइकची झलक सुद्धा दाखवणार आहे. कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर 15 ऑगस्टलाच लॉन्च केली होती.

शेअरचा अपर सर्किटला टच

ओला इलेक्ट्रिकचा शेयर लिस्ट होण्याआधी ग्रे मार्केटमध्ये डिस्काऊटवर मागितला जात होता. त्यावेळी कंपनीच्या शेयरची किंमत 73 रुपयापर्यंत गेली होती. पण ओला इलेक्ट्रिक शेयरच्या लिस्टिंगने ग्रे मार्केटचे सर्व अंदाज उद्धवस्त केले. पहिल्याच दिवशी कंपनीच्या शेयरने 20 टक्के म्हणजे अपर सर्किटला टच केलं.

वर्षाला किती इलेक्ट्रीक व्हीकल निर्मितीच लक्ष्य?

ओला इलेक्ट्रिकने अलीकडेच आयपीओ लॉन्च केला होता. आयपीओमधून जमवलेल्या पैशाचा वापर विस्तारीकरणासाठी करणार असं कंपनीच म्हणणं होतं. ओला इलेक्ट्रिक आपल्या फ्यूचर फॅक्टरीला वेगाने डेवलप करत आहेत. ज्यातून वर्षाला 1 कोटी इलेक्ट्रिक व्हीकल उत्पादनाची क्षमता असेल.

'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.