जुने ATM कार्ड कालबाह्य होऊनही नवे कार्ड घरी पोहोचले नाही, मग करायचे काय?
जर तुमचे डेबिट कार्ड कालबाह्य झाले असेल किंवा कालबाह्य होणार असेल, तर बँकेच्या नियमांनुसार, डेबिट कार्डची मुदत संपल्यापासून तीन महिन्यांपूर्वी बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर कार्ड पाठवले जाते. मात्र एटीएम कार्डची मुदत संपल्यानंतरही तुम्हाला कार्ड मिळाले नाही, तर तुम्हाला काय करावे लागेल? हे जाणून घेऊयात.
नवी दिल्लीः सध्याच्या काळात अनेक बँका त्यांच्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून ग्राहकांना घर बसल्या त्यांचे काम सहज उरकता येईल. इंटरनेटच्या युगात बहुतेक लोक आपलं काम ऑनलाईन पूर्ण करण्याचा प्राधान्य देतात. पण असे असूनही काही गोष्टींचे महत्त्व आजही पूर्वीप्रमाणेच आहे. एटीएम कार्डानंतर हे काम बऱ्याच अंशी सोपे झालेय, ऑनलाईन व्यवहार करतानाही त्याची गरज असते. मात्र काही काळानंतर पुन्हा एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड बनवावे लागते.
तीन महिन्यांपूर्वी डेबिट कार्ड नोंदणीकृत पत्त्यावर पाठवले जाते
जर तुमचे डेबिट कार्ड कालबाह्य झाले असेल किंवा कालबाह्य होणार असेल, तर बँकेच्या नियमांनुसार, डेबिट कार्डची मुदत संपल्यापासून तीन महिन्यांपूर्वी बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर कार्ड पाठवले जाते. मात्र एटीएम कार्डची मुदत संपल्यानंतरही तुम्हाला कार्ड मिळाले नाही, तर तुम्हाला काय करावे लागेल? हे जाणून घेऊयात. विशेष म्हणजे यासंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) स्वतः माहिती ग्राहकांना दिलीय.
SBI ने ट्विट करून दिली माहिती
भारतीय स्टेट बँकेने (SBI) ग्राहकांना ट्विट करून एटीएम कार्डची मुदत संपल्यानंतर नवीन कार्ड घरी पोहोचले नाही, तर काय करावे याबद्दल सांगितलेय. खरं तर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या अधिकृत ट्विटर खात्याला टॅग करत ग्राहकाने लिहिले आहे की, माझ्या जुन्या एटीएम कार्डची मुदत 10/21 रोजी संपुष्टात आली, परंतु तरीही मला माझे नवीन कार्ड अद्याप मिळालेले नाही. विशेष म्हणजे त्या ग्राहकाला SBI ने ट्विट करून उत्तर दिलेय. SBI ने लिहिते की, डेबिट कार्डची मुदत संपण्याच्या तीन महिन्याआधी बँक ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर नवीन कार्ड पाठवते. पण त्यासाठी हे कार्ड ग्राहकाने गेल्या 12 महिन्यांत एकदा तरी वापरले असले पाहिजे.
@TheOfficialSBI My old ATM card expired on 10/21 but still I didn’t recived my new card .
— RATAN BAHADUR MANGAR (@ratan_mangar) November 24, 2021
या लोकांना कार्ड पाठवले जातात
बँकेच्या नियमांनुसार, जर तुम्ही गेल्या 12 महिन्यांत एकदाही कार्ड वापरले नसेल, तर तुमच्या घरी ऑटोमॅटिक कार्ड (ATM) पाठवले जाणार नाही. त्यामुळे 12 महिन्यांतून एकदा कार्ड वापरणे आवश्यक आहे. याशिवाय या कार्डधारकांचे खाते पॅनकार्डशी लिंक करणेही आवश्यक आहे. तसेच ज्या ग्राहकांचे ‘फायनान्शिअल इन्क्लुजन अकाऊंट’ नाही, त्यांच्या घरी कार्ड पाठवले जाते.
कार्ड न मिळाल्यास बँकेच्या शाखेत जा
या सर्व प्रक्रियेनंतरही तुमचे कार्ड तुमच्या घरी पोहोचले नसेल तर इतर मार्गही स्वीकारू शकता. त्यामुळे ग्राहक त्याच्या/तिच्या बँक शाखेत इतर सर्व बाबींसाठी KYC कागदपत्रांसह नवीन कार्डसाठी अर्ज करू शकतो.
संबंधित बातम्या
रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर पुन्हा बदलले; आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे
‘ही ‘ विदेशी कंपनी करणार एक हजार अभियंत्यांची भरती; मिळणार मोठे पॅकेज