तुमच्याकडे 1 रुपया, 5 रुपये आणि 10 रुपयांच्या जुन्या नोटा असतील तर 5 लाख कमावण्याची सुवर्णसंधी
currency notes | 1000 रुपयांच्या नोटेवर 000786 अशी सिरीज असेल तर त्यासाठी साधारण 1900 रुपये मिळू शकतात. या नोटांवर माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांची स्वाक्षरी आहे. यापूर्वी 786 या सिरीज नंबरच्या नोटेसाठी खरेदीदारांनी तीन लाख रुपये मोजल्याचे दिसून आले आहे.
नवी दिल्ली: तुमच्याकडे 1 रुपया, 5 रुपये आणि 10 रुपयांच्या जुन्या नोटा असतील तर तुम्हाला लाखो रुपये कमावण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. या जुन्या नोटांसाठी सध्या बाजारपेठेत 1 लाख ते 5 लाख रुपये मिळू शकतात. या नोटांचा सिरीज नंबर 12345 किंवा 123456 ने सुरु होत असेल तर त्या नोटेसाठी साधारण पाच लाख रुपये मिळू शकतात. याशिवाय, 786 या सिरीज नंबरच्या नोटेसाठीही चांगले पैसे मिळू शकतात.
याशिवाय, 1000 रुपयांच्या नोटेवर 000786 अशी सिरीज असेल तर त्यासाठी साधारण 1900 रुपये मिळू शकतात. या नोटांवर माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांची स्वाक्षरी आहे. यापूर्वी 786 या सिरीज नंबरच्या नोटेसाठी खरेदीदारांनी तीन लाख रुपये मोजल्याचे दिसून आले आहे. तसेच 1943 सालच्या 10 रुपयांच्या नोटेसाठी साधारण 25000 रुपये मिळू शकतात. तर व्हिक्टोरिया राणीची छबी असणाऱ्या नाण्यांसाठी क्विकर या संकेतस्थळावर 1.5 लाख रुपये मिळू शकतात.
‘5 आणि 10 रुपयांची नाणी विका, लखपती व्हा’
सध्या बाजारात 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांची मागणी वाढत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ती नाणी आहेत, ज्यांच्यावर वैष्णव देवीचा फोटो छापण्यात आला आहे. या नाण्यांना 2002 मध्ये छापण्यात आलं होतं. देवीचे फोटो हे 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांवर छापण्यात आले आहेत. देवीचा फोटो असल्यामुळे मार्केटमध्ये याची मागणी वाढली आहे.
या नाण्यांना विकत घेण्यासाठी लोक तब्बल 10 लाख रुपये देण्यासाठी तयार आहे. खरंतर, हल्ली अशी नाणी मिळत नाहीत. त्यामुळे ज्यांच्याकडे ती आहेत त्यांच्यासाठी शुभ मानली जातात. देवीचा फोटो असलेली नाणी आपणही जवळ ठेवली तर आपली भरभराट होईल अशी लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या नाण्यांची किंमत वाढली आहे. त्यामुळे तुमच्याकडेही जर देवीचा फोटो असलेली जुनी नाणी आहेत तर तुम्ही ती इंडियामार्टच्या वेबसाईटवर जाऊन विकू शकता. नाण्यांना विकत घेण्यासाठी लोक या वेबसाईटवर वारंवार सर्च करत आहेत.
संबंधित बातम्या:
जुन्या 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा मार्चनंतर चालणार नाहीत, RBI ची माहिती
आता 5, 10 आणि 100 च्या जुन्या नोटा होणार बाद, पण त्याआधी वाचा ‘हा’ नियम
नोटबंदींमध्ये बंद झालेल्या 500-1000 जुन्या नोटा पुन्हा बदलता येणार?, वाचा काय आहे व्हायरल सत्य