Income Tax Saving: नवीन की जुनी? कोणती आयकर प्रणाली निवडावी, वाचा फायद्याचे गणित

How can save income tax:अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कर प्रणालीत बदल केला आहे. स्‍टँडर्ड डिडक्‍शन वाढवले आहे. त्यामुळे 7.75 रुपये वार्षिक उत्पन्नावर कर लागणार नाही. परंतु तुमचे त्यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास कर लागणार आहे. तुमचे उत्पन्न दहा लाख असेल तर नवीन करप्रणालीत 42,500 रुपये कर लागणार आहे.

Income Tax Saving: नवीन की जुनी? कोणती आयकर प्रणाली निवडावी, वाचा फायद्याचे गणित
फायदा की डोक्याला टेन्शन
Follow us
| Updated on: Jul 26, 2024 | 1:10 PM

अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी मंगळवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी नवीन आयकर प्रणाली लोकप्रिय करण्यावर भर दिला. त्यासाठी नवीन आयकर प्रणालीत स्‍टँडर्ड डिडक्‍शन 50,000 वरुन वाढून 75,000 रुपये करण्यात आले. तसेच टॅक्स स्लॅब बदलण्यात आला. नवीन कर प्रणालीत आता 7.75 रुपये वार्षिक उत्पन्न असेल तर एक रुपयाही कर लागणार नाही. तसेच जुन्या कर प्रणालीनुसार तुमचा पगार दहा लाख असेल तर तुम्हाला काहीच कर लागणार नाही. मात्र, त्यासाठी नियोजनबद्ध गुंतवणूक करावी लागणार आहे.

नवीन करप्रणालीत किती लागणार कर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कर प्रणालीत बदल केला आहे. स्‍टँडर्ड डिडक्‍शन वाढवले आहे. त्यामुळे 7.75 रुपये वार्षिक उत्पन्नावर कर लागणार नाही. परंतु तुमचे त्यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास कर लागणार आहे. तुमचे उत्पन्न दहा लाख असेल तर नवीन करप्रणालीत 42,500 रुपये कर लागणार आहे.

नवीन कर पद्धत   मागील वर्षाची नवीन कर पद्धत आताची नवीन कर प्रणाली 
उत्पन्न (वार्षिक)   10,00000 रुपये  10,00000 रुपये
 स्‍टँडर्ड डिडक्‍शन  50,000 रुपये  75,000 रुपये
 करपात्र उत्पन्न  950,000 रुपये  925,000 रुपये
एकूण कर  52,500 रुपये  42,500 रुपये  10,000 रुपये फायदा 

जुन्या करप्रणालीचा दहा लाखांपर्यंत असा घ्या फायदा

  1. स्‍टॅडर्ड डिडक्‍शन 50 हजार रुपये सूट म्हणजे दहा लाखांऐवजी 9.50 लाख रुपयांना कर
  2. PPF, EPF, ELSS, NSC सारखी योजनेत 80C नुसार गुंतवणूक करा अन् 1.5 लाख रुपये सुट मिळवा. म्हणजे 8 लाख रुपयांवर कर द्यावा लागणार
  3. राष्ट्रीय पेंशन योजनेत (NPS) 50,000 रुपये गुंतवल्यावर आयकरच्या सेक्शन 80CCD (1B) नुसार 50 हजार रुपये करसवलत मिळते. म्हणजे 7.50 लाख रुपयांना कर लागणार.
  4. गृहकर्जावरील व्याजावर 24B नुसार 2 लाख रुपये बचत करता येते. म्हणजे करप्राप्त उत्पन्न 5.50 लाख रुपये
  5. आयकरच्या 80D नुसार वैद्यकीय विमावर 25 हजार रुपये कर बचत. तसचे आई-वडिलांच्या नावावर विमा घेतल्यास आणखी 50,000 रुपये सूट मिळते. म्हणजे आयकर असणारे उत्पन्न 4.75 लाख
  6. जून्या योजनेनुसार हे उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी आहे. त्यामुळे त्याला कोणताही कर लागणार नाही.
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.