Olectra | ऑलेक्ट्राची जोरदार कामगिरी, घौडदौड अधिक जोमात

Olectra | ऑलेक्ट्रा ग्रिनटेक लिमिटेड कंपनीने पुन्हा एकदा जोरदार कामगिरी बजावली. या कंपनीने तिमाही आणि पहिल्या सहामाहीत तगडी कामगिरी करुन दाखवली. या कंपनीने या आर्थिक वर्षात 18.58 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. तर कंपनीच्या नफ्यात 150 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. कंपनीच्या या कामगिरीने सर्वांनाच दुप्पट बळ आले आहे.

Olectra | ऑलेक्ट्राची जोरदार कामगिरी, घौडदौड अधिक जोमात
Follow us
| Updated on: Nov 05, 2023 | 2:28 PM

मुंबई | 5 नोव्हेंबर 2023 : भारतातील प्रमुख इलेक्ट्रिक बस उत्पादक कंपनी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेड (OGL) ने पुन्हा तुफान कामगिरी केली. कंपनीची घौडदौड सुरुच आहे. या तिमाहीत पण कंपनीने षटकार हाणला आहे. दुसऱ्या तिमाहीचे आणि सहामाहीचे एकत्रित निकाल कंपनीने जाहीर केले. त्यातील आकडेवारी सर्वांनाच बळ देणारी आहे. या कंपनीने जोरदार कामगिरी बजावली आहे. कंपनीने तिमाही आणि पहिल्या सहामाहीत बक्कळ नफा कमावला. कंपनीने 2023-2024 या आर्थिक वर्षात 18.58 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या आर्थिक निष्कर्षांना आधिकृत मान्यता देण्यात आली.

अशी आहे कामगिरी

या कंपनीच्या महसूलात चालू आर्थिक वर्षात 2023-24 मध्ये 73 टक्के वाढ झाली. यंदा कंपनीचा महसूल 307.16 कोटी इतका आहे. कंपनीनीचे वितरण सक्षम आहे. त्यात वाढ झाली आहे. वितरणातील वाढीमुळे महसूलात मोठी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनीच्या महसूलात 14 टक्क्यांची वाढ झाली. कंपनीचा महसूल 523.18 कोटी रुपयांपर्यंत पोहचला. वितरणामुळे ही लक्षणीय वाढ दिसून आली. कंपनीने 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या कालावधीसाठी 2.95 टक्क्यांच्या तुलनेत 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या कालावधीसाठी 4.40 रुपये प्रति शेअर कमाई केली.

हे सुद्धा वाचा

इलेक्ट्रिक बसची मोठी मागणी

या निकालानुसार, या तिमाहीत ऑलेक्ट्राने 154 इलेक्ट्रिक वाहने वितरीत केली. 2022-23 मध्ये या कंपनीने 111 बसेस वितरीत केल्या होत्या. त्या तुलनेत ऑलेक्ट्रा ग्रीनटेकच्या वितरणात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. या दरम्यान कंपनीच्या वितरणात 39 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीने आतापर्यंत 1437 इलेक्ट्रिक बसेस वितरीत केल्या आहेत. सध्या या कंपनीकडे 8,208 इलेक्ट्रिक बसची मागणी नोंदवण्यात आली आहे.

नवीन कारखान्याचे काम वेगात

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे के व्ही प्रदीप यांनी या घौडदौडीची माहिती दिली. कंपनी उत्पादन क्षमता वाढवण्यावर आणि तंत्रज्ञान क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. दीडशे एकरांवर उभारत असलेल्या सीतारामपूर कारखान्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. या नवीन कारखान्यामुळे कंपनीची उत्पादन क्षमता आणखी वाढेल, असे के व्ही प्रदीप यांनी सांगितले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.