Indra Nooyi : पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून केले काम, सेल्फ मेड वूमन म्हणून उगीच झाला नाही सन्मान
Indra Nooyi : पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या इंद्रा नूयी यांचे नाव अनेकांना माहिती असेलच. त्यांच्यामुळेच या शीतपेयाला भारतीय बाजारपेठेत पाय रोवता आले. आज त्यांच्या कर्तृत्वाचा झेंडा सगळीकडे फडकला. चार भारतीय महिलांना सेल्फ मेड बहुमानाने सन्मानित करण्यात आलं. त्यात इंद्रा यांचा पण समावेश आहे.
नवी दिल्ली : कधी काळी ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्ट असलेली महिला स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करत असेल तर ही काही साधी बात तर नक्कीच नाही. प्रत्येक क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी होती. त्याकाळात इंद्र नूयी (Indra Nooyi) स्वतःची ओळख तयार करत होत्या. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या इंद्रांचे नाव अनेकांना माहिती असेलच. त्यांच्यामुळेच या शीतपेयाला (Cold Drink) भारतीय बाजारपेठेत पाय रोवता आले. आज त्यांच्या कर्तृत्वाचा झेंडा सगळीकडे फडकला. चार भारतीय महिलांना सेल्फ मेड (Self Made Woman) बहुमानाने सन्मानित करण्यात आलं. त्यात इंद्रा यांचा पण समावेश आहे.
चार महिलांनी काढले नाव स्वतःच्या हिंमतीवर कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या जगभरातील 100 सर्वात श्रीमंत महिलांची एक यादी फोर्ब्सने जाहीर केली. त्यात चार भारतीय महिलांनी नाव काढले आहेत. अर्थात या चारही महिला इंडो-अमेरिकन आहेत. पण त्यांचे मूळ भारतीय आहे. यामध्ये इंद्रा नूयी यांचे पण नाव आहे.
ये दिल मांगे मोर पेप्सी हा ब्रँड आठवला का? कोल्ड्रिंक्समध्ये थम्सअपला मोठा पर्याय म्हणून पेप्सीचे नाव येते. 1998 साली ये दिल मांगे मोर या जाहिरातींनी तरुणाईवर गारुड घातलं होतं. तर हा ब्रँड पेप्सिकोने (Pepsico) बाजारात उतरवला होता. इंद्रा यांनी पेप्सिकोच्या पूर्व चेअरमन आणि सीईओ (Chairperson and CEO) म्हणून 24 वर्षे काम केले. त्या 2019 मध्ये निवृत्त झाल्या. 2007 ते 2019 पर्यंत त्या पेप्सिकोच्या अध्यक्ष होत्या. फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत त्या 77 व्या क्रमांकावर आहेत.
कष्टाला यशाची झालर इंद्रा नूयी यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. पहिल्या नोकरीसाठी त्यांना वेस्टर्न सूट खरेदी करायचा होता. पैसे जमविण्यासाठी त्यांनी संध्याकाळी रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरी केली. त्यावेळी त्या येल स्कूल ऑफ मॅनेजमेंट मध्ये शिक्षण घेत होत्या.
तामिळनाडूमध्ये झाला जन्म इंद्रा नूयी यांच्या जन्म 1955 मध्ये भारतातील तामिळनाडू राज्यात झाला होता. इंद्रा नूयी यांचे वडील स्टेट बँक ऑफ हैदराबाद मध्ये काम करत होते. तर आजोबा हे जिल्हा न्यायालयात न्यायाधीश होते. इंद्रा या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयात पदवीधर आहेत.
आत्मचरित्र गाजले इंद्रा नूयी यांनी स्वतःच्या आयुष्यातील घटनांवर आत्मचरित्र लिहिले. हे 300 पानी पुस्तक आहे. या पुस्तकाचं नाव ‘माय लाइफ इन फुल : वर्क, फॅमिली एंड अवर फ्यूचर’’ (My Life in Full: Work Family and Our Future) असे आहे. हे पुस्तक चांगलेच गाजले. अनेकांना त्यातून प्रेरणा मिळाली.
जॉनसन अँड जॉनसन पासून सुरुवात इंद्रा नूयी यांनी कॉलेजनंतर जॉनसन अँड जॉनसन कंपनीपासून करिअरचा प्रवास सुरु केला. त्या प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून काम करत होत्या. 1980 मध्ये त्यांनी येल स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळवली. त्यानंतर त्या बोस्टन कन्सलटिंग समूहात सहभागी झाल्या.
कोट्यवधींची नेटवर्थ फोर्ब्सननुसार 1 जून, 2023 रोजीपर्यंत इंद्रा यांची एकूण संपत्ती 350 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी होती. म्हणजे जवळपास 2890 कोटी रुपये होती. इंद्रा नूयी यांची जगातील सर्वात यशस्वी आणि चांगल्या सीईओमध्ये गणना होते. त्यांच्या नेतृत्वात पेप्सिकोचा वार्षिक महसूल प्रचंड वाढला. या कंपनीची 2006 मध्ये 35 अब्ज डॉलर इतकी उलाढाल होती. 2017 मध्ये ती वाढून 63.5 अब्ज डॉलरवर पोहचली.