Photo QR code: व्हाट अॅन आयडिया सरजी! फोटोसोबत क्यूआर कोड; प्रसिद्धीसोबत बिझनेसही

Photo QR: डिजिटल पेमेंटमुळे आता व्यवहार करणे अत्यंत सोप्पे झाले आहे. क्यूआर कोड स्कॅनकर अगदी एक रुपयांपासून ते लाखांपर्यंतचे पेमेंट अगदी सहज करता येते. युपीआय पेमेंट अॅपमध्ये पेटीएमने एक पाऊल पुढे टाकत नवीन फोटो क्यूआर (Photo QR) हे फिचर आणले आहे

Photo QR code: व्हाट अॅन आयडिया सरजी! फोटोसोबत क्यूआर कोड; प्रसिद्धीसोबत बिझनेसही
बिझनेससोबत प्रसिद्धीहीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 11:17 AM

डिजिटलायझेशनमुळे व्यवहारात(Digital Transaction) पूर्वीपेक्षा गती आली आहे. व्यवहार करतानाचा द्रविडी प्राणायम कमी झाला आणि आता तर रोखीऐवजी ऑनलाईन पेमेंट प्रचंड पटीने वाढले आहेत. देशात अनेक युपीआय पेमेंट अॅपमुळे (UPI Payment App) सुरक्षित आणि झटपट व्यवहाराची नांदी सुरु झाली आहे. व्यापा-यांसाठी तर ही मोठी सोय झाली आहे. सुट्टे पैसे, चिल्लर यासोबतच नोट बदलून देण्याची कटकट ही नाहिशी झाली आहे. डिजिटल पेमेंट अॅप पेटीएमने (Paytm) तर दुकानदारांसाठी खास फिचर आणले आहे. फोटो क्यूआर कोड (Photo QR Code) या फिचरने जून्या क्यूआर कोड पाट्यांची जागा घेतली आहे. त्यावर दुकानदाराचा झक्कास फोटो असतो. दुकानदाराची प्रसिद्धी तर होतेच पण त्याचा व्यवसाय ही वृद्धींगत होतो. आहे की नाही आयडीयाची कल्पना. या फोटो क्यूआर कोडने सध्या धुमाकूळ घातला आहे. पाणीपुरीवाल्यापासून ते मोठ्या व्यापा-यापर्यंत हे नवीन फोटो क्युआर कोड सहज दृष्टीस पडतो. त्याची सध्या बाजारात क्रेझ आली आहे. काय आहे बिझनेस वृद्धीगंत करण्याचा फॉर्म्युला ते पाहुयात.

20 लाख व्यापा-यांना बळ

Paytm ने व्यापारी वर्गाला आकर्षित करण्यासाठी हे फिचर बाजारात आणले आहे. त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. प्लास्टिकच्या पाटीवर क्युआर कोडसह दुकानदाराचा झक्कास फोटो हे या फोटो क्युआर कोडचे अनोखं वैशिष्ट्य आहे. ही क्यूआर कोडची सुधारीत आवृत्ती आहे. यामुळे दुकानदाराची प्रसिद्धी तर होतेच पण त्याच्या व्यवसायाला ही बळ मिळते. या अनोख्या फिचरमुळे देशभरातील 20 लाख व्यापारी थेट पेटीएमशी जोडल्या गेलेआहेत. एका आयडीने व्यापा-यांना तर बळ दिलेच पण पेटीएमलाही ग्राहक जोडण्यात अग्रेसर केले.

हे सुद्धा वाचा

Photo QR ने वाढवा बिझनेस

व्यापा-याला त्याच्या आवडीनुसार, फोटो क्युआर कोड करता येतो. त्याचा फोटो निवडता येतो. त्याच्या ब्रँडसोबत फोटो काढून तो वापरता येतो. Paytm for Business अॅप गॅलरीमधील फोटो QR कस्टमायझेशन पेजवरील सुंदर फोटोंमधून ही निवडू शकतो. उत्सव, सणसमारंभ अथवा ऐतिहासिक ठिकाणी व्यापा-याला त्याचा भावलेला फोटो ही वापरता येतो. तसेच त्याचा सेल्फी फोटो ही तो फोटो क्यूआर साठी पाठवू शकतो. हा फोटो वापरून व्यापा-याला स्वत:चा Photo QR तयार करता येतो. त्यानंतर या फोटोची डिजिटल प्रत तो डाऊनलोड करु शकतो. ती त्याला ग्राहकांसोबत शेअर ही करता येते. व्यापारी स्टिकर्स आणि फोटो क्यूआर स्टँड देखील ऑर्डर देऊन त्याचा वापर दुकानात प्रथमदर्शनी भागात ठेऊन पेमेंट स्वीकारु शकतो. या युनिक आयडीयामुळे व्यापा-याचा उत्साह दुणावला आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.