Onion Price : चिंता नको, कांदा नाही रडवणार, वाढत्या किंमतीला लगाम घालण्यासाठी रामबाण उपाय करणार

Onion Price : देशात यंदा कांद्याचे उत्पादन 2 कोटी 54.7 लाख टन होण्याचा अंदाज आहे. ग्राहक संरक्षण मंत्रालयाने साठेबाजांवर कारवाईचे संकेत दिले आहे. तर कांद्याच्या किंमती भडकू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

Onion Price : चिंता नको, कांदा नाही रडवणार, वाढत्या किंमतीला लगाम घालण्यासाठी रामबाण उपाय करणार
कांदा नाही रडवणार
Follow us
| Updated on: May 24, 2024 | 4:19 PM

Onion Buffer Stock : गेल्या एका वर्षात कांद्याच्या किंमती एका विक्रमी किंमतीवर पोहचल्या. त्यानतंर केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली. यंदा पुन्हा कांद्याच्या किंमती वाढू नये म्हणून अगोदरच उपाय करण्यात येत आहे. केंद्र सरकार 1,00,000 टन कांद्याचा बफर स्टॉक तयार करणार आहे. त्यासाठी रेडिएशन प्रोसेसिंगचा वापर करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे या वर्षात कांद्याची कमतरता भासल्यास हा बफर स्टॉक बाजारात आणण्यात येईल. त्याआधारे बाजारातील किंमती नियंत्रीत ठेवण्यात येतील. भारत हा जगातील सर्वात मोठा कांदा उत्पादक देश ठरला आहे.

यंदा उत्पादन घटले

महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सारख्या प्रमुख कांदा उत्पादक राज्यात उत्पादन घटल्याने मोठा फटका बसला आहे. यंदा कांद्याच्या उत्पादनात 16 टक्क्यांची घसरण दिसून आली. त्यामुळे सरकार आता रेडिएशन प्रोसेसिंगचा रामबाण उपाय करणार आहे. यंदा कांद्याचे उत्पादन 2 कोटी 54.7 लाख टन होण्याचा अंदाज आहे. साठेबाजीवर उपाय म्हणून सरकार आता रेडिएशन प्रोसेसिंगचा उपाय करणार आहे. त्यामुळे कांदा लवकर खराब होणार नाही आणि हा साठा योग्य वेळी बाजारात उतरविण्यात येईल. त्याआधारे बाजारातील किंमती नियंत्रणात राहतील.

हे सुद्धा वाचा

बफर स्टॉकसाठी 5,00,000 टन कांदा खरेदीची योजना

सोनीपत, ठाणे, नाशिक आणि मुंबई सारख्या प्रमुख ठिकाणी रेडिएशन सुविधा उपलब्ध करुन देण्याचा विचार आहे. या शहरांच्या जवळपास 50 विकिरण केंद्रांची ओळख करणे सुरु आहे. यंदा एक लाख टनापर्यंत रेडिएशन प्रक्रिया करुन कांद्याचा साठा करण्यात येणार आहे. नाफेड आणि एनसीसीएप यंदा बफर स्टॉकसाठी 5,00,000 टन कांदा खरेदी करणार आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील उत्पादन क्षेत्रात 1,200 टन कांद्यावर रेडिएशन प्रक्रिया करण्याचा प्रयोग करण्यात आला होता.

रेल्वेशी बोलणी

बफर स्टॉक तेजीने वाहून नेता यावा आणि कांदाचा साठ करता यावा यासाठी रेल्वे केंद्रांवर नियंत्रित वातावरण साठवणूक करता येईल का यासाठी बोलणी सुरु आहे. बफर स्टॉक देशातील विविध भागात जलद गतीने पोहचवता यावा यासाठी रेल्वे स्टेशनवर खास साठवणूक केंद्र उभारण्याची पण योजना आखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही भागात कांदा लवकर पोहचेल आणि तो खराब होऊ नये यासाठी साठवणूक केंद्रांची मदत होईल.

Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.