Onion Rate : दिवाळीपूर्वी आनंदवार्ता, कांदा नाही रडवणार, ‘कांदा एक्सप्रेस’ आहे तरी काय, कशा किंमती आटोक्यात येणार?
Onion Price Reduce : नवरात्रीचा उत्सव समाप्त होताच कांद्याचा वापर वाढला आहे. कांद्याचा भाव वधारला आहे. कांदा काही ठिकाणी 100 रुपये किलोपेक्षा अधिक वधारला आहे. दिवाळीपूर्वी सणाचा गोडवा हरवू नये यासाठी सरकारने बफर स्टॉक देशातील विविध कोपऱ्यात पाठवायला सुरूवात केली आहे.
नवरात्र समाप्त होताच बाजारात कांद्याची मागणी वाढली आहे. मागणी वाढताच बाजारात कांद्याच्या किंमतींचा आलेख उंचावला आहे. कांदा 100 रुपये किलोपेक्षा अधिक वधारला आहे. दिवाळीपूर्वी सणाचा गोडवा हरवू नये यासाठी सरकारने बफर स्टॉक देशातील विविध कोपऱ्यात पाठवायला सुरूवात केली आहे. पहिल्यांदा केंद्र सरकारने कांदा एक्सप्रेस चालवण्याची घोषणा केली आहे. या एक्सप्रेसच्या माध्यमातून केंद्र सरकारने बफर स्टॉक कांदा देशातील विविध भागात पोहचवण्याचे काम सुरू केले आहे. पहिली कांदा एक्सप्रेस नाशिक ते पाटणाजवळील दानापूरसाठी रवाना करण्यात आली आहे.
एका ट्रेनमध्ये 1,600 टन कांदा
ग्राहक मंत्रालयाचे सचिव निधी खरे यांनी गुरुवारी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार NCCF ने खरेदी केलेला कांदा दिल्ली एनसीआरसाठी आणण्यात येत आहे. जवळपास 1,600 मॅट्रिक टन कांदा नाशिकवरून दिल्लीसाठी रवाना झाला आहे. कांद्याची ही पहिली खेप 20 ऑक्टोबर 2024 रोजीपर्यंत दिल्लीत पोहचण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वी हा कांदा बाजारात आणण्याचा आणि भाव कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
बफर स्टॉक जवळपास 5 लाख टन
सरकारने भाव स्थिर ठेवण्यासाठी अगोदरच शेतकऱ्यांकडून 5 लाख टन कांदा खरेदी करुन ठेवला आहे. या कांद्याच्या साठ्यातून देशातील विविध भागात कांदा पोहचवण्यात येत आहे. तर या नवीन अपडेटमुळे घाऊक बाजारात कांदा अजून स्वस्त होईल. ग्राहकांना कांद्यासाठी अधिक रक्कम मोजावी लागणार नाही.
बाजारात कांद्याची लवकरच स्वस्ताई
सध्या किरकोळ बाजारात कांद्याचा भाव अनेक ठिकाणी 100 रुपये प्रति किलोवर पोहचला आहे. या दरवाढीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गावखेड्यातील रोजच्या बाजारातही कांदा वधारला आहे. त्यामुळे सरकारने गेल्या महिन्यात किरकोळ बाजारात बफ्फर स्टॉकमधील कांदा 35 रुपये प्रति किलो सबसिडी दराने कांद्याची विक्री केली. दिवाळीपूर्वी सणाचा गोडवा हरवू नये यासाठी सरकारने बफर स्टॉक देशातील विविध कोपऱ्यात पाठवायला सुरूवात केली आहे. पहिल्यांदा केंद्र सरकारने कांदा एक्सप्रेस चालवण्याची घोषणा केली आहे. या एक्सप्रेसच्या माध्यमातून केंद्र सरकारने बफर स्टॉक कांदा देशातील विविध भागात पोहचवण्याचे काम सुरू केले आहे.