Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिन्याला 1 रुपयात मिळवा घसघशीत फायदा, जबरदस्त आहे सरकारची ही योजना

सरकारने कमी पैशात गुंवणुकीचा पर्याय नागरिकांसाठी दिला आहे. यामध्ये फक्त 1 रुपये महिना आणि 12 रुपये वर्षाला प्रीमियम भरावा लागणार आहे.

महिन्याला 1 रुपयात मिळवा घसघशीत फायदा, जबरदस्त आहे सरकारची ही योजना
families
Follow us
| Updated on: Oct 18, 2020 | 10:02 AM

नवी दिल्ली : कोरोनाचं संकट आल्यापासून गुंतवणूक करणं अतिशय कठीण झालं आहे. पण भविष्याचा विचार करता कमी पैशांत गुंवणूक करण्याची चांगली संधी उपलब्ध आहे. जास्त प्रीमियम असल्यामुळे सामान्य नागरिकांना याचा लाभ घेता येत नाही. यासाठी सरकारने कमी पैशात गुंवणुकीचा पर्याय नागरिकांसाठी दिला आहे. यामध्ये फक्त 1 रुपये महिना आणि 12 रुपये वर्षाला प्रीमियम भरावा लागणार आहे. (only 1 rupee monthy and 12 rupees yearly premium in pradhan mantri suraksha bima yojana)

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) ही एक अपघात विमा योजना आहे. PMSBY योजनेचा प्रीमियम मे महिन्यात वार्षिक आधारावर कापला जातो. ही योजना 1 जून ते 31 मे दरम्यान चालू असते. जाणून घेऊयात काय आहेत या योजनेचे फायदे…

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत तुम्ही फक्त 12 रुपये खर्च करून अपघाती आणि अपंगत्व कव्हर घेऊ शकता. या योजनेत विमा धारकाचा मृत्यू झाल्यास किंवा तो अपंग असल्यास 2 लाख रुपयांची भरपाई दिली जाते. विमा धारकास अर्धवट अपंगत्व असल्यास 1 लाख रुपयांचा कव्हर मिळतो. या योजनेंतर्गत 18 ते 70 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती कव्हर घेऊ शकते.

बँकेत खातं असणं महत्त्वाचं या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेमध्ये अकाऊंट असणं महत्त्वाचं आहे. बँक अकाऊंट बंद होताना किंवा प्रीमियम कापताना वेळेवर बँकेत पैसे नसतील तर वीमा रद्द होण्याची शक्यता आहे. जर तुमचं ज्वाइंट बँक अकाऊंट असेल तर तुम्ही होल्डर्स स्कीमचा फायदा घेऊ शकता. तर अकाऊंटच्या प्रत्येक होल्डरला वर्षाला वेगवेगळा प्रीमियम भरावा लागेल. (only 1 rupee monthy and 12 rupees yearly premium in pradhan mantri suraksha bima yojana)

योजनेबद्दल महत्त्वाचं PMSBY विमासंदर्भात सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्या किंवा इतर सामान्य विमा कंपन्या ऑफर करतात. विमाधारक 70 वर्षांचा होईपर्यंत विमा संपतो. या योजनेला मधेच सोडणाऱ्या व्यक्तिने वर्षाचं प्रीमियम भरलं तर त्याला विमा पुन्हा सुरू करण्याची सुविधा आहे. पण यावेळी काही नवीन नियम लागू केले जातात.

दाव्याची रक्कम दुखापत किंवा अपंगत्व असल्यास विमाधारकाच्या खात्यावर भरली जाते. अपघातात मृत्यू झाल्यास, नामित व्यक्तीच्या खात्यात पैसे भरले जातील. रस्ता, रेल्वे किंवा अन्य कोणताही अपघात, पाण्यात बुडणं, गुन्ह्यात सामील झाल्यामुळे मृत्यू अशा घटना घडल्यास पोलिसांना याची माहिती देणं महत्त्वाचं असणार आहे.

कशी कराल नोंदणी PMSBY योजनेत नोंदणी करण्यासाठी तुमच्या जवळच्या बँकेत जाऊन निवेदन करू शकता. यासाठी तुम्ही एखाद्या विमा एजेंटचीही मदत घेऊ शकता.

इतर बातम्या –

अडीच महिन्यांनंतर कोरोनासंदर्भात Good News, रुग्ण वाढण्याची साखळी मोडली

हैदराबादमध्ये पावसाचं रौद्र रुप, 50 लोकांचा वाहून मृत्यू; हवामान खात्याकडून अलर्ट

(only 1 rupee monthy and 12 rupees yearly premium in pradhan mantri suraksha bima yojana)

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.