Crude Oil : पेट्रोल-डिझेलची महागाई विसरुन जा! रशियाच नाही तर हा देश पण आला धावून

Crude Oil : ओपेक प्लस देशांनी कच्चा तेलाचे उत्पादन घटविल्याने जगात पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. भारतावर दरवाढीचे संकट असताना आता रशिया सारखाच हा देश मदतीला धावून आला आहे.

Crude Oil : पेट्रोल-डिझेलची महागाई विसरुन जा! रशियाच नाही तर हा देश पण आला धावून
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 10:28 AM

नवी दिल्ली : पश्चिमी देशांनी आर्थिक निर्बंध घातल्यानंतर रशियाने भारताला स्वस्तात कच्चा तेलाची (Crude Oil)विक्री सुरु केली आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून भारताला स्वस्तात इंधन मिळत आहे. भारत त्याच्या गरजेच्या एकूण 80 टक्के कच्चे तेल आयात करतो. आता ओपेक प्लस देशांनी आणि रशियाने पश्चिमी देशांची कोंडी करण्यासाठी कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्याचा फटका सर्वांनाच बसेल. कच्चा तेलाचे भाव आता 90 डॉलर प्रति बॅरलच्या घरात पोहचले आहे. या घडामोडींमुळे भारतापुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. या संकटाच्या काळात आता आणखी एक देश भारताच्या मदतीला धावून आला आहे. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) वाढण्याची शक्यता नसल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे.

कोणता देश आला मदतीला तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आता भारताच्या मदतीला कोणता देश आला आहे. इराकने भारताला मदतीचा हात पुढे केला आहे. भारताच्या एका खेळीने रशियाचा तर मोठा फायदा झाला. पण यापूर्वी इराककडून होत असलेली आयात भारताने कमी केली. इराकच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. भारत हा जगातील तिसरा कच्चे तेल आयात करणारा देश आहे. रशियाकडे झुकलेल्या भारतासाठी इराकने आता स्वस्तात इंधन पुरवठा करण्यासाठी हात पुढे केला आहे.

दोन डॉलरचा झाला फायदा भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नुकतीच याविषयीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार इराककडून भारताने तेल आयात कमी केली. त्यामुळे इराकने भारतासाठी कच्चा तेलाच्या किंमतीत कपात केली. भारताने जानेवारी महिन्यात इराककडून 78.92 डॉलर प्रति बॅरलने कच्चे तेल खरेदी केले होते. फेब्रुवारी महिन्यात भावात फरक पडला. भारताने 76.19 डॉलर प्रति बॅरलने इंधन खरेदी केले.

हे सुद्धा वाचा

सौदीचा सोस सर्वात महागडे तेल सौदी अरबकडून खरेदी करावे लागत आहे. सौदी अरब भारताला 87.66 डॉलर प्रति बॅरलने कच्चा तेलाचा पुरवठा करत आहे. सौदीचा हा सोस भारताला परडवणारा नाही. त्यामुळे रशियानंतर भारत आता इराककडून कच्चा तेलाची अधिक आयात करु शकतो. त्यामुळे मोठा फायदा होईल आणि देशात पेट्रोल-डिझेलचा भडका उडणार नाही. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांना नुकसान होणार नाही. त्यांना केंद्र सरकारला नुकसान भरपाई म्हणून कमी अनुदान द्यावे लागेल.

भारताच्या खेळीचा इराकला फटका एनर्जी कार्गो ट्रॅकर वोर्टेक्सा नुसार, भारताने मार्च 2022 मध्ये रशियाकडून प्रत्येक दिवशी 68,600 बॅरल कच्चा तेलाची आयात केली होती. त्यात यावर्षी 1.64 दशलक्ष बॅरलची प्रति दिवस भर पडली. परिणामी इतर देशांकडील आयात घसरली. इराककडून भारताने मार्च 2022 मध्ये जवळपास 1.1 दशलक्ष बॅरल प्रति दिवस कच्चा तेलाची खरेदी केली होती. आता इराककडून केवळ 0.8 दशलक्ष कच्चा तेलाची आयात करत आहे. रशिया इराकपेक्षा भारताला दुप्पट कच्चा तेलाची विक्री करत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.