Post Office Franchise: ‘या’ व्यवसायात फक्त 5000 रुपये गुंतवून करा बक्कळ कमाई

Post Office Franchise | इंडियन पोस्टाकूडन मुख्यत: दोन प्रकारच्या फ्रेंचायजी दिल्या जातात. यापैकी पहिली म्हणजे आऊटलेट आणि दुसरी म्हणजे पोस्टल एजंट. आऊटलेट फ्रेंचायजीमध्ये सामान्य पोस्ट ऑफिसमध्ये होणारी सर्व कामे केली जातात.

Post Office Franchise: 'या' व्यवसायात फक्त 5000 रुपये गुंतवून करा बक्कळ कमाई
पोस्ट ऑफिस
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 8:27 AM

नवी दिल्ली: देशभरात सध्याच्या घडीला पोस्टाची जवळपास 1 लाख 55 हजार कार्यालये आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागात आर्थिक सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकारने पोस्टाच्या अनेक सुविधांचा वेळोवेळी विस्तारही केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मनीऑर्डर, स्टॅम्प व स्टेशनरी, पत्रांचे आदानप्रदान, बँक अकाऊंट उघडणे आणि स्मॉल सेव्हिंग अकाऊंट उघडणे यासारखी कामे पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून केली जातात. या पार्श्वभूमीवर आता इंडियन पोस्टाने ठिकठिकाणी कार्यालये उघडण्यासाठी फ्रेंचायजी स्कीम सुरु केली आहे. ”

Post Office Franchise Scheme अंतर्गत कोणतीही व्यक्ती थोडीफार रक्कम भरून आणि नियमांची पूर्तता करुन पोस्ट ऑफिस सुरु करु शकतो. हा एक चांगला व्यवसाय ठरू शकतो. इंडियन पोस्टाकूडन मुख्यत: दोन प्रकारच्या फ्रेंचायजी दिल्या जातात. यापैकी पहिली म्हणजे आऊटलेट आणि दुसरी म्हणजे पोस्टल एजंट. आऊटलेट फ्रेंचायजीमध्ये सामान्य पोस्ट ऑफिसमध्ये होणारी सर्व कामे केली जातात. केवळ पत्रांच्या देवाणघेवाणीची सेवा याला अपवाद आहे. मात्र, पोस्टाच्या या फ्रेंचायजी केवळ ज्याठिकाणी सेवेचा अभाव अशाच ठिकाणी सुरु करण्यास परवानगी आहे.

फ्रेंजायजीसाठी किती पैसे भरावे लागतात?

पोस्टाची फ्रेंचायजी उघडण्यासाठी तुम्हाला किमान 5000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून भरावे लागतात. याशिवाय, पोस्टाच्या सेवा देण्यासाठी उघडलेल्या आऊटलेट फ्रेंजायजीमध्ये विशेष गुंतवणूक करावी लागत नाही. मात्र, पोस्टल एजंट फ्रेजायजीसाठी जास्त गुंतवणूक करावी लागते. कारण त्याठिकाणी तुम्हाला स्टेशनरीही खरेदी करावी लागते. तसेच या फ्रेंजायची उघडणारी व्यक्ती 18 वर्ष पूर्ण झालेली आणि आठवी पास असणे बंधनकारक आहे. तसेच ज्याठिकाणी फ्रेंचायजी उघडायची आहे, ते कार्यालय किमान 200 स्क्वेअर फुटांचे असावे. तसेच फ्रेंचायजी उघडणाऱ्या व्यक्तीचा नातेवाईक पोस्टाचा कर्मचारी असता कामा नये.

फ्रेंजायजी उघडण्यासाठी अर्ज कसा कराल?

पोस्टाची फ्रेंचायजी उघडण्यासाठी तुम्हाला https://www.indiapost.gov.in/VAS/DOP_PDFFiles/Franchise.pdf या लिंकवरून एक अर्ज भरावा लागेल. या फ्रेंजायजीच्या माध्यमातून उत्पन्नाची गोष्ट करायची झाली तर तुम्ही स्पीड पोस्टसाठी 5 रुपये, मनीऑर्डरसाठी 3 ते 5 रुपये, पोस्टल स्टॅम्प आणि स्टेशनरीच्या विक्रीवर तुम्हाला 5 टक्के कमिशन दिली जाते. प्रत्येक सेवेसाठी वेगवेगळे कमिशन मिळते.

(Open Post Franchise in just 5000 rupees and earn good money)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.