आपल्या कुटुंबातील वडिलधाऱ्यांच्या नावाने हे खाते उघडा, कर सवलतीचा लाभ; पैसाही सुरक्षित

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत वार्षिक 7.4 टक्के दराने व्याज मिळत आहे. हा व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू होणार आहे. यामध्ये 31 मार्च/30 सप्टेंबर/31 डिसेंबर रोजी ठेवीच्या पहिल्या तारखेनंतर व्याज दिले जाईल. यानंतर 31 मार्च, 30 जून, 30 सप्टेंबर आणि 31 डिसेंबरला व्याज दिले जाईल.

आपल्या कुटुंबातील वडिलधाऱ्यांच्या नावाने हे खाते उघडा, कर सवलतीचा लाभ; पैसाही सुरक्षित
oldage
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 10:39 AM

नवी दिल्लीः Senior Citizen Savings Schemes (SCSS): जर तुम्ही आगामी काळात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना फायदेशीर ठरू शकतात. या योजनांमध्ये तुम्हाला बँकेपेक्षा चांगला परतावा मिळतो. तसेच यामध्ये गुंतवलेला पैसाही पूर्णपणे सुरक्षित राहतो. बँक दिवाळखोर झाली तर तुम्हाला फक्त पाच लाख रुपये परत मिळतात. पण पोस्ट ऑफिसमध्ये असे होत नाही. येथे गुंतवलेल्या संपूर्ण पैशावर सरकारची सार्वभौम हमी असते.

छोट्या बचत योजनांमध्ये वरिष्ठ नागरिक बचत योजनादेखील समाविष्ट

पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये वरिष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) देखील समाविष्ट आहे. या योजनेत तुम्ही तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या नावावर गुंतवणूक करू शकता. चला या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

व्याजदर काय असेल?

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत वार्षिक 7.4 टक्के दराने व्याज मिळत आहे. हा व्याजदर 1 एप्रिल 2020 पासून लागू होणार आहे. यामध्ये 31 मार्च/30 सप्टेंबर/31 डिसेंबर रोजी ठेवीच्या पहिल्या तारखेनंतर व्याज दिले जाईल. यानंतर 31 मार्च, 30 जून, 30 सप्टेंबर आणि 31 डिसेंबरला व्याज दिले जाईल.

गुंतवणूक रक्कम किती?

या सरकारी योजनेत फक्त एकदाच रक्कम जमा करावी लागणार आहे. ही रक्कम एक हजार रुपयांच्या पटीत असेल आणि ते जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंतच असू शकते.

खाते कोण उघडू शकते?

60 वर्षांवरील कोणीही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत खाते उघडू शकतो. याशिवाय 55 वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही सेवानिवृत्त कर्मचारी, ज्याचे वय 60 वर्षांपेक्षा कमी आहे. सेवानिवृत्तीचे लाभ मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत यामध्ये गुंतवणूक करावी लागते. यासह 50 वर्षांपेक्षा जास्त परंतु 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे निवृत्त संरक्षण कर्मचारी देखील गुंतवणूक करू शकतात. या प्रकरणात सेवानिवृत्तीचे लाभ मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. खाते वैयक्तिकरित्या किंवा जोडीदारासह संयुक्तपणे उघडले जाऊ शकते.

गुंतवणूक कालावधी

खाते उघडण्याच्या तारखेपासून 5 वर्षांनी बंद केले जाऊ शकते, यासाठी त्या व्यक्तीने पासबुकसह योग्य तो अर्ज संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावा लागतो. खातेदाराचा मृत्यू झाल्यास मृत्यूच्या तारखेपासून खात्यावर पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या दराने व्याज जमा होत राहील. जर जोडीदार संयुक्त धारक किंवा एकमेव नामनिर्देशित असेल तर, पती / पत्नी या योजनेत खाते उघडण्यास पात्र असल्यास आणि त्यामध्ये दुसरे कोणतेही खाते नसल्यास खाते परिपक्वता होईपर्यंत चालू ठेवता येते.

कर लाभ आणि इतर वैशिष्ट्ये

या योजनेतील गुंतवणूक आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C अंतर्गत लाभ प्रदान करते. खातेदार मॅच्युरिटीच्या तारखेपासून खाते आणखी 3 वर्षांसाठी वाढवू शकतो. त्यासाठी त्याला पासबुकसह योग्य तो फॉर्म संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावा लागेल. खाते मॅच्युरिटीच्या एका वर्षाच्या आत वाढवता येते.

संबंधित बातम्या

5000 कोटींच्या AK-203 कराराला मोदी सरकारची मान्यता, अमेठीत बनणार 5 लाखांहून अधिक रायफल्स

MF Scheme: कमी कालावधीत मोठी रक्कम जमा करायचीय? अशी करा गुंतवणूक, 10 वर्षात मिळतील 5 कोटी रुपये

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.