वृद्धापकाळात प्रत्येक महिन्याला मिळतील 30 हजार रुपये, ‘या’ बँकेत सोप्या पद्धतीने उघडा खातं

आम्ही तुम्हाला गुंतवणुकीची एक उत्तम योजना सांगणार आहोत. ज्यामध्ये कमी गुंतवणुकीवर वृद्धकाळात भरभक्कम पेन्शन मिळते.

वृद्धापकाळात प्रत्येक महिन्याला मिळतील 30 हजार रुपये, 'या' बँकेत सोप्या पद्धतीने उघडा खातं
Follow us
| Updated on: Dec 14, 2020 | 2:31 PM

नवी दिल्ली : कोरोनाचा (Corona) हा जीवघेणा काळ पाहिल्यानंतर तुम्हा-आम्हा प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता आहे. भविष्याचा विचार केला तर तुम्हीही गुंतवणुकीचा (Investment) एखादा प्लॅन नक्कीच केला असेल. पण आम्हीही तुम्हाला गुंतवणुकीची एक उत्तम योजना सांगणार आहोत. ज्यामध्ये कमी गुंतवणुकीवर वृद्धकाळात भरभक्कम पेन्शन मिळते. देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) ग्राहकांना नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये (National Pension System) खातं उघडण्याची धमाकेदार सुविधा देत आहे. या खात्यात 30 वर्षांसाठी दरमहा 5,000 रुपये गुंतवल्यानंतर वयाच्या 60 व्या वर्षी तुम्हाला 30 हजार रुपये मिळणार आहे. (open your online nps account through pnb and get 30 thousand pension per month know how to open account)

नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) ही एक अशी योजना आहे ज्याअंतर्गत वृद्धावस्थेसाठी पैशांची उत्तम व्यवस्था केली जाऊ शकते. जानेवारी 2004 मध्ये राष्ट्रीय पेन्शन सिस्टम सेवा सरकारी कर्मचार्‍यांसाठी सुरू करण्यात आली. यानंतर 2009 मध्येही सेवा सर्व कर्मचाऱ्यांसाठी खुली करण्यात आली. यामध्ये कोणतीही व्यक्ती आपल्या कामाच्या कार्यकाळात नियमितपणे पेन्शन खात्यात योगदान देऊ शकते. यामध्ये तुम्ही वयाच्या 60 व्या वर्षी पोहोचल्यानंतर एकूण ठेवींपैकी काही रक्कम एकावेळी काढून घेऊ शकता तर निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी उर्वरित रक्कम वापरू शकता.

PNB ने ट्विट करून दिली योजनेची माहिती

पीएनबीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट करून या योजनेसंबंधी माहिती दिली आहे. यामध्ये भविष्याच्या चांगल्यासाठी सुरक्षितपणे तुम्ही गुंतवणूक करू शकता असं लिहण्यात आलं आहे. पण यासाठी पीएनबीमध्ये ई-एनपीएस खातं उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

असं उघडा e-NPS खातं

– एनपीएस खाते उघडण्यासाठी पहिलं पीएनबीच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करणं आवश्यक आहे.

– यानंतर ऑनलाईन ग्राहक नोंदणी पानावर नवीन नोंदणीच्या ऑप्शनवर क्लिक करा.

– यामध्ये तुमचा व्हर्च्युअल आयडी नंबर भरून नोंदणीकृत क्रमांकावर ओटीपी मिळवा.

– ओटीपी भरल्यानंतर तुमची वैयक्तिक माहिती भरा.

– माहिती भरल्यानंतर PRAN क्रमांक मिळवा आणि लॉग इन करा.

अशा प्रकारे दरमहा मिळणार 30 हजार रुपये पेन्शन

– एनपीएसमध्ये मासिक गुंतवणूक – 5,000 रुपये

– 30 वर्षांत एकूण रक्कम – 18 लाख रुपये

– गुंतवणूकीवर अंदाजित परतावा – 10%

– मॅच्युरिटीवरील एकूण रक्कम – 1.13 कोटी

– एन्युइटी खरेदी – 40%

– अंदाजित एन्युइटी दर – 8%

– टॅक्स फ्री कॅश विड्रॉवल: मॅच्युरिटी रकमेच्या 60%

– 60 वर्षांच्या वयातील पेन्शन – दरमहा 30,391 रुपये

– एकरकमी रोख – 68.37 लाख रुपये

(यामध्ये एनपीएस कॅल्क्युलेटरवर 40 टक्के रक्कमेने एन्युइटी खरेदीवर कॅल्क्यूलेशन करण्यात आलं आहे. 40 टक्के वार्षिकी खरेदी करणे आवश्यक आहे.) (open your online nps account through pnb and get 30 thousand pension per month know how to open account)

इतर बातम्या – 

बर्गर किंगचे शेअर वाढले, 10 दिवसांत दाम दुप्पट !

सोन्याच्या दराचा शत्रू कोण? का घसरतोय सातत्यानं भाव?

(open your online nps account through pnb and get 30 thousand pension per month know how to open account)

(टीप : ही संपूर्ण माहिती पीएनबीने ट्वीट केल्यानुसार देण्यात आली आहे. आपण गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.