AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

30 नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करण्याची संधी, ‘या’ 5 मार्गांनी जमा करा अन्यथा पेन्शन बंद

डोअर स्टेप बँकिंगच्या मदतीनेही हयातीचा दाखला सादर केला जाऊ शकतो. DSB म्हणजेच डोअर स्टेप बँकिंग ही 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची युती आहे. यामध्ये एसबीआय, पीएनबीसह इतर सरकारी बँका आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या आघाडीने DSB च्या मदतीने हयातीचा दाखला घरबसल्या गोळा करण्याची सुविधा आहे.

30 नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करण्याची संधी, 'या' 5 मार्गांनी जमा करा अन्यथा पेन्शन बंद
oldage
| Edited By: | Updated on: Nov 23, 2021 | 6:08 PM
Share

नवी दिल्लीः पेन्शन मिळाल्यास वर्षातून एकदा हयातीचा दाखला सादर करावा लागतो. यावर्षी हयातीचा दाखला सादर करण्याची शेवटची संधी 30 नोव्हेंबरपर्यंत आहे. जर ही मुदत चुकवली तर तुमची पेन्शन थांबू शकते. नोव्हेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरलेत. हयातीचा दाखला आता ऑनलाईन देता येतो. तसेच हयातीचा दाखला सादर करण्याचे कोणते मार्ग आहेत, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर त्याबद्दल आता माहिती मिळवू या.

हयातीचा दाखला सादर करण्याबाबत विविध पद्धती

20 सप्टेंबर 2021 ला पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने एक निवेदन जारी केले होते. या निवेदनात हयातीचा दाखला सादर करण्याबाबत विविध पद्धती सांगण्यात आल्यात. जर तुम्ही प्रत्यक्ष हयातीचा दाखला सादर केला तर हे काम बँक, पोस्ट ऑफिस, डोअर-स्टेप बँकिंगच्या मदतीने करता येणार आहे. याशिवाय हयातीचा दाखला डिजिटल स्वरूपात सादर करता येतो.

हयातीचा दाखला ऑनलाईनही सादर करता येतो

जर तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन हयातीचा दाखला सादर करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला जीवन प्रमाण (https://jeevanpramaan.gov.in/) या पोर्टलला भेट द्यावी लागेल. तसेच जीवन प्रमाण अॅप डाऊनलोड करावे लागेल. फिंगर प्रिंट स्कॅनरच्या मदतीने ही प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. तसेच यासाठी आधार कार्ड सोबत बाळगावे.

बँकेच्या शाखेत जाऊन हयातीचा दाखला सादर केला जाऊ शकतो

हयातीचा दाखला ऑफलाईनदेखील सादर केला जाऊ शकतो. सहसा तुमची पेन्शन येते, त्या बँकेत जाऊन तुम्हाला जीवन प्रमाणपत्र फॉर्म भरावा लागेल. यासोबत आधार कार्ड आणि पॅन कार्डची प्रत जोडावी लागेल. फॉर्म भरल्यानंतर तो सबमिट करा, त्यानंतर तुमचे काम झटपट होईल.

डोअर स्टेप बँकिंगच्या मदतीने हयातीचा दाखला सादर केला जाऊ शकतो

डोअर स्टेप बँकिंगच्या मदतीनेही हयातीचा दाखला सादर केला जाऊ शकतो. DSB म्हणजेच डोअर स्टेप बँकिंग ही 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची युती आहे. यामध्ये एसबीआय, पीएनबीसह इतर सरकारी बँका आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या आघाडीने DSB च्या मदतीने हयातीचा दाखला घरबसल्या गोळा करण्याची सुविधा आहे. डोअरस्टेप बँकिंगमध्ये मोबाईल अॅपदेखील आहे. त्याची वेबसाईट https://doorstepbanks.com/ आहे. कस्टमर केअरशी बोलण्यासाठी तुम्ही 18001213721 or 18001037188 या टोल फ्री क्रमांकावरही कॉल करावा लागेल. डोअर स्टेप बँकिंगमध्ये प्रत्येक सेवेसाठी शुल्क जमा करावे लागते.

पोस्टमनकडून हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधाही

टपाल विभागाकडून हयातीचा दाखला सादर करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने पोस्टल इंडियाच्या सहकार्याने डोअर स्टेप बँकिंग सेवा सुरू केली. नोव्हेंबर 2020 मध्ये ही सेवा सुरू झाली. पोस्टमनद्वारे ही सेवा दिली जाते.

नियुक्त अधिकाऱ्याच्या उपस्थितीत हयातीचा दाखलादेखील सादर करा

नियुक्त अधिकाऱ्याच्या उपस्थितीत हयातीचा दाखलादेखील सादर केला जाऊ शकतो. पेन्शनर्स नियुक्त अधिकार्‍यासमोर हजर झाल्यास ते हयातीचा दाखला सादर करू शकतात. नियुक्त अधिकाऱ्यांची यादी CPAO म्हणजेच केंद्रीय पेन्शन लेखा कार्यालयात तयार आहे.

संबंधित बातम्या

कृषी कायदा मागे घेण्याबाबत पंतप्रधान मोदींची बुधवारी महत्त्वाची बैठक, क्रिप्टोकरन्सीबाबतही मोठी घोषणा होण्याची शक्यता

Gold, Silver Price Today: सोने-चांदीच्या दरात ‘या’ महिन्यातील सर्वात मोठी घसरण; 800 रुपयांपेक्षा जास्त स्वस्त, पटापट तपासा

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.