Bank strike: राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाला विरोध; आजपासून बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर

राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात दोन दिवसांचा संप पुकारला आहे. आजपासून या संपाला सुरुवात झाली आहे. गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत.

Bank strike: राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाला विरोध; आजपासून बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 7:37 AM

नवी दिल्ली : राष्ट्रीय बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात दोन दिवसांचा संप पुकारला आहे. आजपासून या संपाला सुरुवात झाली आहे. गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. बँक कर्मचारी संपावर गेल्यास त्याचा मोठा परिणाम हा बंँकेच्या दैनंदिन कामावर होणार आहे.  संपादरम्यान स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि आरबीएल बँकांच्या कामकाजावर मोठा परिणाम दिसून येऊ शकतो. दरम्यान, बँक व्यवस्थापनांनी कामकाजावर होणारा परिणाम टाळण्यासाठी सर्व शाखांमध्ये पर्यायी कामकाजाची व्यवस्था निर्माण केली आहे.

संप कशासाठी ? 

सरकारी बँकांच्या खासगीकरणाला बँक संघटनांचा तीव्र विरोध आहे. बँकांच्या खासगीकरणामुळे अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक क्षेत्रांना गंभीर परिणामांना सामारे जावे लागेल. ग्रामीण भागातील कर्ज वितरणावर थेट परिणाम होण्याची भीती बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी वर्तविली आहे. तसेच बँकांचे खासगीकरण झाल्यास ग्राहकांनी बँकेत ठेवलेल्या ठेवींच्या जोखमीमध्ये देखील वाढ होईल, असे या संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळेच बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी आजापासून दोन दिवसीय संप पुकारला आहे.

सलग सुट्यांमुळे ग्राहकांचे हाल

आजपासून बँक कर्मचारी दोन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. बँक कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे गुरुवार आणि शुक्रवार बँकेंचे कामकाज बंद राहण्याची शक्यता आहे. शनिवारी देखील देशातील अनेक बँकांना सुटी आहे. तर रविवारी विकेंड असल्यामुळे बँकांना सुटी राहिल.  आजपासून सलग चार दिवस बँका बंद राहण्याची शक्यता असल्याने, बँकिंग व्यवहार ठप्प होऊ शकतात त्यामुळे ग्रहाकांच्या अडचणी वाढणार आहेत.

संबंधित बातम्या 

Nirmala Sitharaman :अर्थसंकल्प 2022: अर्थव्यवस्थेला ‘पॅकेज’चा बूस्टर डोस; केंद्रीय अर्थमंत्र्यांचं दिल्लीत विचारमंथन

एसबीआयच्या ‘या’ दोन करंट अकाऊंटवर मिळतात चांगल्या सुविधा; व्यवसायिकांसाठी ऑफर्सची खैरात

आता तुम्हीही गॅस कनेक्शन सहज ट्रान्सफर करू शकता; या स्टेप्स करा फॉलो

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....