आता बसणार गुणवत्तेबाबतच्या तडजोजीला आळा; सोयाच्या प्रत्येक उत्पादनावर ISI मार्क वापरण्याचे आदेश

आता इथून पुढे सोयाबीनपासून तयार होणाऱ्या प्रत्येक उत्पादनावर आयएसआय (ISI) मार्क वापरणे बंधनकारक असणार आहे. तसे आदेश भारतीय मानक ब्युरोकडून (Bureau of Indian Standards) उत्पादकांना देण्यात आले आहेत.

आता बसणार गुणवत्तेबाबतच्या तडजोजीला आळा; सोयाच्या प्रत्येक उत्पादनावर ISI मार्क वापरण्याचे आदेश
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 1:12 PM

मुंबई : आता इथून पुढे सोयाबीनपासून तयार होणाऱ्या प्रत्येक उत्पादनावर आयएसआय (ISI) मार्क वापरणे बंधनकारक असणार आहे. तसे आदेश भारतीय मानक ब्युरोकडून (Bureau of Indian Standards) उत्पादकांना देण्यात आले आहेत. सोयाबीनपासून निर्माण होणाऱ्या उत्पादनाला मोठी मागणी आहे. ग्राहकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या सर्व पार्श्वभूमीर भारतीय मानक ब्युरोकडून उत्पादकांना सोयाबीनपासून तयार होणाऱ्या उत्पादनावर आयएसआय मार्क वापण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबत बोलताना भारतीय प्रमाणीकरण संस्था बीआयएस (BIS)च्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, दिवसेंदिवस सोया उत्पादनाच्या ग्राहक वर्गात वाढ होत आहे. अशा स्थितीमध्ये ग्राहकांना दर्जेदार आणि शुद्ध उत्पादन मिळावे, भेसळीपासून ग्राहकांचे संरक्षण व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांचा फायदा होणार आहे.

गुणवत्ता सुधारण्यास मदत

पुढे बोलताना ‘बीआयएस’ने म्हटले आहे की, सोयाबीन पासून तयार होणाऱ्या उत्पादनावर आयएसआय मार्क वापरल्यास संबंधित उत्पादनाचे प्रामाणिकर होऊन, त्याच्या गुणवत्तेबाबत तडजोड होणार नाही. यापूर्वी सोया आटा, सोया मिल्क, सोया नट्स आणि सोया बटर या उत्पादनावर ऑलरेडी आयएसआय मार्क वापरण्यात येत होता. आता सोयाबीनपासून तयार होणाऱ्या सर्वच पदार्थांवर आयएसआय मार्क वापरण्यात येणार आहे.

आएसआय मार्क म्हणजे काय?

दरम्यान 1955 पासून भारतीय औद्योगिक उत्पादनावर ISI मार्कचा वापर करण्यात येतो. आएसआय मार्ककडे शुद्धतेचे प्रतिक म्हणून पाहिले जाते. त्यामुळे ज्या वस्तुवर आयएसआय मार्क आहे त्याच वस्तु खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो. ज्या वस्तुवर आएसआय मार्क आहे त्या वस्तुचे उच्चास्थरावर प्रामाणिकरण करण्यात आलेले असते. त्यामुळे अशा वस्तुंमध्ये भेसळीची शक्यता नसते. सोन्या सारख्या मौल्यवान धातूंवर देखील हॉलमार्क वापरण्यात येतो.

संबंधित बातम्या

देशाच्या 28 टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात, राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात आणखी काय?; वाचा सविस्तर

कोरोनाचा प्रभाव वसरला; सोन्याची विक्रमी आयात, 2021 मध्ये 27 टक्क्यांची वाढ

पाच राज्यातील विधानसभा निकालानंतर इंधनाचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे भाव

बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.