Pahalgam Terror Attack : अटारी बॉर्डर बंद, व्यापार पण ठप्प? भारत पाकिस्तानचे नाक दाबणार, शेजाऱ्याचे किती नुकसान होणार?
Attari Border Closed : पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची नाकाबंदी सुरू झाली आहे. अटारी बॉर्डर बंद करण्यात आली आहे. तर व्यापार पण ठप्प होण्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांचे पाकिस्तान कनेक्शन उघड झाल्याने दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत.

पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध ताणले गेले. या हल्ल्यानंतर भारत सरकारने निर्णयाचा धडका लावला. त्यात अटारी बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांना परत पाठवण्याचे संकेत मिळत आहे. पाकिस्तानी नागरिकांना येत्या 48 तासात भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना भारत बंदी करण्यात आला आहे. तर सिंधू करारा पण थांबवण्यात आला आहे. आता व्यापारावर पण थेट परिणाम होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याची शक्यता आहे.
व्यापारी धोरणामुळे पाकिस्तान अडचणीत
भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कालपासून ताणले गेले. दहशतवादी रावळपिंडीचे असल्याचे उघड झाले आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या सर्वांचा परिणाम दोन्ही देशांच्या संबंधावर होत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अटारी बॉर्डर हा सध्या दोन्ही देशांना जोडणारा एकमेव रस्ता मार्ग आहे. या मार्गाने भारत पाकिस्तानला सोयाबीन, कोंबड्यांसाठी अन्न, भाजीपाला, प्लास्टिक, सूत, आणि लाल मिरची सारख्या वस्तू पाठवतो.




अटारी बॉर्डरवरुन 3,886.53 कोटींचा व्यापार
अटारी बॉर्डर अमृतसरपासून केवळ 28 किलोमीटर दूर आहे. पाकिस्तानसोबत हा एकमेव रस्ता मार्ग आहे. हे पोर्ट 120 एकर परिसरावर पसरलेले आहे. हा भाग थेट राष्ट्रीय राजमार्ग-1 सोबत जोडलेला आहे. अटारी चेक पोस्ट ही केवळ भारत-पाकिस्तानसाठीच नाही तर अफगाणिस्तानमधून सामान आयात करण्याचा पण मार्ग आहे. अटारी-वाघा बॉर्डर कॉरिडोरमधून प्रत्येक वर्षी व्यापार होतो आणि यात्रेकरू ये जा करतात. वर्ष 2023-24 मध्ये या पोर्टमधून 6,871 माल वाहक वाहनं गेली आहेत. तर 71,563 नागरिक याच मार्गाने गेले आहेत. या दरम्यान एकूण 3,886.53 कोटी रुपयांचा व्यापार झाला आहे.
अटारी बॉर्डर पोर्ट हा दीर्घकाळापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील व्यापाराचा मार्ग आहे. टारी बॉर्डर हा सध्या दोन्ही देशांना जोडणारा एकमेव रस्ता मार्ग आहे. या मार्गाने भारत पाकिस्तानला सोयाबीन, कोंबड्यांसाठी अन्न, भाजीपाला, प्लास्टिक, सूत, आणि लाल मिरची सारख्या वस्तू पाठवतो. तर पाकिस्तान आणि इतर देशांकडून भारतात सुका मेवा, खजूर, जिप्सम, सिमेंट, काच, सैंधव मीठ आणि इतर अनेक जुडीबुटी येतात. आता हा पोर्ट बंद झाल्याने त्याचा थेट परिणाम सीमा पलिकडच्या व्यापाऱ्यांवर होईल. पाकिस्तान अगोदर आर्थिक संकटातून जात आहे, त्यात भारताच्या या निर्णयाने या देशासमोरील अडचणी वाढल्या आहेत.