Union Budget 2023 : अर्थसंकल्पाला पंतप्रधानांचा परिसस्पर्श, देशाचे कणखर नेतृत्व करताना यांनी सादर केले बजेट

Union Budget 2023 : पंतप्रधान पदाची जबाबदारी सांभाळत असतानाच या महान नेत्यांनी अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी पार पाडली होती.

Union Budget 2023 : अर्थसंकल्पाला पंतप्रधानांचा परिसस्पर्श, देशाचे कणखर नेतृत्व करताना यांनी सादर केले बजेट
बजेटचे किस्से
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 10:21 AM

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) या येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2023) सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हे पाचवे बजेट आहे. 2024 मध्ये देशात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होईल. त्याआधी हे केंद्र सरकारचे पूर्ण बजेट असेल. यापूर्वी देशात पंतप्रधान पदाची जबाबदारी सांभाळत असतानाच अर्थसंकल्पही सादर करण्याचे काम लिलया या नेत्यांनी पूर्ण केले. त्यांनी अर्थमंत्र्यांची अतिरिक्त जबाबदारी पार पाडली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पंतप्रधानांमध्ये (Prime Minister) त्यांचे नाव नोंदविल्या गेले आहे.

जवाहरलाल नेहरु यांनी पहिल्यांदा पंतप्रधानपदी असताना देशाचा आर्थिक लेखाजोखा मांडला होता. त्यांनी पंतप्रधान पदी असताना केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. 1958-59 या कालावधीत त्यांनी अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त कारभार हाकला. त्यावेळी टी. टी. कृष्णाचारी यांना अर्थखात्याचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप झाला होता.

केंद्रीय अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक वेळा संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. देसाई यांनी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये 8 पूर्ण अर्थसंकल्प तर दोन अंतरिम होते. सर्वाधिक बजेट सादर करण्याचा रेकॉर्ड देसाई यांच्या नावे आहे.

हे सुद्धा वाचा

अर्थमंत्री म्हणून मोरारजी देसाई यांनी 1959-60 ते 1963-64 या पाच वर्षांत त्यांनी पाच वेळा अर्थसंकल्प सादर केले. तर 1962-63 या काळात अंतरिम बजेट सादर केले. दुसऱ्यांदा ते केंद्रीय अर्थमंत्री झाल्यावर 1967-68 ते 1969-70 या काळात त्यांनी बजेट सादर केले. 1967-68 या काळात त्यांनी एक अंतरिम बजेट सादर केले.

मोरारजी देसाई यांच्यानंतर प्रणब मुखर्जी, पी. चिंदबरम, यशवंत सिन्हा, यशवंतराव चव्हाण आणि चिंतामणराव देशमूख यांचा क्रमांक लागतो. या सगळ्यांनी प्रत्येकी सात वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला.  त्यानंतर इतरांच्या नावेही अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड आहे.

आयर्न लेडी इंदिरा गांधी यांनी पण केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यांनी 1970 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता. सध्याच्या अर्थमंत्री सीतारमण यांच्या नावे अनेक रेकॉर्ड आहेत. इंदिरा गांधी 1970-71 मध्ये पंतप्रधानपदी असताना त्यांनी अर्थ मंत्रालय स्वतःकडे ठेवले होते आणि अर्थसंकल्प सादर केला होता. परंतु, पूर्णवेळ महिला अर्थमंत्र्याची जबाबदारी सीतारमण यांच्या नावे नोंद आहे.

राजीव गांधी यांच्या नाव या यादीत आहे. पंतप्रधान असताना त्यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. 1987 मध्ये त्यांनी जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंत अर्थखात्याचा कारभार पाहिला. त्याच दरम्यान त्यांनी अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान पदी असताना अर्थसंकल्प सादर करणारे नेहरु-गांधी परिवारातील ते तिसरे सदस्य होते. त्यांनी व्ही.पी. सिंह यांना या पदावरुन हटवले होते.

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.