Pandora Papers: सचिन तेंडुलकरनंतर अनिल अंबानी, जॅकी श्रॉफ आणि नीरा राडियाही अडचणीत?

Pandora papers | जगातील 117 देशांच्या 600 पत्रकारांनी केलेल्या पँडोरा पेपर्स या शोध मोहिमेच्या माध्यमातून जगातील धनाढ्यांनी करचुकवेगिरी करुन परदेशात केलेल्या गुंतवणुकीचा तपशील समोर आणण्यात आला होता. या शोध मोहीमेत 1.19 कोटीहून अधिक गोपनीय फाईल्स पत्रकारांच्या हाती लागल्या आहेत. यामधून जगभरातील धनाढ्यांचे गुप्त व्यवहार चव्हाट्यावर आले आहेत.

Pandora Papers: सचिन तेंडुलकरनंतर अनिल अंबानी, जॅकी श्रॉफ आणि नीरा राडियाही अडचणीत?
पँडोरा पेपर्स
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 11:17 AM

नवी दिल्ली: सध्या जगभरात गाजत असलेल्या पँडोरा पेपर्स (Pandora Papers) प्रकरणात आणखी काही भारतीय व्यक्तींची नावे समोर आली आहे. पँडोरा पेपर्समधील तपशीलांच्या आधारे माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने परदेशात अवैधरित्या गुंतवणूक केल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये आता उद्योगपती अनिल अंबानी, अभिनेता जॉकी श्रॉफ, विनोद अडानी, किरण मुजूमदार शॉ, सतिश शर्मा आणि नीरा राडिया यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

जगातील 117 देशांच्या 600 पत्रकारांनी केलेल्या पँडोरा पेपर्स या शोध मोहिमेच्या माध्यमातून जगातील धनाढ्यांनी करचुकवेगिरी करुन परदेशात केलेल्या गुंतवणुकीचा तपशील समोर आणण्यात आला होता. या शोध मोहीमेत 1.19 कोटीहून अधिक गोपनीय फाईल्स पत्रकारांच्या हाती लागल्या आहेत. यामधून जगभरातील धनाढ्यांचे गुप्त व्यवहार चव्हाट्यावर आले आहेत. अनिल अंबानी यांनी लंडनमधील न्यायालयात आपण दिवाळखोर असल्याचे जाहीर केले असले तरी परदेशात त्यांच्या मालकीच्या अनेक कंपन्या असल्याची माहिती समोर आली आहे.

किरण मुजूमदार शॉ यांचे स्पष्टीकरण

पँडोरा पेपर्स प्रकरणानंतर किरण मुजूमदार शॉ यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. माझ्या पतींच्या परदेशातील ट्रस्टच्या नावाचा अयोग्यपणे वापर केला जात आहे. मुळात ही ट्रस्ट वैध आहे, त्याचा कारभारही स्वतंत्र विश्वस्तांकडून हाताळला जातो. त्यामुळे पँडोरा पेपर्सच्या आधाराने करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे किरण मुजूमदार शॉ यांनी स्पष्ट केले आहे.

सचिन तेंडुलकरच्या वकिलांनी दावा फेटाळला

या सगळ्या प्रकारानंतर सचिन तेंडुलकरच्या वकिलांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सचिन तेंडुलकर यांची सर्व गुंतवणूक वैध मार्गाने केलेली आहे. आयकर विभागाला याविषयी माहिती देण्यात आली होती, असे वकिलांकडून सांगण्यात आले.

नक्की काय आहे प्रकरण?

सचिन तेंडुलकरसह जगातील अनेक सेलिब्रिटींनी टॅक्स हेवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशांमध्ये विविध माध्यमांतून पैसा गुंतवल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, सचिन तेंडुलकरकडून ब्रिटीश व्हर्जिन आयलंड येथील संपत्ती विकण्याचा प्रयत्न झाला होता. पनामा पेपर्स लीक प्रकरणामुळे अनेक भारतीय व्यक्तींनी कर वाचवण्यासाठी परदेशात अवैधरित्या गुंतवणूक केल्याचे समोर आले होते. या प्रकरणानंतर संबंधित भारतीय व्यक्तींना ही संपत्ती विकण्याचे किंवा दुसरीकडे गुंतवणूक करण्याचे प्रयत्न सुरु केले होते. पँडोरा पेपर्समधील माहितीनुसार, जगातील अनेक राजकारण्यांचीही परदेशात संपत्ती आहे. यामध्ये भारतातील सहा, तर पाकिस्तानमधील सात राजकारण्यांचा समावेश आहे.

पँडोरा पेपर्समध्ये आणखी कोणाची नावं?

या अहवालातील माहितीनुसार, 300 हून अधिक भारतीय नावांपैकी 60 जणांविरोधात पुरावे असून त्यांची चौकशीही झाली आहे. येत्या काही याविषयीच्या आणखी काही गोष्टी समोर येतील. या लोकांनी सामोआ, बेलीज, कुक बेटांपासून ते ब्रिटिश व्हर्जिन बेटे आणि पनामा यासारख्या देशांमध्ये बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून पैसा गुंतवल्याचे समजते.

पँडोरा पेपर्सच्या माहितीनुसार, भारतातील केवळ राजकारणी आणि सेलिब्रिटींनीच परदेशात गुंतवणूक केलेली नाही. तर यामध्ये महसूल खात्याचे माजी अधिकारी, आयकर खात्याचे माजी आयुक्त आणि माजी सैन्याधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.