GST | आता चक्क पासबुकवरही 18 टक्के जीएसटी भरावा लागणार, वाचा कोणत्या वस्तूंवर अधिक जीएसटी लागणार!
फक्त पॅक बंद नव्हेतर आता तुमचा हाॅस्पीटलच्या खर्चामध्ये देखील मोठी वाढ होणार आहे. तुम्हाला हाॅटेलच्या रूमसाठी देखील ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत. ज्या हाॅटेल खोलीचे 1000 रूपयांच्या पुढे भाडे आहे, त्यावरही आता जीएसटी भरावा लागणार आहे.
दिल्ली : जीएसटी (GST) आता कशावर भरावा लागेल याचा अजिबात नेमच राहिला नाहीयं. आता तुम्हाला तुमच्या बँकेच्या पासबुकावरही 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच एक बैठक (Meeting) झालीयं. याबैठकीमध्ये काही वस्तूंवर नव्याने जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून काही वस्तूंवरील जीएसटी आता वाढवण्यात येणार आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार हे नक्कीच आहे. सुरूवातीच्या काळात जीएसटीला प्रचंडविरोध करण्यात आला. मात्र, आता हळूहळू सर्वच गोष्टींवर जीएसटी हा लावला जातोय.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा मोठा निर्णय
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच एक बैठक घेतली. यामुळे अनेक वस्तूंवर जीएसटी लावण्यात आला आहे. यामुळे प्रामुख्याने म्हणजे 18 जुलैपासून पासबुकवरही जीएसटी लागणार आहे. पॅक बंद लस्सी, पनीर, दही, मध, गह महाग होणार आहेत. हे सर्व कर 18 जुलैपासून लागू केले जाणार असल्याची माहिती आहे. अगोदर पॅक खाद्यपदार्थ्यांवर सूट होती. मात्र, आता त्यावर 5 टक्के जीएसटी करण्यात आला आहे. म्हणजे काय तर या पॅक बंद खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होणार आहे.
हाॅस्पीटलचा खर्च देखील महागणार
फक्त पॅक बंद नव्हेतर आता तुमचा हाॅस्पीटलच्या खर्चामध्ये देखील मोठी वाढ होणार आहे. तुम्हाला हाॅटेलच्या रूमसाठी देखील ज्यादा पैसे मोजावे लागणार आहेत. ज्या हाॅटेल खोलीचे 1000 रूपयांच्या पुढे भाडे आहे, त्यावरही आता जीएसटी भरावा लागणार आहे. विशेष म्हणजे हाॅटेल खोलीवर तब्बल 12 टक्के जीएसटी हा भरावा लागणार असल्याने आता हाॅटेलमध्ये राहणे देखील महाग होणार. रुग्णालयांतील एका बेडसाठी 5 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. एलईडी लॅम्पस् देखील महाग होणार आहेत.