पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेमध्ये 705 रुपये भरा, मॅच्युरिटीवर 17.30 लाख मिळणार

पोस्टल लाईफ इन्शुरन्स IRDAI च्या कक्षेत येत नाहीत आणि यामध्ये पॉलिसीधारकाला बंपर बोनसचा लाभदेखील मिळतो. पोस्ट ऑफिसकडून दरवर्षी बोनस जाहीर केला जातो.

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेमध्ये 705 रुपये भरा, मॅच्युरिटीवर 17.30 लाख मिळणार
Post Office Recurring Deposit Account
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 7:15 AM

नवी दिल्लीः Post Office Insurance Policy: आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा विमा पॉलिसीबद्दल सांगणार आहोत, ज्या तुमचे संपूर्ण आयुष्य सुरक्षित करू शकतात. पोस्टल लाईफ इन्शुरन्स IRDAI च्या कक्षेत येत नाहीत आणि यामध्ये पॉलिसीधारकाला बंपर बोनसचा लाभदेखील मिळतो. पोस्ट ऑफिसकडून दरवर्षी बोनस जाहीर केला जातो.

ही एक ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स (RPLI) योजना

या विमा पॉलिसीचे नाव आहे, पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा. ही एक ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स (RPLI) योजना आहे, जी 1995मध्ये सुरू झाली. विशेषतः ग्रामीण भारतातील गरीब लोकांसाठी ती तयार केली गेली. पात्रतेबद्दल बोलताना किमान प्रवेश वय 19 वर्षे आणि कमाल प्रवेश वय 55 वर्षे आहे. किमान विमा रक्कम 10 हजार रुपये आणि कमाल विमा रक्कम 10 लाख रुपये मिळते. कर्जाची सुविधा चार वर्षांनंतर उपलब्ध आहे. ही पॉलिसी तीन वर्षांनंतर सरेंडर करता येते. इंडिया पोस्टल लाईफ इन्शुरन्स मोबाईल अॅपवर उपलब्ध माहितीनुसार बोनस प्रति हजार विमा रक्कम 60 रुपये आहे. म्हणजे एक लाखाच्या विमा रकमेवर एक वर्षाचा बोनस 6000 रुपये आहे.

नामनिर्देशित व्यक्तीला मॅच्युरिटीवर लाभ मिळणार

या पॉलिसीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे विमाधारकाच्या मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्तीला मॅच्युरिटीवर लाभ मिळतो किंवा विमाधारकाची 80 वर्षे पूर्ण झाल्यावर त्याला मॅच्युरिटी लाभ मिळतो. या पॉलिसी अंतर्गत मॅच्युरिटी वयोमर्यादा 50, 55, 58 आणि 60 वर्षे असू शकते.

मासिक प्रीमियम किती असेल?

RPLI योजनेंतर्गत प्रीमियमच्या रकमेबद्दल बोलायचे झाल्यास जर कोणी 19 वर्षांच्या वयात 5 लाखांची विमा रक्कम विकत घेतली आणि त्याचे मॅच्युरिटी वय 60 वर्षे असेल तर प्रत्येक महिन्यासाठी प्रीमियमची रक्कम 705 रुपये असेल. 58 वर्षांच्या मॅच्युरिटीवर प्रीमियम 732 रुपये, 55 वर्षांच्या मॅच्युरिटीवर प्रीमियम 758 रुपये आणि 50 वर्षांच्या मॅच्युरिटीवर प्रीमियम 810 रुपये असेल.

मुदतपूर्तीनंतर 17.30 लाख उपलब्ध होतील

60 वर्षांच्या मॅच्युरिटीसाठी रक्कम 17.30 लाख, 58 वर्षांसाठी 16.70 लाख, 55 वर्षांसाठी 15.80 लाख आणि 50 वर्षांसाठी 14.30 लाख रुपये असेल. बोनसची गणना करणे अगदी सोपे आहे. हे प्रति वर्ष 60 रुपये प्रति विमा रक्कम आहे. त्यानुसार एक लाखाच्या विमा रकमेवरील बोनस 6000 रुपये झाला. 5 लाखांच्या विमा रकमेवर वार्षिक बोनस 30 हजार रुपये झाला. जर 18 वर्षांच्या मुलाने 60 वर्षांची योजना निवडली तर 41 वर्षांमध्ये एकूण बोनस 12.30 लाख रुपये आहे. या 41 वर्षांत तो प्रीमियम म्हणून 3.46 लाख रुपये जमा करेल.

संबंधित बातम्या

LIC च्या ‘या’ योजनेत आधार कार्ड असणाऱ्या महिला बनणार श्रीमंत, जाणून घ्या…

PNB स्वस्तात विकतेय 13598 घरे, दुकाने आणि शेतजमीन, जाणून घ्या खरेदीची प्रक्रिया

Pay Rs 705 in Post Office’s Post Office Gram Suraksha, you will get Rs 17.30 lakh on maturity

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.