AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paytm KYC Update : पेटीएम मनीची केवायसी मुदत वाढ, म्युच्युअल फंड ग्राहकांना आता या तारखेपर्यंत करता येणार खाते अपडेट

Paytm KYC News : पेटीएम मनीने (Paytm Money Ltd) म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे. केवायसी अपडेटची आणि डिमॅट खाते अद्ययावत करण्यासाठी 31 ऑक्टोबर 2022 रोजी पर्यंत अंतिम मुदत वाढ दिली आहे.

Paytm KYC Update : पेटीएम मनीची केवायसी मुदत वाढ, म्युच्युअल फंड ग्राहकांना आता या तारखेपर्यंत करता येणार खाते अपडेट
पेटीएम केवायसी अपडेटसाठी मुदतवाढ Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 5:42 PM

मुंबई : पेटीएम मनी लिमिटेडने (PML) आपल्या डायरेक्ट म्युच्युअल फंड युजर्ससाठी त्यांचे केवायसी अपडेट (KYC Update) करण्याची आणि डिमॅट खाते उघडण्यासाठी 31 ऑक्टोबर 2022 रोजी पर्यंत अंतिम मुदत वाढ दिली आहे. कंपनीने देशातील सर्वात मोठा एक्झिक्युशन प्लॅटफॉर्म बीएसई (BSE) स्टार एमएफ प्लॅटफॉर्म बीएसई स्टार एमएफसोबत त्यांच्या स्टॉक ब्रोकिंग कोडअंतर्गत (Stock Broking Code) डायरेक्ट म्युच्युअल फंड्स (Direct Mutual Fund) प्रस्तुत करण्यासाठी एकीकरण केले आहे. याआधी पेटीएम मनी लिमिटेड सेबीच्या नियमांनुसार एका आरआयए कोडअंतर्गत त्यांच्या स्वतःच्या तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर डायरेक्ट म्युच्युअल फंड एक्झिक्युशन व अड्वायजरी सेवा देत होती. एप्रिल 2021 मध्ये त्यांच्या अड्वायजरी सेवा खंडित करण्यात आल्यानंतर आता पेटीएम मनीने जुलै 2022 पासून स्टॉक ब्रोकिंग कोड वापरून डायरेक्ट म्युच्युअल फंड्ससाठी फक्त एक्झिक्युशन सेवा देण्याचे ठरवले आहे.

पेटीएम मनी अॅप

बीएसई स्टारवर आरआयए कोड ते स्टॉकब्रोकर कोड अशा तंत्रज्ञान बॅकएन्ड शिफ्टसाठी एक युसीसी (Unique Client Code) निर्माण करणे आवश्यक असते आणि सेबीच्या युसीसी नियमांनुसार युजर्सचे डिमॅट खाते असणे अनिवार्य आहे. पेटीएम मनी आणि बीएसई स्टार एकीकरणामुळे युजर्सना मिळणाऱ्या अनुभवांमध्ये काहीही बदल होणार नाही. पेटीएम मनी ऍपच्या सर्व वैशिष्ट्यांचा आणि सेवांचा लाभ ते सतत मिळवत राहू शकतील.

हे सुद्धा वाचा

पेटीएम मनी लिमिटेडचे सीईओ वरुण श्रीधर (CEO Varun Shridhar) म्हणाले, “आम्ही भारतामध्ये डायरेक्ट म्युच्युअल फंड्सची सुरुवात अगदी सोप्या, खर्च शून्य असलेल्या व पारदर्शक पद्धतीने केली आणि आता आम्ही एक नवा आकर्षक डायरेक्ट म्युच्युअल फंड अनुभव सादर करण्यासाठी सज्ज आहोत. बीएसई स्टारसोबत बॅकएन्ड तंत्रज्ञान एकीकरणामुळे आमच्या रिटेल गुंतवणूकदारांना अनेक वेगवेगळे लाभ मिळतील आणि नियामक आवश्यकतांनुसार गुंतवणूकदारांना डिमॅट खाते सुरु करणे व आमच्या प्लॅटफॉर्मवर एक युसीसी तयार करणे गरजेचे आहे. फक्त डायरेक्ट म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक केली जात असल्यास डिमॅट खाते संपूर्ण आयुष्यभर निःशुल्क राहील. आम्ही आमच्या गुंतवणूकदारांप्रती वचनबद्ध आहोत आणि त्यांच्या गुंतवणूक वाटचालीचा आदर करतो. त्यांचे बचत नियोजन आणि एसआयपी आमच्यासाठी महत्त्वाचे आहे आणि म्हणूनच त्यांना तीन महिने वाढवून देण्यात आले आहेत, अगदी सहजसोपे टप्पे पूर्ण करण्यासाठी त्यांना हा वेळ पुरेसा ठरेल.”

डायरेक्ट म्युच्युअल फंड गुंतवणूकदार या अतिशय सहजसोप्या टप्प्यांचे पालन करून त्यांची खाती अपडेट करू शकतील. ही सर्व कार्यवाही 100% डिजिटल करता येण्याजोगी आहे.

1. तुमच्या सहीचा सुस्पष्ट फोटो सबमिट करा.

2. केवायसीचा एक भाग म्हणून पेटीएम मनी ऍपवर एक लाईव्ह फोटो क्लिक करा.

3. निःशुल्क डिमॅट खाते सुरु करण्यासाठी ई-साइन पूर्ण करा.

बीएसई स्टारसोबत एकीकरणानंतर ऍपमार्फत डायरेक्ट म्युच्युअल फंड गुंतवणुकीसंदर्भात रिटेल गुंतवणूकदारांसाठी काही महत्त्वाची माहिती पुढीलप्रमाणे आहे:

  • 1. पेटीएम मनी हे भारतामध्ये डायरेक्ट म्युच्युअल फंडांचे आघाडीचे वितरक आहेत.
  • 2. स्टेटमेंट ऑफ अकाउंट फॉर्ममध्ये (एसओए) असलेली युनिट्स कायम राहतील. ती युनिट्स डिमॅट खात्यामध्ये हलवली जाणार नाहीत.
  • 3. इक्विटीमध्ये गुंतवणूक सुरु करण्याचा निर्णय जोवर गुंतवणूकदार घेत नाहीत आणि जोवर डिमॅट खाते हे फक्त डायरेक्ट म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठीच वापरले जात आहे तोवर त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. हे डिमॅट खाते इक्विटी गुंतवणुकीसाठी वापरणार असल्यास इक्विटी टॅरीफ्स लागू होतील.
  • 4. सध्याचे एसआयपी आता जसे आहेत तसे, कोणतेही बदल न करता प्रोसेस केले जातील, आणि गुंतवणूकदार त्यांची गुंतवणूक ऍपमध्ये पाहू शकतील.
  • 5. गुंतवणूकदारांना त्यांच्या सध्याच्या पोर्टफोलिओला रिडीम करण्याची किंवा त्याबाबत काहीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही आणि हे एकीकरण संपूर्णपणे बीएसई स्टार व पेटीएम मनी टीममार्फत हाताळले जाईल.
  • 6. सध्याचे जे गुंतवणूकदार पेटीएम मनी डिमॅट खात्यामार्फत इक्विटीजमध्ये आधीपासून गुंतवणूक करत आहेत त्यांना कोणतीही कार्यवाही करण्याची गरज नाही कारण त्यांचा युसीसी आधीच तयार करण्यात आला आहे आणि तोच युसीसी डायरेक्ट म्युच्युअल गुंतवणुकींसाठी वापरता येईल.

हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.

काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?.
'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव
'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव.