50 वर्षांवरील नागरिकांसाठी ‘या’ बँकेची भन्नाट मुदत ठेव योजना, मोठा लाभ मिळणार
पेटीएम पेमेंटेस बँकेने 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या बँकेत मुदत ठेव ठेवण्याची तयारी करत असणाऱ्या नागरिकांसाठी चांगली योजना आणली आहे. Paytm Payments bank
नवी दिल्ली: पेटीएम पेमेंटेस बँकेने 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या बँकेत मुदत ठेव ठेवण्याची तयारी करत असणाऱ्या नागरिकांसाठी चांगली योजना आणली आहे. गुंतवणूक करणाऱ्यांसाठी पेटीएम पेमेंट्स बँक हा एक चांगला पर्याय आहे. पेटीएम बँकेन एफडी 50 वर्षापेक्षा वय जास्त असणाऱ्या नागरिकांसाठी आणि ते ज्येष्ठ नागरिक होती त्यावेळी मुदत संपणाऱ्या कालावधीसाठी मुदत ठेव योजना लागू केली आहे. ( Paytm Payments bank offering senior citizen FD rates if you are 60 when it matures )
बँका मुदत ठेवीवरील व्याज दर सामान्यपणे एफडी खाते उघडण्याच्या वेळी ठेवीदाराच्या वयाच्या आधारावर निश्चित करतात. मात्र, पेटीएम पेमेंट्स बँकेने 50 वर्षांवरील ठेवीदारांसाठी खुली ऑफर आणली आहे. पेटीएम बँक मुदत ठेवीच्या नूतनीकरणाच्या वेळी ठेवीदाराचे वय निश्चित करणार आहे.
जादा व्याज मिळणार
एखाद्या व्यक्तीने पेटीएम पेमेंट्स बँक एफडीमध्ये पैसे जमा केले आणि नूतनीकरणाच्या वेळी 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असेल तर गुंतवणूकदारांना ज्येष्ठ नागरिक म्हणून अधिक व्याज दर मिळेल. म्हणजेच त्यांना सर्वसामान्यांपेक्षा 0.50 टक्के अधिक व्याज मिळेल. जर ठेवीदाराने मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी रक्कम काढल्यास त्यांच्याकडून दंड घेतला जाणार नाही. पेटीएम पेमेंट्स बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नूतनीकरणाच्या दिवशी जर ग्राहक ज्येष्ठ नागरिक झाला असेल. तर, त्याला पेटीएम बँक ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत एफडी (प्रिन्सिपल + इंटरेस्ट) चे ऑटोमेटिक करू शकतात.
पेटीएम पेमेंटस बँकेच्या मुदत ठेवीची वैशिष्टये
>>आपण कधीही एफडी बंद करु शकता आणि काही सेकंदात आपल्या खात्यात पैसे जमा होतील.
>> जर तुमची एफडी निर्धारित वेळे आधीच बंद केली असेल म्हणजेच किमान 7 दिवसांच्या कालावधीपूर्वी तर मुदत संपण्यापूर्वी एफडीसाठी कोणतेही व्याज दिले जाणार नाही.
>>पेटीएम पेमेंट्स बँक मुदत ठेव खाते मुदतीपूर्वी बंद केल्यास कोणताही दंड आकारला जात नाही.
>> मुदत ठेवीचे मुदतपूर्तीनंतर आपोआप नूतनीकरण केले जाईल. एफडीचे दर व कार्यकाळ पेटीएम पेमेंट्स बँकेमार्फत ग्राहकांना कळविला जाईल.
महापौरांना काही बोलायची भीती वाटते, त्या आमचा बाप काढतील; शौचालयाच्या राजकारणावरुन आशिष शेलारांचा टोला#AshishShelar #Mumbai https://t.co/QI08T4KMu6
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 14, 2021
संबंधित बातम्या:
परदेशात पैसे पाठवणाऱ्यांना मोठा दिलासा, 30 जूनपर्यंत बँकामध्ये ‘हे फॉर्म’ ऑफलाईन भरता येणार
( Paytm Payments bank offering senior citizen FD rates if you are 60 when it matures )