PayTM घसरण थांबेना! शेअर्स 520 रुपयांच्या निच्चांकी पातळीवर, गुंतवणूकदारांना शॉक
पेटीएम स्टॉक (Paytm stock) सूचीबद्ध (लिस्टेड) झाल्यानंतर गुंतवणुकदारांना आतापर्यंत एक लाख कोटी रुपयांवर पाणी सोडावं लागलं आहे. अद्यापपर्यंत स्टॉकला आपल्या इश्यू प्राईसपेक्षा अधिक किंमत मिळू शकली नाही.
नवी दिल्ली : पेटीएम (Paytm) स्टॉकमध्ये घसरणीचे सत्र सुरुच आहे. आज (बुधवारी) पेटीएम स्टॉक नीच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने पेटीएमची पॅरेंट कंपनी वन 97 कम्युनिकेशनकडे स्टॉक (Stock) मध्ये होणाऱ्या घसरणीबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे. पेटीएम स्टॉक (Paytm stock) सूचीबद्ध (लिस्टेड) झाल्यानंतर गुंतवणुकदारांना आतापर्यंत एक लाख कोटी रुपयांवर पाणी सोडावं लागलं आहे. अद्यापपर्यंत स्टॉकला आपल्या इश्यू प्राईसपेक्षा अधिक किंमत मिळू शकली नाही. जागतिक ब्रोकरेज फर्मने (Brokrage firm) पेटीएम मध्ये अधिक घसरणीचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या गोटात धास्तीचं वातावरण निर्माण झालं आहे. Macquarie ब्रोकरेज फर्मने स्टॉकसाठी अधिक घसरण 450 पर्यंतचे लक्ष्य ठेवले आहे. सध्याच्या स्थितीपेक्षा 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
एक लाख कोटींवर पाणी
बीएसईवर आज (बुधवारी) स्टॉक 520 रुपयांच्या किंमतीवर पोहोचला. आतापर्यंतचा सर्वात नीच्चांकी स्तर आहे. बीएसईवर स्टॉक आज (बुधवारी) 3.6 टक्क्यांच्या घसरणीसह 524.4 वर टप्प्यावर पोहोचला. त्यामुळे आजच्या घसरणीसह स्टॉक 2,150 च्या इश्यू प्राईसच्या तुलनेत 75 टक्क्यांहून अधिक घसरण आहे. इश्यू प्राईस वर कंपनीचा मार्केट कॅप 1.39 लाख कोटी रुपयांवर होता. सध्या कंपनीचा मार्केट कॅप 34 हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. अर्थजाणकरांनी आतापर्यंत एक लाख कोटी रुपयांवर पाणी फेरल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
टार्गेट प्राईसपर्यंत घसरण
पेटीएम शेअरची टार्गेट प्राईस 900 रुपये निश्चित करण्यात आली आहे आणि पेटीएमचा शेअर्स टार्गेट प्राईस पर्यंत पोहोचला आहे. पेटीएमचा शेअर तीन महिन्यांपूर्वी सूचीबद्ध (लिस्टिंग) करण्यात आला होता. मात्र, घसरणीमुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणुकदारांचा मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला आणि अद्यापही शेअर्स इश्यू प्राईस पर्यंत पोहोचू शकलेला नाही.
कोल इंडियापेक्षा मोठा IPO
पेटीएमचा आयपीओ सर्वात मोठा ठरला होता. पेटीएमने सुरुवातीच्या आठवड्यात गुंतवणूकदारांकडून 8,235 कोटी रुपये उभे केले होते. पेटीएमची सुरुवात एक दशकापूर्वी अलीगडमधील एका शिक्षकाच्या मुलाने सुरू केले होते. ज्याने मोबाईल फोन रिचार्ज करण्यास सुरुवात केली होती. पेटीएमचे मूल्य $16 अब्ज आहे. ही कंपनी 2010 मध्ये सुरू झाली. ही भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट कंपन्यांपैकी एक आहे. One97 Communications चे संस्थापक आणि CEO पेटीएम IPO मध्ये 402 कोटी रुपयांचे शेअर्स विक्रीचे उदिष्ट ठेवले होते.
इतर बातम्या :