किंमत तर पिझ्झा-बर्गरपेक्षा कमी, या 7 शेअरने गुंतवणूकदारांचा भरला खिसा
Multibagger Stock : बाजारातील चढउतारात या पेनी स्टॉकने मोठा परतावा दिला आहे. पिझ्झा-बर्गरपेक्षा ही स्वस्तातील या शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. केवळ 5 महिन्यांत या शेअरने 354 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
शेअर बाजारात अनेक इटुकले-पिटुकले शेअर कमाल दाखवत आहे. बाजारात लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु असताना चढउताराचे सत्र सुरु आहे. पण या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांचे नशीब उघडले आहे. या सात शेअरने गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. या शेअरची किंमत पिझ्झा-बर्गरपेक्षा पण कमी आहे. हे शेअर 50 रुपयांपेक्षा पण कमी किंमतीतील आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना 5 महिन्यांत 354 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
या शेअरने केले मालामाल
- Spright Agro : या कंपनीच्या शेअरची किंमत सध्या 35 रुपयांच्या घरात आहे. एका वर्षापूर्वी या शेअरची किंमत केवळ 68 पैसे होती. गेल्या पाच महिन्यांत या शेअरने गुंतवणूकदारांना जवळपास 354 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. एप्रिल 2021 मध्ये हा शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. मागील तीन वर्षांत या शेअरने 9705 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे.
- Sunshine Capital : सनशाईन कॅपिटलच्या शेअरने गेल्या एका आठवड्यात 12 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या शेअरचा भाव 3.83 रुपये आहे. या शेअरने एका वर्षात 227% रिटर्न दिला आहे.
- Hindustan Motors : हिंदुस्थान मोटर्सच्या शेअरने एका वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गेल्या काही दिवसांपासून हा शेअर दबावाखाली आहे. बिर्ला ग्रुपच्या या शेअरने मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे. या शेअरने एका वर्षात 140 टक्क्यांची उसळी घेतली आहे. हा शेअर सध्या 41 रुपयांवर व्यापार करत आहे.
- Vipul : पेनी स्टॉकच्या यादीत हा अजून एक शेअर आहे. या शेअरने गुंतवणूकदारांची चांदी केली आहे. विपुलच्या शेअरने गुंतवणूकदारांना एका वर्षात 137% रिटर्न दिला आहे. हा शेअर सध्या 41 रुपयांवर ट्रेड करत आहे.
- Vardhman Polytex : वर्धमान पॉलिटेक्स लिमिटेडचा शेअरचा वर्षातील निच्चांक 4.11 रुपये तर उच्चांक 12.15 रुपये आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना एका वर्षात 112 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या कंपनीचे बाजारातील भांडवल 331.59 कोटी रुपये आहे.
- PVP Ventures आणि Vintron Informatics : पीव्हीपी व्हेंचर्स आणि विन्टरो इंफॉर्मेटिक्सने गुंतवणूकदारांना कमी कालावधीत मालामाल केले. PVP Ventures ने 102 टक्के परतावा दिला. हा शेअर 29 रुपयांवर ट्रेड करत आहे. तर Vintron Informatics शेअरने एका वर्षात 101 टक्क्यांचा परतावा दिला. हा शेअर 31 रुपयांवर व्यापार करत आहे.
हे सुद्धा वाचा
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका