पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! पैसे मिळाले नाही किंवा इतर समस्येसाठी ‘इथे’ करा तक्रार

पेन्शन मिळण्यासाठी जर काही त्रास होत असेल तर बर्‍याचदा तक्रारी करूनही बँक किंवा सरकारी विभाग तुमच्या समस्येकडे लक्ष देत नाही. पण आता तुम्ही घर बसल्या तक्रार नोंदवू शकता.

पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! पैसे मिळाले नाही किंवा इतर समस्येसाठी 'इथे' करा तक्रार
Follow us
| Updated on: Feb 23, 2021 | 10:17 AM

मुंबई : सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला पेन्शन मिळण्यासाठी जर काही त्रास होत असेल तर बर्‍याचदा तक्रारी करूनही बँक किंवा सरकारी विभाग तुमच्या समस्येकडे लक्ष देत नाही. पण आता तुम्ही घर बसल्या तक्रार नोंदवू शकता. यासाठी सरकारने www.pensionersportal.gov.in हे पोर्टल तयार केलं आहे. (pension latest news pensioners how to do complain about pension- here know full process )

पेन्शन पोर्टलवर तक्रार करण्यासाठी तुम्हाला नाव, कंपनीची माहिती, पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) इत्यादी माहिती भरावी लागणार आहे. यावर तक्रार नोंदवल्यानंतर सरकारकडून तुमच्या लगेच उत्तर मिळेल, अशीही माहिती देण्यात आली आहे. पण नेमकी तक्रार कशी नोंदवायची जाणून घेऊयात…

1. सगळ्यात आधी www.pensionersportal.gov.in वर जा. यानंतर CPENGRAMS वर क्लिक करा

2. यानंतर ‘इंडिव्हिज्यूअल पेन्शनर्स’ च्या पर्यायाला निवडा आणि तक्रार या पर्यायावर क्लिक करा.

3. यानंतर तुम्ही तक्रार करून शकता. यासाठी ‘Lodge Your Grievance’ या पर्यायावर क्लिक करा. यामध्ये तुमची तक्रार रजिस्टर झाल्याचं तुम्हाला दिसेल.

4. या फॉर्ममध्ये मंत्रालय आणि विभागासंबंधी माहिती द्यायची आहे. जर तुमच्या विभागाचं नाव यादीमध्ये नसेल तर ‘ Not known / not listed’ हा पर्याय तुम्हाला विचारण्यात येईल.

5. यामध्ये हवा तसा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला संबंधित विभागाकडून माहिती दिली आहे. यासाठी एक पत्र मिळतं ते पीडीएफ फॉर्मेटमध्ये अपलोड करायचं असतं.

6. फॉर्ममधील सर्व तपशील भरल्यानंतर कॅप्चा कोड भरा आणि ‘सबमिट’ करा. तक्रार यशस्वीरित्या नोंदवल्यानंतर तक्रार क्रमांक स्क्रीनवर दिसून येईल. भविष्यातील वापरासाठी ती माहिती जपून ठेवा.

7. जर फॉर्म भरताना तुम्ही मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी दिला असेल तर तक्रार नोंदणी क्रमांक एसएमएस आणि ईमेलद्वारेही पाठवला जाईल. (pension latest news pensioners how to do complain about pension- here know full process )

संबंधित बातम्या – 

10 हजार गुंतवणूक वर्षाला मिळवा 16 लाख, पोस्ट ऑफिसची सगळ्यात चांगली योजना

Post Office ची धमाकेदार योजना, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर महिन्याला मिळेल उत्तम परतावा

‘या’ बड्या कंपन्यांसोबत काम करा आणि दिवसाला कमावा 5000 रुपये, वाचा काय आहे बिझनेस प्लॅन

(pension latest news pensioners how to do complain about pension- here know full process )

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.