Pension Rule | केंद्र सरकारचा धाडसी निर्णय! पतीऐवजी मुलांच्या नावे पेन्शन

Pension Rule | केंद्र सरकारने महिला कर्मचाऱ्यांना मोठा अधिकार दिला आहे. मोदी सरकारच्या या मास्टरस्ट्रोकचे सध्या सगळीकडे कौतुक होत आहे. या धाडसी निर्णयाने समाजात मोठा बदल येणार आहे. पतीऐवजी महिलांना त्यांची पेन्शन थेट मुलांच्या नावे करता येणार आहे. संसारात बेबनाव झालेल्या महिलांच्या मुलांना उदरनिर्वाह करता येईल.

Pension Rule | केंद्र सरकारचा धाडसी निर्णय! पतीऐवजी मुलांच्या नावे पेन्शन
Follow us
| Updated on: Jan 03, 2024 | 11:48 AM

नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2024 : केंद्र सरकारने मोठे पुरोगामी पाऊल उचललेच नाही तर टाकले सुद्धा. महिला कर्मचाऱ्यांना आता त्यांची पेन्शन पतीच्या नाही तर मुलांच्या नावे करता येणार आहे. लोकसभा 2024 पूर्वीचा हा मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक मानण्यात येत आहे. या धाडसी निर्णयाचे समाजात मोठे पडसाद उमटणार आहे. कौटुंबिक वाद सुरु असतील तर आता महिला कर्मचारी पतीच्याऐवजी मुलांची नावे पेन्शनसाठी देऊ शकते. केंद्रीय नागरी सेवा (निवृत्ती) 2021 च्या कलम 50 मध्ये मोदी सरकारने ही सुधारणा केली आहे. सरकारी कर्मचारी आणि सेवा निवृत्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांना हा नियम पेन्शन देण्याचा अधिकार देतो. सर्वात अगोदर पती अथवा पत्नीला पेन्शनचा अधिकार मिळतो. पण त्यात महत्वपूर्ण बदल झाला आहे.

असा केला मोठा बदल

पती-पत्नीच्या नात्यात कोणताही वाद ओढवला अथवा बेबनाव झाला तर हा सुधारीत नियम उपयोगी पडेल. सरकारच्या सेवेत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना कौटुंबिक पेन्शनमध्ये पतीऐवजी मुलगा, मुलगी यांचे नाव देता येईल. केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाचे (DOPPW) सचिव व्ही. श्रीनिवास यांनी याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, पेन्शन कायद्यात बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने पतीऐवजी मुलांची नावे पेन्शनसाठी नामांकित करण्यास मंजुरी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

बालविकास मंत्रालयाची महत्वपूर्ण भूमिका

घटस्फोटाचे प्रकरण सुरु असेल. घटस्फोट घेतला असेल, अथवा कौटुंबिक वाद सुरु असतील तर आता या सुधारणेमुळे मुलांची नावे पेन्शनसाठी जोडण्यात अडचण येणार नाही. कायद्यातील ही सुधारणा पतीराज संकल्पनेला मोठा धक्का असल्याचे मानण्यात येत आहे. बालविकास मंत्रालयाने याप्रकरणात महत्वपूर्ण भूमिका घेतली. मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर कायद्यात ही सुधारणा करण्यात आली. कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र असलेल्या मुलांचे नाव आता सरकारी महिला कर्मचाऱ्याला देता येईल.

अडचण झाली दूर

केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम 2021 च्या कलम 50 नुसार, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर, पेन्शन कुटुंबाला देता येते. त्यात सर्वात अगोदर पती अथवा पत्नीला हक्क देण्यात आलेला आहे. त्यातील सुधारणेमुळे आता महिला कर्मचाऱ्यांना कौटुंबिक पेन्शनसाठी पतीऐवजी मुलांची नावे देता येणार आहे.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.