Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol & Diesel: राज्यात इंधनाच्या दराचा भडका; आठवडाभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ

Petrol and Diesel prices | आगामी काळात मुंबईतील पेट्रोलचा दर 115 ते 120 रुपये प्रतिलीटर इतका होऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविलि आहे. राज्यातील इतर भागांमध्येही साधारण हीच परिस्थिती आहे.

Petrol & Diesel: राज्यात इंधनाच्या दराचा भडका; आठवडाभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ
पेट्रोल आणि डिझेल
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 10:19 AM

मुंबई: गेल्या आठडाभराच्या काळात राज्यात इंधनाच्या दराचा भडका उडाल्याचे चित्र आहे. या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दरांनी नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. मुंबईत बुधवारी पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 27 आणि 28 पैशांनी महागले. पेट्रोलचा (Petrol) आजचा दर 103.63 रुपये तर डिझेलचा (Diesel) दर 95.72 रुपये इतका आहे. तर प्रतिलीटर पॉवर पेट्रोलसाठी 107.64 रुपये मोजावे लागत आहेत. आगामी काळात मुंबईतील पेट्रोलचा दर 115 ते 120 रुपये प्रतिलीटर इतका होऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविलि आहे. राज्यातील इतर भागांमध्येही साधारण हीच परिस्थिती आहे. गेल्या आठवडाभराच्या काळात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. (Petrol and Diesel prices in Maharashtra)

ठाणे

23 जून – आजचा दर पेट्रोल- 103.81 डिझेल-95.89

15 जून- पेट्रोल-102.76 डिझेल-94.88

सिंधुदुर्ग

पेट्रोल दर आजचा- 104.95 आठवडाभरापूर्वीचा 103.90

डिझेल दर आजचा 95.53 आठवडाभरापूर्वीचा दर 94.54

रत्नागिरी

पेट्रोल दर आजचा-104.95 आठवडाभरापूर्वीचा दर 103.90

डिझेल दर आजचा 95.53 आठवडाभरापूर्वीचा दर 94.54

वाशिम

पेट्रोल दर- 103.80

डिझेल दर- 94.27

आठवडाभरापूर्वीचा दर

डिझेल : 94.25 पेट्रोल :103.64

अकोला

आजचे दर

पेट्रोल : 103.52 प्रतिलिटर डिझेल : 94.17 प्रतिलिटर

15 जून दर

पेट्रोल : 102.48 प्रतिलिटर डिझेल : 93.18 प्रतिलिटर

औरंगाबाद इंधन दर

पेट्रोल 23 जून 104. 26 रुपये 15 जून 103. 21 रुपये

डिझेल 23 जून 95.10 रुपये 15 जून 94.11 रुपये

जालना

पेट्रोल 105.18 डिझेल 95.74

नाशिक

पेट्रोल 104.06 डिझेल 94.66

आठवडाभरापूर्वीचा दर पेट्रोल 102.74 डिझेल 93.37

भिवंडी

पेट्रोल – 103.26 पैसे डिझेल – 93.89 पैसे

भंडारा

आजचे दर

पेट्रोल : 103.28 प्रतिलिटर डिझेल : 94.65 प्रतिलिटर

15 जून दर

पेट्रोल : 103.47 प्रतिलिटर डिझेल : 93.81प्रतिलिटर

कोल्हापूर:

आजचे दर

पेट्रोल : 103.81 प्रतिलिटर डिझेल : 94.43 प्रतिलिटर

15 जून दर

पेट्रोल : 102.96 प्रतिलिटर डिझेल : 93.45 प्रतिलिटर

पेट्रोल-डिझेल नव्हे तर ‘या’ तेलावर गाड्या चालणार

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे (Petrol-Diesel Price) त्रस्त असलेल्या लोकांसाठी येत्या 8 ते 10 दिवसांत सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये फ्लेक्स-फ्यूल इंजन (Flex-fuel Engine) अनिवार्य करण्याचा सरकार विचार करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी याबाबत माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की, हे पाऊल उचलल्याने शेतकऱ्यांना मदत होईल आणि भारतीय अर्थव्यवस्थेला (Indian economy) चालना मिळेल.

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रोटरी जिल्हा परिषदेला (Rotary District Conference 2020-21) संबोधित करताना गडकरी म्हणाले की, पर्यायी इंधन इथेनॉलची (Ethanol) किंमत प्रति लीटर 60-62 रुपये इतकी आहे तर देशाच्या अनेक भागांत पेट्रोलची किंमत (Petrol Price) प्रति लीटर 100 रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे इथेनॉल वापरुन भारतीयांना प्रति लीटर 30 ते 35 रुपयांची बचत करता येईल.

इतर बातम्या

सर्वसामान्यांना दिलासा, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन परवानासह इतर कागदपत्रांबाबत मोठा निर्णय

वायू प्रदूषण टाळण्यासाठी सरकारने कंबर कसली; सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरणाचा मसूदा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

Petrol & Diesel: पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार?

(Petrol and Diesel prices in Maharashtra)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.