Petrol Diesel Rates in Maharashtra : 7 दिवसात 6 वेळा इंधन दरवाढीचा शॉक, महाराष्ट्रातील 10 प्रमुख शहरांतील दर एका क्लिक वर
इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं आज पेट्रोलचे दर 30 पैसे तर डिझेलचे दर 35 पैसे प्रति लीटर वाढवले आहेत. 22 मार्च पासून 28 मार्चपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर 4 रुपयांनी वाढले आहेत.
मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तेल कंपन्यांकडून (oil companies) पेट्रोल आणि डिझेलची दर वाढ सुरु आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील बदलांनुसार पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर जाहीर करण्यात येत आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या 7 दिवसात 6 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केलीय. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं आज पेट्रोलचे दर 30 पैसे तर डिझेलचे दर 35 पैसे प्रति लीटर वाढवले आहेत. 22 मार्च पासून 28 मार्चपर्यंत पेट्रोल आणि डिझेलचे दर 4 रुपयांनी वाढले आहेत. राज्यात आज पेट्रोल सर्वाधिक दर परभणी जिल्ह्यात आहेत.तर, सर्वात कमी नागपूर शहरात आहेत. तर, गुडरिटर्न्स या वेबसाईट नुसार राज्यात सर्वात महाग डिझेल औरंगाबादमध्ये विकलं जात आहे. तर, सर्वात स्वस्त डिझेल नागपूर शहरात विकलं जात आहे.
वाचा 10 शहरातील दर
- पुण्यात पेट्रोलचा दर 113 रुपये 90 पैशांवर पोहोचला आहे. तर, डिझेल 96 रुपये 76 पैशांवर गेलं आहे. वाढत्या पेट्रोलच्या किमतीनं पुणेकर हैराण झाले आहेत.
- राज्यातील सर्वात महाग पेट्रोल परभणी जिल्ह्यात विकलं जात आहे. परभणीतील पेट्रोलचा दर 116.86 तर डिझेलचा दर 99.41 इतका आहे.
- नाशिकमध्ये पेट्रोल 114.42 रुपये तर डिझेल 97.34 रुपयांनी विकलं जात आहे.
- नांदेड जिल्ह्यातही पेट्रोल आणि डिझेल महागले आहे. नांदेडमध्ये पेट्रोलचा दर 99.48 तर पेट्रोल आजचा दर 116.71 रुपये लिटर आहे.
- रत्नागिरी जिल्ह्यात देखील पेट्रोलचे दर 30 पैसे तर डिझेल 35 पैशांनी वाढले आहेत. रत्नागिरीतील पेट्रोल आजचा दर 115.33 तर डिझेलचा आजचा दर 98.45 इतका आहे.
- मुंबई मध्ये पेट्रोल 30 पैशांनी तर डिझेल 35 पैशांनी महागल आहे. मुंबईतील पेट्रोलचा दर 114.19 रुपये तर डिझेलचा दर 98.50 रुपये इतका आहे.
- सातारा जिल्ह्यात पेट्रोलचा दर 114.32 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेल 97.10 रुपयांवर पोहोचलं आहे.
- विदर्भातील प्रमुख शहर आणि राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा एका लीटरचा दर 114.05 रुपये तर डिझेलचा दर 96.89 रुपयांवर पोहोचला आहे.
- औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 115.20 वर पोहोचला आहे तर डिझेलचा दर 98.01 पोहोचला आहे.
- जळगाव जिल्ह्यात काल डिझेल 97.67 तर पेट्रोल 114.91 रुपयांनी विकलं जात होतं. तर आज 30 ते 35 पैशांची वाढ झाल्यानं डिझेल 98.03 रुपये तर पेट्रोल 115.22 रुपयांनी विकलं जातंय.
ट्विट
Price of petrol & diesel in Delhi at Rs 99.41 per litre & Rs 90.77 per litre respectively today (increased by 30 & 35 paise respectively)
In Mumbai, the petrol & diesel prices per litre at Rs 114.19 & Rs 98.50 (increased by 31 paise & 37 paise respectively) pic.twitter.com/ciy6wIFsGe
— ANI (@ANI) March 28, 2022
7 दिवसांमध्ये 6 वेळा दरवाढ
22 मार्च ते 28 मार्च या काळात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 6 वेळा वाढवण्यात आल्या. तर, 24 मार्चला दरवाढ करण्यात आली नव्हती. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 30 ते 35 पैशांची वाढ करण्यात आली आहे. अशा प्रकारे आतापर्यंत पेट्रोल 4 रुपये तर डिझेल 4.5 रुपयांनी महागलं आहे.
इतर बातम्या:
Oscars 2022 LIVE Updates: अँड द ऑस्कर गोज टू… ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची शानदार सुरुवात