Marathi News Business Petrol and diesel prices increased by 83 and 84 paise prices increased after 137 days check rates in cities of Maharashtra
Petrol Diesel Rates in Maharashtra : साडे चार महिन्यानंतर इंधनदरवाढीचा भडका, महाराष्ट्रातील 10 प्रमुख शहरांचे दर एका क्लिक वर
पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तेल कंपन्यांकडून (oil companies) पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यास सुरुवात झाली आहे. 137 दिवसांनंतर पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर जाहीर करण्यात आले आहेत.
पेट्रोल-डिझेलवर केंद्र सरकार देणार नाही सवलत
Image Credit source: TV9
Follow us on
मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर तेल कंपन्यांकडून (oil companies) पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्यास सुरुवात झाली आहे. 137 दिवसांनंतर पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर जाहीर करण्यात आले आहेत. युक्रेन आणि रशिया यूक्रेन यांच्यातील युद्धाच्या परिणामामुळं देखील आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून देखील दरवाढ होतं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीसह आज एलपीजीचे देखील दर वाढले आहेत. राज्यात आज पेट्रोल सर्वाधिक दर परभणी जिल्ह्यात आहेत.तर, सर्वात कमी नागपूर शहरात आहेत. परभणीतील पेट्रोलचा दर 113.50 रुपये तर डिझेलचा दर 96.17 इतका आहे. तर, गुडरिटर्न्स या वेबसाईट नुसार नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 109.84 इतका आहे. औरंगाबादमध्ये डिझेल 96.71 रुपये लीटर प्रमाणं विकलं जात आहे. तर, सर्वात स्वस्त डिझेल नागपूर शहरात 92.68 वर पोहोचलं आहे.
वाचा 10 शहरातील दर
पुण्यात पेट्रोलचा दर 110 रुपये 35 पैशांवर पोहोचला आहे. तर, डिझेल 93 रुपये 14 पैशांवर गेलं आहे. वाढत्या पेट्रोलच्या किमतीनं पुणेकर हैराण झाले आहेत.
राज्यातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल परभणी जिल्ह्यात विकलं जात आहे. परभणीतील पेट्रोलचा दर 113.50 तर डिझेलचा दर 96.17 इतका आहे. परभणीत पेट्रोल 84 पैशांनी वाढलंय तर डिझेलचा दर 83 पैशांनी वाढला आहे.
तब्बल 137 दिवसानंतर पेट्रोल डिजलच्या दरांमध्ये आज वाढ करण्यात आली असून नाशिकमध्ये पेट्रोल 110.64 रुपये तर डिझेल 93.43 रुपयांनी विकलं जात आहे.
नांदेड जिल्ह्यात पेट्रोल 84 पैसे तर डिझेल 83 पैशांनी महागले आहे. पेट्रोल आजचा दर 113.14 रुपये लिटर आहे, तर काल 112.30 रुपये होते लिटर. आज डिझेल 95.84 रुपये लिटर तर काल 95.01 रुपयांना विक्री केली जात होती.
रत्नागिरी जिल्ह्यात देखील पेट्रोलचे दर 84 पैसे तर डिझेल 83 पैसे वाढलं आहे. रत्नागिरीतील पेट्रोल आजचा दर 112.38 तर डिझेलचा आजचा दर 95.12 इतका आहे.
मुंबई मध्ये पेट्रोल 84 पैशांनी तर डिझेल 86 पैशांनी महागल आहे.तब्बल 3 महिन्या नंतर ही भाववाढ झाली आहे यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मात्र कात्री बसलेली आहे. मुंबईतील पेट्रोलचा दर 110.82 रुपये तर डिझेलचा दर 95.00 रुपये इतका आहे.
अकोला जिल्ह्यातही पेट्रोल 84 पैसे तर डिझेल 84 पैशांनी वाढलं आहे. पेट्रोल 110.58 रुपयांना तर डिझेल 93.39 रुपयांना विकलं जात आहे.
सातारा जिल्ह्यात पेट्रोलचा दर 111.75 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेल 94.48 रुपयांवर पोहोचलं आहे.
विदर्भातील प्रमुख शहर आणि राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा एका लीटरचा दर 109.84 रुपये तर डिझेलचा दर 92.68 रुपयांवर पोहोचला आहे.
औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 112.55 वर पोहोचला आहे तर डिझेलचा दर 96.71 पोहोचला आहे.
ट्विट
Price of petrol & diesel in Delhi at Rs 96.21 per litre & Rs 87.47 per litre respectively today
Petrol & diesel prices per litre- Rs 110.82 & Rs 95.00 in Mumbai; Rs 105.51 & Rs 90.62 in Kolkata; Rs 102.16 & Rs 92.19 in Chennai respectively