नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukraine) युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. गेल्या काही आठवड्यात कच्चे तेल 100 डॉलर प्रति बॅरलच्याही पुढे गेले होते. मात्र चालू आठवड्यात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली असून, कच्चे तेल 99 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असल्याने भारतात देखील दहा मार्च नंतर पेट्रोल, डिझेलचे दर (petrol, diesel Rates) वाढू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत होता. दहा मार्च रोजी पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल होता. निवडणूक निकालानंतर इंधनाच्या दरामध्ये वाढ होईल असे वाटत असताना आज देखील पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. निवडणूक निकालानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होईल असा अंदाज असल्याने अनेकांनी पेट्रोल, डिझेलची अतिरिक्त खरेदी केल्याने इंधनाच्या खरेदीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
ओसीएलकडून प्राप्त माहितीनुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रती लिटर 95.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 86.67 रुपये एवढा आहे. मुंबत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 व 94.14 रुपये एवढा आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रलसाठी 104.67 रुपये आणि डिझेलसाठी 89.79 रुपये आकारले जात आहेत. तर चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 101.40 रुपये तर डिझेलचा दर 91.43 रुपये एवढा आहे.
चार नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोल डिझेलवरील सरचार्ज कमी करण्याचा निर्णय घेतल्याने भारतात पेट्रोल प्रति लिटर मागे पाच रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर मागे दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. तेव्हा कच्च्या तेलाचे भाव देखील कमी होते. मात्र तेव्हापासून ते आतापर्यंत पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून, इंधनाच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. मात्र दुसरीकडे कच्च्या तेलाचे दर वाढल्याने त्याचा दबाव हा पेट्रोलियम कंपन्यावर आल्याचे दिसून येत आहे.
गुंतवणूकदार मालामाल; 70 टक्के IPO मधून मिळाला चांगला परतावा
31 मार्चच्या आत पटापट पूर्ण करा बँकेशी संबंधित ‘ही’ कामे, अन्यथा बसू शकतो मोठा आर्थिक फटका