AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल, डिझेलचा समावेश जीएसटीच्या कक्षेत होणार का?, अर्थ राज्यमंत्र्यांची संसदेत महत्त्वपूर्ण माहिती

पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. इंधन दरवाढीमुळे सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचा समावेश हा जीएसटीच्या कक्षेत करण्यात येणार असल्याच्या चर्चा देखील होत्या. आता याबाबत अर्थ राज्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे.

पेट्रोल, डिझेलचा समावेश जीएसटीच्या कक्षेत होणार का?, अर्थ राज्यमंत्र्यांची संसदेत महत्त्वपूर्ण माहिती
पेट्रोल
| Edited By: | Updated on: Dec 22, 2021 | 4:12 PM
Share

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलचे (petrol and diesel)  दर गगनाला भिडले आहेत. इंधन दरवाढीमुळे सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. काही दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचा समावेश हा जीएसटीच्या (GST) कक्षेत करण्यात येणार असल्याच्या चर्चा देखील होत्या. इंधनाचा समावेश जीएसटीच्या कक्षेत झाल्यास इंधन स्वस्त होईल अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती. मात्र आता पेट्रोल, डिझेलचा समावेश हा जीएसटीच्या कक्षेत होणार का? याबाबत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत माहिती दिली आहे.

काय म्हणाले चौधरी?

पेट्रोल आणि डिझेलचा समावेश हा  जीएसटीमध्ये करण्यात यावा असा कोणताही प्रस्ताव जीएसटी परिषदेकडून देण्यात आला नव्हता. मात्र इंधनाचा समावेश हा जीएसटीमध्ये करण्यात यावा अशा काही सूचना इतर ठिकाणावरून मिळाल्या होत्या. या सूचनांच्या आधारे सरकार पेट्रोल आणि डिझेलचा समावेश हा जीएसटीमध्ये करण्याचा दृष्टीने विचार करत होते. मात्र इंधनाचा समावेश हा जीएसटीमध्ये करण्यासाठी राज्यांचा देखील विरोध आहे. पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या उत्पन्न शुल्कामधून देशातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येतो. पंकज चौधरी यांनी संसदेमध्ये विचारण्यात आलेल्या एका लेखी प्रश्नला उत्तर देताना ही माहिती दिली.

‘एटीएफ’ला जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा विचार

पुढे बोलताना चौधरी म्हणाले की, पेट्रोल, डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती, महागाई, कच्च्या तेलावर लावण्यात येणारे आयात शुल्क अशा विविध मुद्द्यांच्या आधारे ठरत असतात. त्यामुळे इंधनाचा समावेश हा जीएसटीच्या कक्षेत करणे हे अवघड काम आहे. जीएसटी परिषदेकडून पेट्रोल. डिझेलचा समावेश हा जीएसटीच्या कक्षेत करावा असा कोणताही प्रस्ताव सादर करण्यात आला नव्हता. मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणात यावेत यासाठी इंधनाला जीएसटीच्या कक्षेत कसे आणता येईल यावर विचार सुरू असून, लवकरच नैसर्गिक गॅस आणि एविएशन टर्बाइन फ्यूल ‘एटीएफ’ला जीएसटीच्या कक्षेत आणले जाऊ शकते असे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

EPFO Balance Enquiry : ईपीएफओ सदस्य ‘या ‘पद्धतीनं चेक करू शकतात ऑनलाइन बॅलन्स

डोळे चक्रावतील ! उद्योगपती एलन मस्क 8,32,71,48,50,000.00 रुपये एवढा कर भरणार, भारतातल्या काही राज्यांचं बजेटही एवढं नाही?

Unique Digital Health ID card | युनिक डिजिटल हेल्थ आयडी, आरोग्याच्या जन्मकुंडलीची स्टेप बाय स्टेप माहिती

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.