Petrol Diesel Price | दर कपात तरीही राज्यात पेट्रोल-डिझेल महाग! गुजरातमध्ये महाराष्ट्रापेक्षा पेट्रोल 9 रुपये तर डिझेल 1.50 रुपयांनी स्वस्त
Petrol Diesel Expensive : राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या मूल्यवर्धित करात कपात केल्याने किंमती उतरल्या. परंतू गुजरात राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेल महागच आहे. पाहुयात प्रतिनिधी गौतम भैसणे यांचा खास रिपोर्ट
Petrol Diesel Rate Cheaper : राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या मूल्यवर्धित करात(VAT) कपात केली. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल प्रति लिटरमागे पाच रुपयांनी तर डिझेल तीन रुपयांनी स्वस्त झाले आहे. महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा ठरला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गुरुवारी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलवरील (Diesel)व्हॅट कमी करण्याची मोठी घोषणा केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात पेट्रोल प्रति लिटरमागे 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झाले आहे.नवे दर आजपासून लागू झाले आहेत. असे असले तरी तरी शेजारील गुजरात राज्यात (Gujrat State) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी तफावत दिसून येत आहे. गुजरात मध्ये पेट्रोल 9 रुपयांनी तर डिझेल 1.5 रुपयांनी स्वस्त आहे. सीमा वरती भागातील नागरिक गुजरात मध्येच पेट्रोल आणि डिझेल टाकण्यास प्राधान्य देत आहेत.
भाजपशासित राज्यापेक्षा महाग
व्हॅट कपातीनंतर राज्यात नवे दर आजपासून लागू झाले. राज्यात पेट्रोल प्रति लिटरमागे 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झाले. तर नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोलचे दर 106.95 रुपये तर डिझेलचे दर 94.45 इतके आहेत तर गुजरात मध्ये पेट्रोल 97 रुपये लिटर तर डिझेल 93 रुपये लिटर या दराने मिळत आहे. त्यामुळे नंदुरबारकरांनी राज्यातील पेट्रोलपंपापेक्षा पेट्रोल आणि डिझेल टाकण्यासाठी गुजरातच्या पेट्रोल पंपावर गर्दी केल्याचे चित्र आहे.
View this post on Instagram
राज्यातील इतर शहरातील भाव काय?
नव्या दरानुसार आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये एवढा झाला आहे. तर पुण्यात एक लिटर पेट्रोलचा भाव 106.10 रुपये असून एक लिटर डिझेलसाठी 92.58 रुपये मोजावे लागत आहेत. ओरंगाबादमध्ये एक लिटर पेट्रोलचा भाव 107.93 रुपये असून एक लिटर डिझेलसाठी 95.88 रुपये मोजावे लागत आहेत. नागपूर शहरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 94.28 रुपये एवढा झाला आहे. नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 92.58 रुपये एवढा झाला आहे.नंदुरबार नजीक नाशिकमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.69 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 93.18 रुपये आहे.
काय म्हणातायेत नागरिक
नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी पेट्रोल डिझेल दराच्या कपातीवर नाराजी व्यक्त केली आहे. शेजारील भाजपशासित राज्यात पेट्रोल डिझेल स्वस्त मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. स्थानिक गौतम बैसाणे यांनी नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी सरकारवर पेट्रोल आणि डिझेलवर लावलेल्या करांसंदर्भात आरोप करताना दिसत होते, मात्र सत्तेत आल्यावर शेजारील भाजपा शासित गुजरात राज्यात असलेल्या दराप्रमाणे त्यांनी पेट्रोल डिझेलचे दर का ठरवले नाही असे बैसाणे यांनी म्हणणे मांडले.