जर सर्व गोष्टी जूळून आल्या तर लवकरच भारतामध्ये पेट्रोल, डिझेलच्या (Petrol-Diesel) किमती स्वस्त होऊ शकतात. आता तुमच्या मनात हा विचार नक्कीच आला असेल की, गेल्या अकरा दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या भावात तब्बल नऊ वेळा वाढ झाली आहे. मग पेट्रोल, डिझेल स्वस्त कसे होणार? हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र पेट्रोल, डिझेल स्वस्त होण्याचा दावा करण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. ते म्हणजे रशियाने (Russia) भारताला कच्चे तेल (Crude Oil) स्वस्तात विकण्याची तयारी दाखवली आहे. रशियाकडून भारताला कच्चे तेल खरेदी करण्यासाठी प्रति बॅरल 35 डॉलरच्या डिस्काउंटची ऑफर देण्यात आली आहे. जर भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी केल्यास भारताला कच्च्या तेलाचा स्वस्तात पुरवठा होईल परिणामी पेट्रोल, डिझेलचे दर कमी होण्यास मदत मिळणार आहे.
भारत आणि रशियामध्ये मैत्रिपूर्ण संबंध आहेत. तसेच रशियाने भारताला कच्चे तेल खरेदी करण्यासाठी आकर्षक ऑफर दिली आहे. व्यवहार भारतीय चलनामध्ये होणार आहे. या सर्व गोष्टी भारताच्या बाजूने असल्यामुळे भारत रशियाच्या ऑफरवर गांभिर्याने विचार करत असल्याची माहिती उच्चपदस्त सूत्रांकडून मिळत आहे. रशियाकडून भारताला प्रति बॅरल 35 डॉलर डिस्काउंटची ऑफर देण्यात आली आहे. भारत हा कच्च्या तेलाचा तिसऱ्या नंबरचा सर्वात मोठा आयातदार देश असून, आपल्याला कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी मोठ्याप्रमाणात इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीमध्ये जर रशियाने भारताला स्वस्त किमतीमध्ये कच्चे तेल दिले तर भारताचा मोठा फायदा होऊ शकतो.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. रशियाने युद्धबंदींची घोषणा करावी यासाठी अमेरिका आणि इतर युरोपीयन देशांकडून रशियावर दबाव वाढवला जात आहे. रशियावर आर्थिक निर्बंध घालण्यात आले आहेत. रशिया हा कच्च्या तेलाचा एक प्रमुख निर्यातदार देश आहे. मात्र युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इतर युरोपीयन देशांनी रशियाकडून निर्यात होणाऱ्या कच्च्या तेलावर बंदी घातल्याने याचा मोठा फटका हा रशियाला बसत आहे. परिणामी नुकसान भरून काढण्यासाठी रशियाकडून भारताला स्वस्त कच्चे तेल देण्याची तयारी दाखवण्यात आली आहे.
व्यवसायिक सिलिंडरच्या दरात 250 रुपयांची वाढ, हॉटेलमधील जेवन महागणार?
विमान प्रवास महागणार? आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी दरवाढीचा झटका, ATF च्या दरात वाढ
पहिल्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांच्या व्याज दरात कोणताही बदल नाही, जाणून घ्या काय आहेत सध्याचे दर