पेट्रोल, डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

इंधनाचे दर हे कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावात चढ-उतार सुरू असतानाच आज पेट्रोल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत.

पेट्रोल, डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 8:18 AM

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ -उतार सुरूच आहे. कच्च्या तेलाच्या भावाचा पेट्रोल, डिझेलच्या किमतींवर परिणाम होत असतो. इंधनाचे दर हे कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावात चढ-उतार सुरू असतानाच आज पेट्रोल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून, भाव स्थिर आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये आज पेट्रोल दर प्रति लिटर 95.41  रुपये एवढे आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर 86.67  रुपये आहेत.

पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

भारतामध्ये पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मध्यतंरी कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या. तरी देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर होते. आता किमती वाढल्यानंतर देखील इंधनाचे दर जैसे थे आहेत. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 95.41 रुपये आणि डिझेलचा दर 86.67 रुपये इतका आहे. तर मुंबईत अनुक्रमे पेट्रोल आणि डिझेलचा दर 109.98 आणि 94.14 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल डिझेलचे दर अनुक्रमे 101.40 रुपये आणि  91.43 रुपये इतका आहे. 4 नोव्हेंबरला पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी पेट्रोलचे दर हे प्रति लिटर मागे 5 रुपयांनी तर डिझेलचे दर 10 रुपयांनी कमी झाले होते. तेव्हापासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

संबंधित बातम्या

31 डिसेंबरच्या आत पूर्ण करा ‘ही’ कामे; अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

पोस्टाच्या ‘आरडी’ योजनेतून मिळवा अधिक नफा, ‘अशी’ करा गुंतवणूक

जगातील सर्वाधिक महागडा सेन्सेक्स: 2021 मध्ये रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, 20 टक्क्यांपर्यंत रिटर्न

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.