नांदेड : राज्यात कोरोनाने थैमान घातलं आहे. दररोज अर्ध्या लाखापेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. महाराष्ट्रात एकीकडे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची घोडदौड सुरुच आहे. नांदेड जिल्ह्यात धर्माबाद येथे तर या दरवाढीने कहरच केला आहे. इथे 100 रुपयांपेक्षा जास्त किंमतीत एक लिटर पेट्रोल मिळतंय. त्यापाठोपाठ आज परभणीतही पेट्रोलची किंमत 100 रुपये प्रतिलिटर अशी झाली आहे (Petrol Diesel price hike in Nanded).
धर्माबादमध्ये सर्वात महाग इंधन
राज्यातील सर्वात महागडे इंधन हे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद इथे विकलं जातंय. धर्माबादमध्ये आज पेट्रोलचा भाव शंभर रुपयांच्या पार गेलाय तर डिझेल 90 रुपयांवर पोहोचलंय. धर्माबादमध्ये हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे पेट्रोल 100 रुपये 4 पैसे प्रतिलिटर दराने विकलं जातंय. तर इस्सार या खाजगी कंपनीचे पेट्रोल 102 रुपये प्रतिलिटर इतक्या महागड्या दराने विकलं जातंय. त्यामुळे तेथील सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे (Petrol Diesel price hike in Nanded).
धर्माबादेत इतकं इंधन महाग का?
धर्माबादला इंधन पुरवठा हा सोलापूरच्या डेपोतून होतो. हे अंतर सर्वाधिक असल्याने वाहतूक खर्च वाढतो, त्यामुळे इथे इंधन महाग आहे. विशेष म्हणजे पेट्रोलचा भाव वाढल्याने सध्या धर्माबादमध्ये पेट्रोल पंपावर शुकशुकाट पाहायला मिळतोय. या महागाईमुळे धर्माबादचे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
इंधन भरण्यासाठी अनेकजण तेलंगणात ये-जा करतात
धर्माबाद हा तेलंगणा राज्याला लागून असलेला तालुका आहे. मात्र इथून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्यात पेट्रोलचे भाव कमी आहेत. त्यामुळे इंधन भरण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जण तेलंगणात ये-जा करतात. तसेच धर्माबादचा सीमावर्ती भाग गोदावरी नदीमुळे समृद्ध म्हणून ओळखला जातो. इथले शेतकरी पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतात बारामाही पिके घेतात. शेतीच्या अनेक कामांसाठी डिझेलची गरज भासते, अशावेळी सीमावर्ती भागातील हे शेतकरी आपल्या महाराष्ट्रातील महागडे इंधन घेण्यापेक्षा तेलंगणात जाऊन मोठ्या प्रमाणात इंधनाची खरेदी करतात. त्यामुळे धर्माबादचे पेट्रोल पंप हे नेहमीच सुनेसुने दिसतात.
अवघ्या पाच किमीच्या अंतरात पेट्रोलच्या किंमतीत एवढा फरक का?
दुसरीकडे शेजारी असलेल्या तेलंगणा राज्यातील पेट्रोल पंपावर नेहमी रांगा लागलेल्या असतात. आपल्या देशात अनेक जागी धर्माबादसारखीच समस्या आहे. प्रत्येक राज्याची महसूल आणि कर रचना वेगवेगळी आहे. इंधन विक्रीवरचा प्रत्येक राज्याचा वेगवेगळा अधिभार असतो. त्यामुळे ऑईल डेपोपासून अंतर कितीही असू द्या त्या त्या राज्यात त्यांच्याच ऑईल डेपोपासून इंधनाचा पुरवठा केल्या जातो. त्यातून ग्राहकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागतो.
राज्यात सलग चार दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ
गेल्या दोन महिन्यांपासून म्हणजे मार्च आणि एप्रिलमध्ये काही दिवस सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होत होती. विशेष म्हणजे 4 मेपूर्वी 23 फेब्रुवारीला पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत शेवटची वाढ झाली होती. तर मार्चमध्ये तीन दिवस आणि एप्रिलमध्ये एक दिवस किंमतीत घट झाली होती.
दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किंमतीतही वाढ झाली आहे. ओमान, दुबई आणि ब्रेंट क्रूड या ठिकाणी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 68.35 डॉलर इतकी आहे. मागील दिवसाच्या तुलनेत यात 2.58 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी कोरोना प्रादुर्भावानंतर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 19.90 इतकी झाली होती.
क्रमांक | शहरे | पेट्रोल (रुपये) | डिझेल (रुपये) |
1 | अहमदनगर | ₹ 97.88 | ₹ 87.73 |
2 | अकोला | ₹ 97.47 | ₹ 87.36 |
3 | अमरावती | ₹ 98.44 | ₹ 88.29 |
4 | औरंगाबाद | ₹ 97.94 | ₹ 88.78 |
5 | भंडारा | ₹ 98.02 | ₹ 87.88 |
6 | बीड | ₹ 98.62 | ₹ 88.44 |
7 | बुलडाणा | ₹ 98.56 | ₹ 88.41 |
8 | चंद्रपूर | ₹ 97.77 | ₹ 87.66 |
9 | धुळे | ₹ 97.46 | ₹ 87.34 |
10 | गडचिरोली | ₹ 98.15 | ₹ 88.02 |
11 | गोंदिया | ₹ 99.03 | ₹ 88.86 |
12 | मुंबई उपनगर | ₹ 97.61 | ₹ 88.82 |
13 | हिंगोली | ₹ 99 | ₹ 88.83 |
14 | जळगाव | ₹ 97.61 | ₹ 87.48 |
15 | जालना | ₹ 99.14 | ₹ 88.93 |
16 | कोल्हापूर | ₹ 97.76 | ₹ 87.64 |
17 | लातूर | ₹ 98.39 | ₹ 88.24 |
18 | मुंबई शहर | ₹ 97.61 | ₹ 88.82 |
19 | नागपूर | ₹ 97.56 | ₹ 87.45 |
20 | नांदेड | ₹ 99.81 | ₹ 89.60 |
21 | नंदूरबार | ₹ 98.33 | ₹ 88.17 |
22 | नाशिक | ₹ 97.23 | ₹ 87.09 |
23 | उस्मानाबाद | ₹ 98.53 | ₹ 88.37 |
24 | पालघर | ₹ 97.41 | ₹ 87.24 |
25 | परभणी | ₹ 100.24 | ₹ 90 |
26 | पुणे | ₹ 97.19 | ₹ 87.06 |
27 | रायगड | ₹ 97.17 | ₹ 87.02 |
28 | रत्नागिरी | ₹ 98.45 | ₹ 88.24 |
29 | सांगली | ₹ 97.71 | ₹ 87.58 |
30 | सातारा | ₹ 98.65 | ₹ 88.46 |
31 | सिंधुदुर्ग | ₹ 98.99 | ₹ 88.82 |
32 | सोलापूर | ₹ 98.21 | ₹ 88.06 |
33 | ठाणे | ₹ 97.33 | ₹ 87.17 |
34 | वर्धा | ₹ 98.93 | ₹ 88.76 |
35 | वाशिम | ₹ 98.16 | ₹ 88.02 |
36 | यवतमाळ | ₹ 98.49 | ₹ 88.35 |
दररोज 6 वाजता किमती बदलतात
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.
पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा
एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.
त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel Price Today 07 May 2021)
हेही वाचा : उदयनराजेंशी अबोला, गोरेंशी पंगा; निंबाळकर राजघराण्याचे 29 वे वंशज रामराजेंचे हे वाद माहीत आहे का?