कोणत्या राज्यात पेट्रोल आणि डिझेल किती स्वस्त?, तुमच्या शहरातील दर काय?

Petrol Diesel Price: व्हॅट केवळ मूळ किमतीवरच नव्हे तर केंद्राने आकारलेल्या उत्पादन शुल्कावरही लावतात, त्यामुळे किमती कमी होण्याचे प्रमाण नगण्य आहे. व्हॅटचे दर जास्त असलेल्या राज्यांमध्ये किमतीत कपात जास्त होती. या राज्यांमध्ये आसाम, त्रिपुरा, मणिपूर, कर्नाटक, गोवा, उत्तर प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, बिहार, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.

कोणत्या राज्यात पेट्रोल आणि डिझेल किती स्वस्त?, तुमच्या शहरातील दर काय?
Follow us
| Updated on: Nov 05, 2021 | 3:50 PM

नवी दिल्लीः Petrol Diesel Price: केंद्र सरकारने दिवाळीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. यानंतर अनेक राज्यांनी इंधनाच्या किमतीत अतिरिक्त कपात करण्याची घोषणा केली. गुरुवारी देशभरात पेट्रोलचे दर 5.7 रुपये ते 6.35 रुपये प्रति लीटरपर्यंत कमी झाले. यासह देशातील विविध राज्यांमध्ये डिझेलच्या दरात 11.16 ते 12.88 रुपयांची कपात करण्यात आली. तेल कंपन्यांनी उत्पादन शुल्कात कपातीचा फायदा त्यांच्या ग्राहकांना दिला होता.

व्हॅटचे दर जास्त असलेल्या राज्यांमध्ये किमतीत कपात जास्त

राज्ये स्थानिक विक्री कर किंवा व्हॅट केवळ मूळ किमतीवरच नव्हे तर केंद्राने आकारलेल्या उत्पादन शुल्कावरही लावतात, त्यामुळे किमती कमी होण्याचे प्रमाण नगण्य आहे. व्हॅटचे दर जास्त असलेल्या राज्यांमध्ये किमतीत कपात जास्त होती. या राज्यांमध्ये आसाम, त्रिपुरा, मणिपूर, कर्नाटक, गोवा, उत्तर प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, बिहार, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.

गुजरात, कर्नाटकसह या राज्यांमध्ये 7 रुपये / लिटरची अतिरिक्त कपात

गुजरात, आसाम, त्रिपुरा, मणिपूर, कर्नाटक आणि गोवा या राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवर अनुक्रमे 5 रुपये आणि 10 रुपयांच्या सवलतीव्यतिरिक्त 7 रुपये प्रतिलिटर कपात केली. त्याचवेळी उत्तराखंडमध्ये मूल्यवर्धित कर (व्हॅट) दोन रुपयांनी कमी करण्यात आला. ओडिशामध्ये पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींवरील व्हॅटमध्ये प्रति लिटर 3 रुपयांनी कपात करण्यात आली. बिहारमध्ये पेट्रोलवर प्रतिलिटर 3.20 रुपये आणि डिझेलमध्ये 3.90 रुपयांची कपात करण्यात आली. दुसरीकडे उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्य सरकारांनी गुरुवारी सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 12 रुपयांनी कपात केली जाईल. त्याचवेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केल्याची घोषणा केली. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर लिहिले की, आता राज्यात पेट्रोल 12 रुपयांनी आणि डिझेल 17 रुपयांनी स्वस्त होणार आहे.

मध्य प्रदेशने 4% व्हॅट कमी केला

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करण्याची घोषणा केली. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले की, केंद्र आणि राज्य सरकारने ग्राहकांना दिलासा दिल्यानंतर पेट्रोलमध्ये प्रतिलिटर 10.20 रुपये आणि डिझेलमध्ये 15.22 रुपये प्रतिलिटर सवलतीचा लाभ मिळणार आहे. मध्य प्रदेश सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये 4 टक्के कपात करण्याची घोषणा केली. त्याचवेळी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 6.07 रुपये आणि डिझेलचे दर 11.75 रुपयांनी कमी झालेत. ही माहिती सरकारी तेल किरकोळ कंपन्यांच्या किमतीच्या अधिसूचनेनुसार आहे. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवमध्ये पेट्रोलच्या दरात सर्वात कमी 5.7 रुपयांनी घट झाली आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींवरील व्हॅट कमी केल्यामुळे पुद्दुचेरीमध्ये प्रति लिटर 7 रुपयांची अतिरिक्त कपात झाली आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.96 आणि 94.13 रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे.

संबंधित बातम्या

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! ‘या’ स्थानकावर डिलक्स टॉयलेट अन् एसी लाऊंजची सुविधा मिळणार

LPG सबसिडीबाबत केंद्र सरकारची नवी योजना, आता कोणाच्या खात्यात येणार पैसे?

'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.