Petrol Diesel Rate Today: इंधन दर आजही स्थिर! भारताची रशियाला साथ, कच्च्या तेलाची आयात वाढवली

एप्रिल महिन्यात भारताच्या क्रूड ऑईल इंपोर्टचा बिल रेकॉर्ड हा उच्चांकी असल्याचं पाहायला मिळालं होतं.

Petrol Diesel Rate Today: इंधन दर आजही स्थिर! भारताची रशियाला साथ, कच्च्या तेलाची आयात वाढवली
पेट्रोल डिझेलचे आजचे दर Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 9:29 AM

नवी दिल्ली : पेट्रोल डिझेलची किंमत (Petrol Diesel Price) आजही स्थिर आहे. गेल्या महिन्याभरापेक्षा जास्त काळापासून इंधनाच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. 6 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दर जैसे थे आहेत. मुंबईत (Mumbai Petrol Rate) पेट्रोल 120.51 रुपये प्रतिलीटर तर डिझेल 104.77 रुपये प्रतिलीटर आहे. दिल्लीत पेट्रोलच दर 104.41, कोलकात्यामध्ये 115.12 आणि चेन्नईत पेट्रोलचा दर 110.85 रुपये आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या दर स्थिर असल्यानं दिलासा व्यक्त केला जातो आहे. मात्र या सगळ्या दिलाशाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे. भारतानं रशियातून (India Russia) तेलाची आयात वाढवली आहे. मे महिन्याच्या 9 तारखेपर्यंत 10 मिलियन बॅरल कच्च्या तेलाची आयात भारतानं रशियाकडून केली असल्याचं समोर आलंय. एस एन्ड पी ग्लोबल रिपोर्टनं याबाबतची आकडेवारी दिली आहे.

मोठमोठ्या ग्लोबल ट्रेडिंगने रशियातून तेल खरेदी कमी केली आहे. युरोपियन युनिनने रशियाकडून कच्चा तेल खरेदी करण्यावर बंदी घातली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किंमतीत सगळ्यांची चिंता वाढली आहे. एप्रिल महिन्यात भारताच्या क्रूड ऑईल इंपोर्टचा बिल रेकॉर्ड हा उच्चांकी असल्याचं पाहायला मिळालं होतं. एप्रिलमध्ये भारतानं दरदिवशी जवळपास 48 लाख बॅरल तेल आयात केलं होतं. यात रशियाकडून 5 टक्के तेलखरेदी करण्यात आली होती.

रशियाला भारताची साथ..

रशिया-युक्रेन या ताणलेल्या संबंधांनंतर रशियाचे जगातील इतर देशांसोबतचे संबंध कसे राहतात, यावर आंतरराष्ट्रीय राजकारण ढवळून निघालं होतं. अशातच भारतानं रशियाकडून तेल आयात वाढवली आहे. 2021 मध्ये रशियाकडून करण्यात आलेल्या आयातीचं प्रमाण 1 टक्के इतकं होतं. तर 2022च्या पहिल्या तिमाहीतच 1 टक्के आयात रशियाकडून करण्यात आली असल्याचं समोर आलंय. भारतात ईराकमधून सर्वात जास्त आयात करण्यात आली. इराकमधून 12 लाख बॅरल तेलाची आयात इराकमधून करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

महत्त्वपूर्ण आकडेवारी

वित्त मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात भारताने 20.18 बिलियन डॉलर कच्च्या तेलाची आणि पेट्रोलियम प्रॉडक्सची आयात केली होती. तर एप्रिल 2021 मध्ये हा आकडा 10.76 बिलियन डॉलर इतकी आयात केली होती.

S&Pने दिलेल्या रिपोर्टनुसार, भारतानं रशियाकडून तेल आयातीत वाढ केली आहे. मे महिन्याच्या 9 तारखेपर्यंत 10 मिलियन बॅरल म्हणजेच तब्बल एक कोटी बॅरल कच्च्या तेलाची आयात केली आहे. 16 वेसल्समध्ये तेरा मिलियन बॅरल तेल म्हणजेच 1.3 कोटी बँरल तेल येत्या चार आठवड्यात भारतात पोहोचण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.