Petrol Price Today : आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या का? वाचा आजचे दर

वाढत्या महागाईमुळे पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या किंमतींमध्ये (Diesel Price) दिलासा मिळण्याची कोणतीही बातमी समोर येत नाहीये.

Petrol Price Today : आजही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या का? वाचा आजचे दर
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 6:57 AM

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. इंधनाच्या दरवाढीमुळे वाहनचालकांचं कंबरडं मोडण्याची वेळ आली आहे. वाढत्या महागाईमुळे पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या किंमतींमध्ये (Diesel Price) दिलासा मिळण्याची कोणतीही बातमी समोर येत नाहीये. पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढताना दिसत आहेत. खरंतर, पेट्रोल कंपन्यांद्वारे दररोज नवीन पेट्रोल डिझेल दर जारी केले जातात. आजही राज्यासह अनेक ठिकाणी थोड्या प्रमाणात भावांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं. (Petrol Diesel Price today 17 feb 2021 latest rate of fuel in your city mumbai pune nashik delhi chennai)

पेट्रोलच्या किंमती वाढल्याने आज मुंबईत पेट्रोलची किंमत प्रति लीटर 95 रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. दिल्लीत दिल्लीत पेट्रोल 89.29 रुपये/लीटर आणि डिझेल 79.70 रु./लीटर झालं आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 95.75 रुपये प्रति लीटर आणि डिझेलची किंमत 86.72 रुपये प्रति लीटरपर्यंत पोहोचली आहे. विवध राज्यातील पेट्रोलियम उत्पादनांवरील व्हॅट आणि इतर शुल्काच्या वेगवेगळ्या दरांमुळे इंधनाचे दर वेगवेगळे असतात.

प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर

मुंबई (Mumbai Petrol Price Today): 95.75 रुपये प्रतिलिटर

नाशिक (Nashik Petrol Price Today): 95.85 रुपये प्रतिलिटर

पुणे (Pune Petrol Price Today ): 95.63 रुपये प्रतिलिटर

नागपूर (Nagpur Petrol Price Today): 95.59 रुपये प्रतिलिटर

दिल्ली (Delhi Petrol Price Today): 89.29 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today): लिटर 90.54 रुपये

चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 91.52 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमध्ये डिझेलचे दर

मुंबई (Mumbai Diesel Price Today): 86.72 रुपये प्रतिलिटर

नाशिक (Nashik Diesel Price Today): 85.49 रुपये प्रतिलिटर

पुणे (Pune Diesel Price Today): 85.30 रुपये प्रतिलिटर

नागपूर (Nagpur Diesel Price Today): 85.27 रुपये प्रतिलिटर

दिल्ली (Delhi Diesel Price Today): 79.70 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today): 83.29 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) 84.83 रुपये प्रतिलिटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel Price today 17 feb 2021 latest rate of fuel in your city mumbai pune nashik delhi chennai)

संबंधित बातम्या – 

Petrol Price Today : राज्यात आजही महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल महागलं, वाचा ताजे दर

Amazon, Flipkart वरून रोज कमावा 5,000 रुपये, धमाकेदार आहे ऑफर

SBI देतेय महिन्याला 10000 रुपये कमावण्याची संधी, वाचा काय आहे नेमकी योजना?

फक्त ‘या’ नंबरवर द्या मिस्ड कॉल, SBI देणार सगळ्यात स्वस्त लोन आणि धमाकेदार फायदे

(Petrol Diesel Price today 17 feb 2021 latest rate of fuel in your city mumbai pune nashik delhi chennai)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.