अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागलं का? वाचा आजचे दर
राज्यात पेट्रोलचे दर वाढले असून, नांदेड आणि परभणीमध्ये पेट्रोल सर्वाधिक महाग आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. वाढते पेट्रोलचे दर सामान्यांसाठीसुद्धा डोकेदुखी ठरत आहेत. कोरोनामुळे आधीच आर्थिक तंगी असताना इधनांच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. राज्यात पेट्रोलचे दर वाढले असून, नांदेड आणि परभणीमध्ये पेट्रोल सर्वाधिक महाग आहे. नांदेडमध्ये पेट्रोल प्रतिलिटर 95.26 रुपये आहे, तर परभणीत पेट्रोल प्रतिलिटर 95.31 रुपये आहे. दुसरीकडे सर्वाधिक महाग डिझेल औरंगाबाद, नांदेड आणि परभणीत आहे. नांदेडमध्ये डिझेल प्रतिलिटर 84.37 रुपये प्रतिलिटर आहे. तर परभणीत डिझेल प्रतिलिटर 84.41 रुपये प्रतिलिटर आहे. (Petrol Diesel price today Most Expensive Petrol and diesel In Nanded Parbhani maharashtra )
शहरं | आजचे पेट्रोलचे भाव | आजचे डिझेलचे भाव |
---|---|---|
अकोला | 82.43 | 82.43 |
अमरावती | 82.63 | 82.63 |
औरंगाबाद | 84.54 | 84.54 |
भंडारा | 82.85 | 82.85 |
बीड | 83.33 | 83.33 |
बुलढाणा | 82.77 | 82.27 |
चंद्रपूर | 82.36 | 82.36 |
धुळे | 82.62 | 82.62 |
गडचिरोली | 83.20 | 83.20 |
गोंदिया | 83.47 | 83.47 |
ग्रेटर मुंबई | 83.35 | 83.35 |
हिंगोली | 83.44 | 83.44 |
जळगाव | 82.24 | 82.24 |
जालना | 83.25 | 83.25 |
कोल्हापूर | 83.25 | 82.25 |
लातूर | 83.29 | 83.29 |
मुंबई | 83.30 | 83.30 |
नागपूर | 82.20 | 82.20 |
नांदेड | 84.37 | 84.37 |
नंदूरबार | 82.79 | 82.79 |
नाशिक | 82.46 | 82.46 |
परभणी | 84.41 | 84.41 |
पुणे | 81.79 | 81.79 |
पेट्रोलचे दर आवाक्याबाहेर जाण्याचं कारण काय?
राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांकी गाठली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 90 च्या पार गेली आहे. तर डिझेलचे दर हे 80 रुपयांच्या पार गेले आहेत. मात्र, प्रक्रिया केल्यानंतर पेट्रोल पंपावर पेट्रोलचा मूळ दर हा 28.50 रुपये प्रति लीटर असते. तर डिझेलचा मूळ दर हा 29.52 रुपये प्रति लीटर असते. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या करांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. सरकार पेट्रोल आणि डिझेलवर त्याच्या मुळ किमतीच्या दुप्पटीपेक्षा जास्त कर आकारते.
सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात (Petrol Price Today).
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?
मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल. (Petrol Diesel price today Most Expensive Petrol and diesel In Nanded Parbhani maharashtra )
संबंधित बातम्या –
पेट्रोल-डिझेल महागणार तर मग महागाई येणार? वाचा सरकारनं काय केलंय?
Share market Budget 2021: सेन्सेक्समध्ये 2000 पॉईंटसची उसळी; मार्केट कॅप 6 लाख कोटींनी वाढली
Budget 2021 : पहिल्यांदाच नोकरदारांसाठी अर्थसंकल्पात काहीही नाही, वाचा सविस्तर…
(Petrol Diesel price today Most Expensive Petrol and diesel In Nanded Parbhani maharashtra )