मुंबई : केंद्र सरकारनं पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतीवरील नियंत्रण हटवल्यानंतर देशातील ऑईल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले जातात. ऑईल कंपन्या रोज सकाळी दरवाढ जाहीर करतात. देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांमुळं ही प्रक्रिया थांबली होती. आता निवडणुका संपल्यानंतर दरवाढीचा शॉक सर्वसामान्यांना बसत आहे. गेल्या 14 दिवसांमध्ये तब्बल 12 वेळा इंधनदरवाढ (Fuel Rates hike) करण्यात आली आहे. आतापर्यंत 8 रुपये 40 पैशांनी डिझेल आणि पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत. दुसरीकडे वाढत्या महागाईवरुन विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतलीय. महाराष्ट्रात युवा सेनेकडून थाळी बजाव आंदोलन करण्यात आलं होतं. तर, उबरनं देखील त्यांच्या सेवेत दरवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबई पेट्रोल 118.81 रुपये तर डिझेल 103.04 रुपयांना विकलं जातंय. तर, पुणे शहारत 118.29 रुपयांवर पोहोचलंय. तर डिझेल 101.01 रुपयांवर पोहोचलंय.
ट्विट
Petrol & diesel prices hiked by 40 paise a litre each, 12th increase in less than 2 weeks, taking total hike to Rs 8.40 a litre
— Press Trust of India (@PTI_News) April 4, 2022
महाराष्ट्रातील प्रमुख शहर | पेट्रोल | डिझेल |
---|---|---|
ठाणे | 118.08 | 100.88 |
सातारा | 119.03 | 101.73 |
सांगली | 118.74 | 101.48 |
कोल्हापूर | 118.91 | 101.65 |
लातूर | 119.66 | 102.35 |
औरंगाबाद | 120.28 | 102.85 |
नागपूर | 118.84 | 101.58 |
इंधन दरवाढीमुळे ‘उबर’ने पुण्यातही प्रवासी भाड्यात 15 टक्क्यांनी वाढ केली आहे. कंपनीने नुकतीच याबाबतची घोषणा केली आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्याने नाइलाजाने निर्णय घेतल्याचे उबरने स्पष्ट केलंय. इंधनदराच्या चढ-उतारावर कंपनीचे लक्ष आहे. त्यानुसार आगामी काळातही प्रवाशांसाठी आवश्यक ते निर्णय घेण्यात येतील, असेही कंपनीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले
IPL 2022, Orange Cap : ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आला लिविंगस्टोन आणि शिवम, परपल कॅपमध्येही बदल
Maharashtra News Live Update : राज ठाकरेंच्या भाषणानंतर वातावरण बदललं, भाजप मनसेची जवळीक वाढणार?